@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11@CMOMaharashtra
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
खाजगी परीक्षा केंद्र देऊन जलसंधारण भरती चा बोजबारा उडविण्याचे काम सुरू आहे. या भरती मध्ये परीक्षा घेण्याची तयारी बघुन नक्कीच घोळ होण्याची शक्यता आहे. परीक्षेत घोळ झाल्यास महागात पडेल याची नोंद घ्यावी.
#WCD_WCO@CMOMaharashtra@mieknathshinde@SanjayDRathods@NANA_PATOLE
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले.
परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची.
#ZP_Results@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
सा बां विभागातर्फे कनिष्ठ अभियंता गट ब पदासाठी २६ जानेवारी रोजी Merit List संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर Merit List प्रमाणे अंतिम निवड यादी जाहीर करुन उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू होण्या पूर्वी पूर्ण करावी ही नम्र विनंती.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.