नाशिक भोंदूबाबा प्रकरण:
डोळे उघडणारे.
पण डोळे उघडायची तयारी आहे का?
हा खरा प्रश्न.
सर्वांनाच सर्व समजते असे नाही.
हे मान्य.
समाज मोठा असतो.
विचार वेगवेगळे असतात.
अंधश्रद्धा का असावी?
हे लोकशाहीत का चालावे ?
काही गोष्टी तर अजिबात
चालू नये.
मुळीच चालू नये.
स्वातंत्र्योत्तर भारत.
विज्ञानयुगातला भारत.
संविधान मानणारा भारत.
उपग्रह सोडणारा भारत.
चंद्रावर पोहोचणारा भारत.
आणि शिक्षणाचे कारभारी?
Astrology & Astronomy
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र यांत फरक न
समजणारे?
ही चूक नाही.
ही दुर्घटना आहे.
बौद्धिक दुर्घटना.
संस्थात्मक दुर्घटना.
भविष्यघात.
खगोलशास्त्र म्हणजे विज्ञान.
निरीक्षण.
गणित.
प्रयोग.
पुरावा.
ज्योतिष म्हणजे विश्वास.
ग्रहदोष.
कुंडली.
अटकळ.
भविष्यकथन.
दोन्ही वेगळे.
मुळातून वेगळे.
स्वभावतः वेगळे.
उद्देशाने वेगळे.
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र
हा फरक न कळणारा माणूस
जर शिक्षणाचा कारभारी झाला
तर पुढील पिढीचे काय?
-महेश झगडे
निर्लज्ज, दुष्ट, पापबुद्धी, कृतघ्न आणि पश्चात्तापहीन यांच्या संगतीत कधीही राहू नका.
निर्लज्जाला सीमा नसते.
दुष्टाला धर्म नसतो.
पापबुद्धीला विवेक नसतो.
कृतघ्नाला निष्ठा नसते.
पश्चात्तापहीनाला भय नसते.
जिथे असे लोक जमतात
तिथे आधी विनाश येतो,
मग अपमान,
आणि शेवटी पश्चात्ताप —
तोही इतरांना!
-महेश झगडे
इथूनच आम्हाला आमच्या राजाची ओळख झाली🙇🚩🙌
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात जन्मलेला एक बालक पुढे जाऊन संपूर्ण भारताच्या इतिहासाला दिशा देईल, असे कदाचित त्या काळात कुणालाही वाटले नसेल. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे सत्य करून दाखवले.
माझं अमूल्य मत स्वाभिमानी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले।। खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या भारताचा।।
--- सेनापती बापट .