लिपीक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध होऊन 2 महिने होतील, तरीही गुणवत्ता यादी जाहिर झालेली नाही. न्यायालयीन अडचणी या 9 डिसेंबरलाच दूर करून निकालाचा मार्ग मोकळा करावा ही विनंती .
@mpsc_office
वन विभाग मधील पद वनरक्षक १६८४ रिक्त पदे व वनसेवक १२९९१ रिक्त पदे आहेत.तरी आपण आचारसंहिता आदी वनरक्षक व वनसेवक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करावी.#वनरक्षकभरती#वनसेवकभरती
महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय घेणारे मा. @Dev_Fadnavis (देवाभाऊ) जरा #mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे थोडं लक्ष देऊन आपल्या गृह विभागातील #PSI पदाची मागनीपत्रक लवकर आयोगाकडे पाठवावे.
फक्त आपल्या विभागाचे मागणीपत्रक #MPSC
न गेल्या मुळे जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
मा. सचिव मॅडम, @Drsuvarnas
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक २०२३ कौशल्या चाचणी होऊन ६५+ दिवस झाले तरी TCS कडून आपण अहवाल मागवला नाही.. या कार्य तत्परता भूमिकेसाठी आपले आभार.
आत्ता तरी तो अहवाल मिळून मुलांना न्याय द्यावा.
@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mpsc_office
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
@bb_thorat@RVikhePatil Sagl politics aahe....aaj jar thorat saheb sattet aste tr vikhe sahebani tyana virodh kela asta...jar evdhech kalji aahe saglyana tr selection jhalelya candidate chi chaukashi kra na cctv check Kara 4500 ha kay motha aakda nahi.... chaukashi karayla Jamel sarv collector office la
1 ते 3 जुलै रोजी होणारी टायपिंग एक्साम 10 ते 13 जुलै होणार आहे. मा @mpsc_office
विनंती आहे की मराठी आणि इंग्लिश साठी सारखे key board उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून सर्वांना समान वागणूक भेटेल. पुन्हा विनाकारण विद्यार्थी MAT मध्ये जाणार नाही.
@Suvarnakharat4
@Dev_Fadnavis सर जलसंपदा विभागाची परीक्षा 31 डिसेंबर ला झाली,6 महिने उलटून गेली तरी निकाल लागला नाही, हे खाते तुमच्याकडे असल्यामुळे संबधित विभागाला निकाल लवकरात लवकर लावण्याचे आदेश द्यावेत, आम्ही फोन केला असता आम्हला अधिकारी उडवाऊ डवीची उत्तरे देतात.सर मागणीकडे कृपा करून लक्ष द्यावे.
मा. @mpsc_office
उद्या पासून सुरू होणारी स्किल टेस्ट मध्ये कोणताही प्रॉब्लेम नको.
सर्व प्रॉब्लेम सोडवलेले असतील. अनेक विद्यार्थी मराठवाडा आणि विदर्भातुन येत आहे. एवढा खर्च करून पुन्हा कॅन्सल नको.
सर्व त्रुटी आजच सोडवून ठेवा.
एवढी विनंती.
@Suvarnakharat4
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis Kont jari sarkar aal tri je vhaych te honarch aahe...aani opposition la je astil te tika ch karnar....konalach mulanchya future chi kalji nhi...