१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर (JE) परीक्षेसाठी अर्ज करताना निवडलेली केंद्रे न देता अनेक विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर लांबची खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ये-जा करणे अत्यंत कठीण होऊन बसणार आहे.
त्यातच २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना मतदानासाठी पोहोचणे अशक्यप्राय आहे. काही विद्यार्थ्यांवर इलेक्शन ड्युटी असल्याने ते परीक्षेलाही मुकण्याची शक्यता आहे. पुणे मनपा आयुक्तांना विनंती आहे कि, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक बदल करण्याची कृपया तातडीने कार्यवाही करावी.
याशिवाय, परीक्षेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता रहावी यासाठी ही परीक्षा फक्त TCS ION सेंटरवरच आयोजित करण्याची विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. या मागणीचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
#PMCCE #JEExam #StudentIssues #Pune #PMC #Maharashtra
@PMCPune
येत्या ०१ डिसेंबर रोजी ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) पदभरतीसाठी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे.
हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
@navalMH@PMCPune@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@PatilKailasB@CMOMaharashtra@Jayant_R_Patil@AUThackeray@RRPSpeaks
येत्या १ डिसेंबर २०२५ रोजी पुणे मनपाने कनिष्ठ अभियंता (Civil)ची परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षा पुढे ढकलावी अशी मी सर्व परीक्षार्थींच्या वतीने मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो.
येत्या २ डिसेंबर रोजी घोषित केलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. अनेक परीक्षार्थींना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली असल्याने परीक्षा झाल्यावर ४००-५०० किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी परत येणे अशक्य आहे. तसेच काही परीक्षार्थींना इलेक्शन ड्युटी असल्याने परीक्षा देता येणार नाही.
त्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलून TCS iON Center वर पुन्हा नियोजित करावी जेणेकरून परीक्षेत पारदर्शकता राहील.
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. कोणत्या परिस्थितीत हक्क हिरावला जाऊ नये. परीक्षार्थींच्या भविष्याबरोबर लोकशाहीचाही मान राखला जावा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राज्यात 20 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा अघोषित निर्णय घेतल्यामुळे हजारो विद्यार्थी कायमचे शाळाबाह्य होणार असल्याने , राजकीय मानसिकता प्रतिकूल दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार विकोपाला गेला तर राज्य शिक्षणात रसातळाला गेलेले आहे , गोर गरिबांना राज्यात शिक्षण बंद होणार असून हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याने शिक्षणात विषमता निर्माण झाली म्हणून हिवाळी अधिवेशन एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.
समाजातील सर्व घटकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे.
@Yesjassociation@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@mieknathshinde@RRPSpeaks@GMinakshi_Sakal@INCHarshsapkal@NitinRaut_INC@AnandrjAmbedkar
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी संस्थाचालकाचे अधिकार कमी करावेत ,त्यासाठी राज्यातील पात्र तरुण आपल्या सोबत आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब.
@dadajibhuse@mieknathshinde@AnandrjAmbedkar@AbhiPawarBJP
#tait3_निकाल_जाहीरकरा
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा
"अभियोग्यता चाचणीचा निकाल लागण्यासाठी 70दिवस उलटले,प्रशासन गाढ झोपेतच आहे ‘प्रत्यक्ष निवेदन देऊनही’आयुक्तांनी माध्यमांसमोर आठवडाभरात निकाल जाहीर करू असा गाजावाजा केला.पण तो आठवडा उलटूनही निकालाचा पत्ता नाही!हा उघडपणे दिलेला खोटा शब्द आणि विद्यार्थ्यांच्या संयमाची उघड चेष्टा आहे
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
#tait3_निकाल_जाहीरकरा
शासन एक नंबरचा आहे भाकऱ्या सरकार फक्त स्वतःचा मतलब साधतो येवढे परिश्रम घेऊन मुलांनी परीक्षा दिली ७५ दिवस लोटून सुध्धा जर रिझल्ट लागत नसेल तर तुम्ही अधिकारी लोक काय फुगडी खेळता काय त्या ऑफिस मध्ये झक मारी शिक्षक भरती .....
@dadajibhuse@kamblesandeep12