न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
राज्यघटनेच्या कलम ३२४ व ३२९ नुसार निवडणूक आयोगाचे उत्तरदायित्व जनतेला आहे सत्ताधारी पक्षाला नाही. जनतेच्या करातून निवडणूक आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पगार मिळतो.
आज मारकडवाडी येथे गावकