नव्या सेवा प्रवेश नियमांविरोधात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संताप...
राज्यसेवा परीक्षा मधील संवर्गाचा #स्वातंत्र्य_केडर तयार करून #कट-ऑफ लावण्यात यावा.
#MPSC#कॉमर्स
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या 'उपलेखापाल' या पदभरतीसाठी ३ वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदवीमध्ये 60% गुणांची जाचक अट ठेवण्यात आली आहे.@CMOMaharashtra@mieknathshinde@MahaDGIPR@MMRDAOfficial
MMRDA 2018 साली प्रसिद्ध झालेल्या याच 'उपलेखापाल' पदाच्या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची किंवा विशिष्ठ गुणांच्या टक्केवारीची अट नव्हती. केवळ वाणिज्य पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी पात्र होते.@MahaDGIPR@CMOMaharashtra@MMRDAOfficial@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या संयुक्त पूर्व परीक्षा ( गट ब ) 2025 साठी एकूण 674 पदे जाहीर झाली आहेत. त्यात 392 पोलीस उपनिरीक्षकांची पदे आहेत. साधारणतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी या महिन्यात येते आणि परीक्षा मार्च महिन्यात होते. परंतु यावर्षी ही जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघाली असून त्याची परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी एक नोव्हेंबर 2025 ही तारीख वयोमर्यादा मोजण्याची निश्चित करण्यात आले आहे. पण या तारखेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय सहा-सात महिन्यांनी वाढलेले दिसते. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून ते आपोआप परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, परंतु त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझी शासनाला विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रात्रीचा दिवस करुन मेहनत केली आहे. केवळ किरकोळ तांत्रिक कारणास्तव थोडक्यात त्यांची संधी हिरावून घेऊ नये.तरी परीक्षेची तारीख (२१ डिसेंबर) पुढे न जाता उमेदवारांना परीक्षा देण्याची सवलत देण्यात यावी ही विनंती.
@CMOMaharashtra@mpsc_office
ST महामंडळात 17,450 पदांची कंत्राटी चालक व सहाय्यक पदांची भरती करण्याचा निर्णय शिंदेच्या मंत्र्यांनी घेतला आहे.
कंत्राटी भरतीने कर्मचाऱ्यांचे शोषण तर होतेच परंतु कोणतीही विशेष भरती परीक्षा न घेता अशी पदभरती केली जाते. पुढं हेच कर्मचारी कायम करावे म्हणून मुंबईत आंदोलनाला बसतात. दोन्ही बाजूंनी नुकसान होत असल्याने शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय रद्द करावा आणि कायमच्या भरतीची जाहिरात काढावी. कंत्राटी पदभरतीचा जाहीर निषेध, प्रताप सरनाईकांना विनंती आहे आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@PratapSarnaik@msrtcofficial .
महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये लेखापाल गट- क या पदासाठी राज्य शासन सेवेतील ५ वर्षे अनुभव अट घालण्यात आली आहे. तर शासनाला विनंती आहे ही अट शिथिल करण्यात यावी.@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Mpsc_Andolan@AbhiPawarBJP
महाट्रान्सकोच्या परीक्षेसाठी उमेदवारांना मिळालेले परीक्षा केंद्रे कसे आहेत ते एकदा बघून घ्या. उमेदवारांना दूरवरचे परीक्षा केंद्र दिले गेले आहेत आणि जे परीक्षा केंद्र मिळाले आहेत त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राज्यातील तरुणांचे भविष्य अंधारात लोटू नका. सरळसेवा परीक्षांसाठी फक्त TCS ION परीक्षा केंद्र म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने तत्काळ जाहीर करावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@AUThackeray@MSEDCL
पारदर्शक परिक्षा घेण्याबाबत सरकारी यंत्रणा गंभीर तर नाहीतच उलट पोरखेळ करत आहेत. महाट्रान्सकोच्या परिक्षेसाठी मुलांना एकतर २००-३०० कि. मी. लांबची सेंटर दिली गेली. त्यातही TCS केंद्रांची मागणी करूनही खाजगी केंद्र देण्याचा आडमुठेपणा करण्यात आला. आतातर हद्द म्हणजे परिक्षा केंद्रांवर ना भौतिक सुविधा आहेत ना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्यात. एकंदरीतच महाट्रान्स्कोला विद्यार्थीहित महत्त्वाचं आहे की हेकेखोरपणा हा प्रश्न पडला आहे.
सरकारने तात्काळ महाट्रान्स्कोला राज्यभरातील परिक्षा केंद्रांची पुनर्पडताळणी करून सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत निर्देश द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@Dhananjay4INC मा. देवेंद्र जी,
महाट्रान्सको परीक्षा (१ ऑगस्ट २०२५) साठी उमेदवारांना २००-३०० कि.मी. दूर खासगी केंद्रे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होतोय.
कृपया आपण तात्काळ हस्तक्षेप करून TCS मार्फत परीक्षा घेण्याचे आणि जिल्हास्तरीय केंद्रे देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
संदर्भ: महाराष्ट्र_काँग्रेस/रोजगार विभाग/२०२५/२८०७०१.
प्रति,
मा. रवींद्र गायकवाड
पोलीस निरीक्षक,
बंड गार्डन पोलीस स्टेशन,
पुणे – ४११००१
विषय: गुरुवार दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियोजित शांततामय आंदोलनाबाबत.
आंदोलनाचा तपशील:
• दिवस व तारीख: गुरुवार, ३१ जुलै २०२५
• वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:००
• स्थळ: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, ससून हॉस्पिटलसमोर, स्टेशन रोड, पुणे – ४११००१
• उद्देश: जलसंपदा व जलसंधारण विभागातील रिक्त स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अभियंता पदांच्या भरती संदर्भातील मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे.
• आयोजक: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष.
@INCHarshsapkal@arvindshinde7@CPPuneCity@BundgardenP@degree_holders
मा. देवेंद्र जी,
महाट्रान्सको परीक्षा (१ ऑगस्ट २०२५) साठी उमेदवारांना २००-३०० कि.मी. दूर खासगी केंद्रे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होतोय.
कृपया आपण तात्काळ हस्तक्षेप करून TCS मार्फत परीक्षा घेण्याचे आणि जिल्हास्तरीय केंद्रे देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
#MahaTransco #ExamJustice