काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.
साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं!
कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोल��� नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन!
चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला!
लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता!
महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत!
पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत?
सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्त�� करणं कितपत योग्य आहे?
शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity @PuneCityTraffic @PuneCityPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ChakankarSpeaks @supriya_sule @iambadasdanve @anjali_damania @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @mnsadhikrut @MahavikasAghad3 @Awhadspeaks @VijayWadettiwar @mohol_murlidhar @DhangekarRavii
#चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरती विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उमेदवारांची स्थिती #चिंताजनक.
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या पदभरती बाबत काही उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, चंद्रपूरचे - जिल्हाध्यक्ष ऍड. राम इंगळे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतल��.
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्डाला आमचे आवाहन आहे, झालेली बोगस भरती तत्काळ रद्द करावी आणि TCS/IBPS मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी. तसेच राज्य सरकार आणि सहकार विभागाला विनंती आहे, राज्यातील जिल्हा सहकारी बँकेतील भरतीबाबत विशेष धोरण आखण्यात यावे. पदभरती पारदर्शक होण्याकरिता या परीक्षा MPSC आयोगामार्फत किंवा TCS/IBPS मार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात यावा.
उपोषणकर्त्या उमेदवारांची स्थिती चिंताजनक असून #CDCC बँकेला आणि शासनाला आमची विनंती आहे कृपया मागण्या मान्य करून यातून मार्ग काढण्यात यावा.
@Dev_Fadnavis @SMungantiwar @VijayWadettiwar @SVW790 @CMOMaharashtra @MahaChiefSec @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE
काय तो अहंकार? आणि म्हणे आम्ही मागास आहोत. सुंभ जळाला पण पीळ गेला नाही! आरक्षण पाहिजे ही प्रामाणिक भूमिका नाही तर दलित, आदिवासी व इतर भटक्या गरीब समूहाच्या द्वेषातून ही अशी भाषा येते असं वाटतं.
महाराष्ट���रासारख्या प्रगत राज्यात असे दृश्य म्हणजे आताच्या अपयशी सरकारचा आरसा आहे.
शिक्षक भरतीची TAIT परीक्षा घेऊन महिने उलटले तरी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करून शिक्षक भरती करण्यात येत नाहीये, त्याविरोधात या तरुणाने आवाज उठविला आहे.
शिक्षणमंत्री गेल्या काही महिन्यांपासून म्हणताय ५०-५५ हजार शिक्षकांची भरती करू पण त्याचा मुहूर्त काही केल्या त्यांना सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यात श��ळा दत्तक देऊन बेरोजगार शिक्षकांना कायमचे बेरोजगार करण्याचे निर्णय शासनाकडून आखल्या जात आहेत.
कंत्राटी भरती करून कायमच्या नोकऱ्यांना संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरतीच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या, अन्यथा पुढ��ी निवडणूक जवळच आहे.
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनेचा_निषेध
@dvkesarkar @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @surmayu
#विद्यार्थी#serious पणे रोज वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत आहेत.#परीक्षा_फी साठी उसने करून का होईना पण हजारो रुपयांचे #परीक्षा_शुल्क#serious पणे भरत आहेत. serious पणे अभ्या��� करून घरापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा सुद्धा देत आहेत.पण हे सर्व करूनही #पेपरफुटीच्या समोर येत असलेल्या रोजच्या घटनांमुळे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाही नाही .राज्यातील #युवावर्ग आज हतबल झालाय तरी सरकार #serious नाही. दुर्दैवाने आज राज्याची हीच वस्तुस्थिती आहे.
@CMOMaharashtra
लूट !! लूट !! बेरोजगारांची लूट !!
TCS ION परीक्षा केंद्र हडपसर, पुणे येथील परीक्षा केंद्राबाहेरील रस्त्यावर बाईक पार्किंगसाठी २०/- रुपये घेण्यात येत आहेत. आजवर तिथं रस्त्यावर गाड्या लावण्याच��� रुपयाही घेण्यात येत नव्हता. पुण्यात सम/विषम दिवसात योग्य ठिकाणी पार्किंग निःशुल्क असते.
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० ���ुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय?
#पावसाळी_अधिवेशन-२०२३
कोण म्हणतंय सरकारकडे पैसा नाही?
जाहिरातीवर करोडो रुपये लावण्यात येत आहेत, रोजच पाने भरून स्वतःची स्तुती करण्यात येत आहे
तेवढं नोकरभरती करतानाच सरकारी तिजोरीवर भार पडतो. लक्षात ठेवा गरीब हा गरीबच राहण���र.बेरोजगाराला,बेरोजगारच ठेवण्यात येईल.नव्या युगातील गुलामगिरीची हीच पध्दत आहे
#सरळसेवा भरतीसाठी इतकी जास्त फी कशी?
असे खुप जण विचारत आहेत.
तुम्हाला जर वाटतं असेल फी जास्त आहे. कमी व्हावी,
तर तुमचे परिसरातील आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री, यांच्यामार्फत हा विषय @Dev_Fadnavis & @CMOMaharashtra@mieknathshinde यांच्यापर्यंत गेला पाहिजे तरच बदल होईल.!
सरकार ला १९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे व नवीन नियम तयार करून १२+पदवी धारक ना सामावून घेण्याचा अधिकार आहे.मग सरकार मुद्दाम हा मुद्दा का पेटवत ठेवते?का एकदाचा सोक्षमोक्ष लावत नाही?
#Allow_BE_For_JE@Dev_Fadnavis@mieknathshinde@Deepakk75058621
🔴 बायोमेट्रिक हजेरी झाल्यावर परीक्षार्थी थेट परीक्षाकक्षात न जाता बाहेरचं सोडले जात आहेत.
अश्या बायोमेट्रिक हजेरीला काय अर्थ?
🔴 यामुळे डमी उमेदवार बसण्याची दाट शक्यता.
@mpsc_office
फडणवीसांनी वाचलेल्या अर्थसंकल्पात बेरोजगारांसाठी फक्त गाजर आहेत.
पाच-सात महिन्यांपासून भाजपवाले ओरडुन-ओरडुन सांगत आहेत #७५,००० मेगाभरती करू पण प्रत्यक्षात जाहिरातीच नाहीत. २०१९ सारखी फेका-फेकी केलीच तर बेरोजगार पुढल्या निवडणुकीत भाजपला कसब्याची जागा दाखवून देतील. @Dev_Fadnavis
शिंदे-फडणवीस सरकार नोकऱ्या देण्यास असमर्थ ठरले आहे, #ZP भरती रद्द केल्याच्या विरोधात उपोषणास बसण्यात येणार होते. पुणे पोलिसांनी पाच दिवसांआधी दिलेली परवानगी आज अचानक नाकार���ी. लोकशाही मूल्यांची गळचेपी होत असून,गरीब बेरोजगारांना मरणयातना भोगण्यासाठी सोडून देण्यात आले आहे.