विद्यार्थ्यांच्या विरोधामुळं सरकारने MPSC ची ऑनलाईन परीक्षा वर्षभर पुढं ढकलली असली तरी खरं कारण म्हणजे सरकारला पुढील वर्षीपासून घोटाळ्यांची 'डिजिटल' पूर्वतयारी करायचीय असं दिसतंय. सत्तेतील लाडके आमदार आणि सत्ताधाऱ्यांशी संबंधित टोळ्यांनी आतापासूनच ऑनलाईन परीक्षेच्या नावाखाली 'डिजिटल क्लासरुम' उभारण्यासाठी हजार-दीड हजार कोटींची गुंतवणूक सुरू केलीय! विश्वास नसेल तर 'लातूर' मध्ये जाऊन याची शहानिशा करु शकता.
शिवाय ज्यांच्या राजीनाम्याची विद्यार्थी मागणी करत आहेत, त्या MPSC चे अध्यक्ष भिमनवार यांना ऑनलाईन परीक्षेचा हाच 'काळा बाजार' राबवण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलंय का? पण लाडक्या आमदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा असा जाहीर ‘डिजिटल लिलाव’ आम्ही होऊ देणार नाही आणि भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामाही घेतल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या नावावर सत्ताधाऱ्यांसाठीची दुकानदारी विद्यार्थीच बंद केल्याशिवाय थांबणार नाहीत!
#MPSC #StudentsFirst #MPSCTransparency #StopExamScam
MPSC उच्चस्तरीय समितीचे सर्व सन्मानित सदस्य,
आपल्या सर्वांबद्दल आदर आहे, परंतु एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, हे समिती सदस्यांचे वक्तव्य पटले नाही. एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, म्हणजे एक वर्षानंतर ऑनलाइन होणार आहे का? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
वर्षभर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार नाही, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार मांडलेली भूमिका विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठीच भिमनवार साहेबांना ताकद दिली गेली आहे आणि समिती देखील ऑनलाईनच्या बाजूचीच भूमिका पुढं रेटणार असेल तर समितीचे पुढचे दौरेच विद्यार्थी होऊ देणार नाहीत. त्यामुळे आपण ऑनलाईन परीक्षेच्या विरोधातील विद्यार्थ्यांची भावना समजून घ्यावी.
एक वर्षच काय, पुढचे शेकडो वर्षे सुद्धा #MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
@RRPSpeaks ✅ऑफलाइन परीक्षा पद्धती हवी.
Group B & C जागा वाढ हवी .
✅ परीक्षा झाल्यापासून Joining पर्यंतची प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण.
✅ One Candidate – One Post हे धोरण हवे.
✅ दरवेळी १०–१५ प्रश्न रद्द होतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता आणि अचूकता.
या महत्वाच्या मागण्या बाकी.
मा. भिमनवार साहेब,
‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली प्रतिक्रिया असल्याचं समजलं. ज्या आयोगावर अढळ विश्वास ठेवून 45 लाख विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात आणि आपल्या कार्यकाळात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटत असेल तर ती आपली नैतिक जबाबदारी नाही का?
“औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा” ही आपली प्रतिक्रिया वस्तुस्थिती आहे का? आपण रुजू होण्यापूर्वी जानेवारीत पेपर फुटला होता तर मार्चमध्ये पेपर घेतलाच का? हे आपलं अपयश नाही का? “पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून MPSC मध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्याचं आपण म्हणत आहात मग पेपर कसा फुटला?
“तक्रार प्राप्त होताच पोलिसात तक्रार केली” ही आजची आपली प्रतिकिया आहे. जेंव्हा विद्यार्थ्यांनी FDA च्या पेपरफुटीची तक्रार केली तेंव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आठवून बघा. “पुरावा नसताना मोघम ई-मेल मिळाला, तक्रारकर्त्याने माघार घेतली, दुसरा तक्रारकर्ता नापास झाला म्हणून त्याने तक्रार केली’’ ही आपली प्रतिक्रिया होती, तेंव्हा तुम्ही आणि तुमचा आयोग तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांवरच कारवाई करायला निघाला होतात, हे आपण विसरलात का?
