@BaliramDoleyINC MPSC परीक्षा Objectiveच पाहिजे!
वर्णनात्मक परीक्षेची पद्धत रद्द करून 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीनेच घेण्यात यावी, ही आमची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे.
पारदर्शकता, समान संधी आणि निष्पक्ष मूल्यमापनासाठी Objective परीक्षा हाच योग्य पर्याय आहे.
@BaliramDoleyINC राज्यसेवा 2025 , मुख्य परीक्षा 2754 उमेदवार पात्र मात्र परीक्षा दिली फक्त 1394 ने 1360 विद्यार्थी अनुपस्थित होते.... वर्णनात्मक परीक्षेला एवढी मोठी अनुपस्थिती विद्यार्थ्यांचं कल दर्शवतो के ते वर्णनात्मक परीक्षा पद्धत आस्विकार करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor@MahaDGIPR@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी,
@Dev_Fadnavis
🔶 आज आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सूचना आहेत आणि समितीने शिफारस केली तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
🔶 मुळात दळवी समिती ही राजकीय वरदहस्त असलेली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली समिती होती. त्यांच्या शिफारशींबाबतही विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, या वादात न जाता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, त्या समितीच्या निर्णयातून निर्माण झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या गोंधळातून मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.
🔶 आम्ही २०२२-२३ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी हा लढा लढत आहोत. विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरताना आम्ही सातत्याने नैतिकता जपली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
🔶 सरकारकडून दिलेल्या आश्वासनाचा आदर करत आम्ही नैतिकतेच्या भूमिकेतून एक वर्ष संयमाने वाट पाहिली. मात्र, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी अपेक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आणि आम्हाला पुन्हा ही मागणी घेऊन आंदोलन करावे लागले.
पण ही मागणी आणि दिलेले आश्वासन तातडीने अंमलात आले नाही, तर आजपर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठा लढा आम्ही रस्त्यावर लढू, एवढे मात्र नक्की.
🔶 आज आपण या पूर्णतः अराजकीय मागणीची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहात, याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.
@maha_governor@MahaDGIPR@mpsc_office@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@News18_marathi@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@bolbhidu@RahulAsks@omkarasks@sahiljoshii@GondaneDevesh
पेपरफुटीप्रकरणी MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासह लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत. याच मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चात मीदेखील सहभागी होणार असल्याचा शब्द पुण्यात विद्यार्थ्यांशी बोलताना दिला आहे. त्यासाठी पोलीस सहआयुक्त संजय दराडे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे साहेब, उपायुक्त ऋषिकेश रावले साहेब आणि मिलिंद मोहिते साहेब यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विनंती केली. या भेटीवेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी त्यांच्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे. सरकारला २ दिवसांचा वेळ आहे. या काळात सरकारने अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतरही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संघर्ष अटळ आहे. येत्या काळात आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या संघर्षाची व्याप्तीही वाढवू आणि विद्यार्थी व शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ आणि निर्णय घेण्यास भाग पाडू..!
#विराट_आक्रोश_मोर्चा #Protest #MPSC
विभागांतर्गत (डिपार्टमेंटल) PSI पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जण मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली आहे.
FDA पेपरफुटीमधील आरोपी अभिजीत लेंडवे आणि त्याच दर्जाचा इतर एक अधिकारी यात सहभागी असल्याचे पुरावे आमच्याकडे आले आहेत, याचा लवकरच खुलासा करू.
कुठल्याही परिस्थितीत मेहनत करून पास झालेल्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन गैरप्रकार करणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. अभिजीत लेंडवे सारख्या अधिकाऱ्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आयोगाची प्रतिष्ठा खराब केली असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडे गेले असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून आयोग मुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठीच पुण्यात उद्याचा मोर्चा आहे.
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
मार्च महिना संपत आला, पण 'Combine Group B, व C 2026 ची जाहिरात कुठे आहे?
वेळापत्रकाचे पालन होणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
विलंबामुळे वयोमर्यादेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
मा. आयोगाने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC#Combine2026
शासकीय ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल दुकानात नियमित तपासणी करून जातो..
शेरा मारतो..
आणि दुकानदाराला नोटीस येते..अमुक नाही.. तमुक नाही...
१४ दिवस दुकान बंद ठेवण्याची कारवाई होते..
दुकानदार शिक्षेविरोधात अपील करतो..
मंत्रालयात संबंधित मंत्र्याचा दालनातील क्लार्क ५० हजारांची मागणी करतो..
संबंधित मंत्र्याच्या ओएसडी शी भेट घालून देतो...दुकानदार म्हणतो..माझे दुकान लहान आहे..एवढे पैसे नाहीत...पण किंमत कमी होत नाही..
शेवटी त्या लिपिकला मंत्राच्या दालनात पैसे घेताना रंगेहात पकडण्यात येते..अँटी करप्शन कडून...चक्क मंत्रालयात..मंत्र्याच्या दालनात...
मंत्र्याच्या दालनातील ओयस्डी...लिपिक पैसे घेतात ही मंत्र्याला ठाऊक नसेल?
असल्या गोष्टींवर न बोलता...टिपू ला बाप बनवून कोरटकर वेळी कुठे होता? कोश्यारी ने अमुक केलं...
असल्या गोष्टीत विरोधकांचा इंटरेस्ट आहे...
@Dev_Fadnavis झिरवळ प्रकरण लक्ष द्या...🙏
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
काल यावेळी वाटलं सगळ संपलं पण आज संघर्षायोद्ध आदरणीय मनोज दादा जरांगे पाटिल काहीच वेळात MPSC आंदोलनात सहभाग घेणार म्हणाले की वाटलं जिंकले गोर गरिबांचं पोरं जिंकले....😎😎🔥
पाटील is On the way to Pune 🔥🔥
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR#MPSCआंदोलन