"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी.
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी.
हे असे कितीक खेळ पाहते मराठी.
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!"
- सुरेश भट (मराठी अभिमान गीत)
#मराठीदिन#मराठीभाषादिवस
बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशी शिक्षण प्रवासाची शतकपूर्ती आणि १३१ व्या जयंतीनिमित्त परदेशी शिक्षणाच्या संधींबद्दल तळागळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकलव्य ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम लॉन्च करत आहोत. https://t.co/xFAFaCWkyo
#JaiBhim#AmbedkarJayanti
दहावी झाली की डीएड करून शिक्षक व्हायची लाट होती.
गरीब,हुशार मुलं यात असायची.
शिक्षकीपेशाचा सन्मान,
चांगला पगार,
स्थिर नोकरी.
आता काळ बदलला ‘शिक्षणसेवक’ तयार झाले…त्यांचेच हाल चाललेत.
आता कशाला कोण या दलदलीत पडेल?
किती चांगले शिक्षक बनतील?
कशी नवी पिढी घडेल?
महाराष्ट्र घडेल?
आवाहन 🙏🏽
मेळघाट च्या दुर्गम भागातील पहिल्या पिढीतील शिकणारे २२ कोरकू आदिवासी विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्याची सीमा ओलांडून पुण्यात येत आहेत. एकलव्य तर्फे ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान त्यांचे exposure visit आयोजित केले आहे.
त्याच बरोबर आज #वऱ्हाडी_भाषा_दिवस यंदा याच ४ वर्ष..
विदर्भात प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा #वऱ्हाडी...
मात्र कालानुरूप ही भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे कारण ग्रामीण भागात लोकसंख्येची होणारी घट यामुळे ही भाषा रुजवून ठेवण्यात कठीण झाले आहे..
‘मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही’ हे सांगणाऱ्या संत #गाडगेबाबा यांनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला, आज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..💐💐
कीर्तनकार, समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यायच्या जयंतीचे पावनपर्व साधून त्यायनं अख्ख्या जीनगानीभर समाजाले प्रबोधन केलेल्या वऱ्हाडी बोलीभाषेचा गौरव व्हावा म्हणून २३ फेब्रुवारी रोजी वऱ्हाडी बोलीभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असते. #गाडगेमहाराज#म#मराठि#मातृभाषा_दिवस