राहिला विषय तुमच्या कार्यकाळातील सुधारणांचा, तर ऑनलाइन परीक्षा घेण्याची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातली होती? ऑनलाइन घेण्यामागे काय डाव होता? हे पण सांगा. पुरव्यांबाबत बोलायचं तर FDA पेपरलीकचं जसं भलं मोठं प्रेझेंटेशन केलं होतं तसं भलं मोठं प्रेझेंटेशन लवकरच करणार आहे आणि तेही पुराव्यासकट… त्यामुळं राजीनामा देण्यास विलंब करू नका..!
खऱ्या अर्थाने व्यथित झाला असाल तर नैतिकता दाखवा आणि विद्यार्थ्यांना मोकळं करा.!
#MPSCपेपरफुटी #राजीनामा_द्या #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
१९९७ मध्ये पेपर घोटाळा झाला तेंव्हा तत्कालीन MPSC च्या अध्यक्षांना जबाबदार धरुन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता ३० वर्षांनी पुन्हा MPSC ला पेपरफुटीचा डाग लागला असून आताही १९९७ चाच न्याय विद्यमान अध्यक्षांना का लावला जाऊ नये? याबाबत काय करायचं ते सरकारने ठरवावं, पण आम्ही १ तारखेला आयोगाच्या भेटीसाठी जाऊ तेंव्हा निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याच्या नवीन अध्यक्षांसोबत आमची भेट होईल, अशी अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
सरळसेवा उमेदवारांच्या प्रश्नांवर MPSC कडे निवेदन
महाराष्ट्रातील लाखो युवक युवती वर्षानुवर्षे सरळसेवा शासकीय भरतीची तयारी करीत आहेत. मात्र विविध विभागांच्या स्वतंत्र परीक्षा, स्वतंत्र शुल्क, वेगवेगळे अभ्यासक्रम आणि अनिश्चित वेळापत्रकामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
प्रमुख मागण्या:
1. महाराष्ट्र सरळसेवा राज्यस्तरीय परीक्षा संवर्ग निर्माण करावा.
2. समान स्वरूपाच्या सरळसेवा पदांसाठी एक संयुक्त राज्यस्तरीय परीक्षा घ्यावी.
3. एक परीक्षा, अनेक संधी या तत्त्वावर पदनिहाय पात्रता आणि मेरिटच्या आधारे निवड करावी.
4. सरळसेवा परीक्षांसाठी एकसंध व पूर्वनिश्चित अभ्यासक्रम निश्चित करावा.
5. परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्यात यावी.
6. वाजवी आणि परवडणारे परीक्षा शुल्क निश्चित करावे.
7. MPSC चे वार्षिक परीक्षा वेळापत्रक वेळेत जाहीर करावे.
8. परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि नियुक्तीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी.
आजच्या युवकाला अभ्यास करायचा आहे, वारंवार बदलणाऱ्या परीक्षा व्यवस्थेशी संघर्ष नाही. सरळसेवा उमेदवारांच्या मेहनतीला न्याय देण्यासाठी परीक्षा व्यवस्था निश्चित, पारदर्शक, परवडणारी आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
एक परीक्षा, अनेक संधी हीच सरळसेवा उमेदवारांसाठी योग्य दिशा!
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@bhimanwar@INCHarshsapkal
#MPSC #सरळसेवा #स्पर्धापरीक्षा #रोजगार #युवा #Maharashtra
MPSC ऑनलाईन चा घाट ज्यांनी घातला त्यांच्याच कार्यकाळात औषध निरीक्षक चा पेपर फुटण्याची तक्रार होणे हा निव्वळ योगायोग समजावा की यामागे काही कटकारस्थान समजावे? माननीय अध्यक्ष व माननीय सचिव यांना जर MPSC चा कारभार सांभाळता येत नसेल तर कोणी राजीनामा मागण्यापूर्वीच त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा देणे गरजेचे आहे.
अध्यक्ष आणि सचिव यांनी ऑनलाइन परीक्षेचा हट्ट सोडावा नाहीतर आपल्या राजीनाम्यासाठी आंदोलने झाल्यास नवल न वाटावे..
@mpsc_office@maha_governor@CMOMaharashtra
📢 MPSC विद्यार्थी आंदोलन : काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका!
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नाही. रोजगार, पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या तत्त्वांशी तडजोड करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही.
आज सोमवार २० जुलै, १०१६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत पुणे शहरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक, क्लासेसचे संचालक आणि आंदोलनाशी संबंधित प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. या चर्चेतून मिळणारा अभिप्राय, सूचना आणि अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वासमोर अहवालाच्या स्वरूपात मांडण्यात येतील आणि त्यानंतर पुढील प्रत्यक्ष आंदोलनाची दिशा व भूमिकेबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल.
आज राज्यभर परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयाध्ये प्रचंड असंतोष असून राज्यात ठीक ठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सरकारने ऑगस्ट २०२७ पर्यंत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय पुढे ढकलला आणि सोबत याबाबत एक समिती स्थापन केल्याच्या निर्णयामुळे लाखो परीक्षार्थींमध्ये सरकारकडून “विश्वासघात” झाल्याची भावना निर्माण झाली आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा एका शहरापुरता मर्यादित नाही. हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या न्याय्य हक्कांचा आणि भवितव्याचा लढा आहे.
आमच्या ठाम मागण्या:
१. MPSC सरळसेवा परीक्षा १००% कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
२. ऑनलाइन परीक्षा संदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती तात्काळ बरखास्त करावी.
३. सरळसेवेतील सर्व भरती MPSC मार्फतच करण्यात यावी.
४. सरळसेवेतील ७०,००० रिक्त पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून ती जास्तीत जास्त ३१ डिसेंबर २०२६ च्या आत पूर्ण करण्यात यावी.
५. भरती प्रक्रियेसाठी स्पष्ट आणि कालबद्ध वेळापत्रक जाहीर करून त्याची सार्वजनिक अंमलबजावणी करण्यात यावी. ६. विद्यार्थी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी सल्लामसलत न करता भरती प्रक्रियेत कोणताही मूलभूत बदल करू नये.
विद्यार्थ्यांना आवाहन
MPSC च्या सर्व परीक्षा १००% ऑफलाइन हीच आमची भूमिका होती, आहे आणि शेवटपर्यंत राहील. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असा कोणताही प्रयोग स्वीकारला जाणार नाही. सरळसेवेतील सर्व भरती MPSC मार्फतच आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीनेच झाली पाहिजे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता टिकवणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे.
आजच्या पुण्यातील संवादानंतर, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, मा. विजय वडेट्टीवार, मा. सतेज (बंटी) पाटील व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून काँग्रेस पक्षातर्फे आगामी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल. मात्र त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद राहिला पाहिजे. जोपर्यंत MPSC मार्फत १००% ऑफलाइन परीक्षा आणि ७०,००० पदांच्या भरतीबाबत निश्चित आणि कालबद्ध निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार कमी होता कामा नये.
आम्ही राज्यभरातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, शिक्षक, क्लासेसचे संचालक, माजी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी संबंधित सर्व प्रतिनिधींना आवाहन करतो की, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून या लढ्यात एकत्र या. आजची एकजूटच उद्याचा विजय निश्चित करेल. विद्यार्थ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे, गटबाजी करण्याचे किंवा आंदोलन कमकुवत करण्याचे प्रयत्न हाणून पाडा. व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांचे भविष्य आणि न्याय्य मागण्या केंद्रस्थानी ठेवा.
सोशल मीडियावर आवाज उठवा, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलनात सहभागी व्हा. प्रामाणिकपणे लढणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, संघटना आणि प्रतिनिधींना साथ द्या. अफवा, दिशाभूल आणि नकारात्मक प्रचाराला बळी पडू नका. राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तरदायी धरणे ही लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा नव्हे, तर ऐकण्याचा आणि त्यावर निर्णय घेण्याचा हा काळ आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.
✊ एकच निर्धार
“MPSC मार्फत १००% ऑफलाइन परीक्षा, सहा महिन्यांत ५०,००० पदांची भरती आणि पारदर्शक भरती प्रक्रिया - याशिवाय माघार नाही!”
एकजूट • संघर्ष • विजय !
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
@CongressRojgar
#MPSC #OfflineExams #StudentsFirst #Maharashtra
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde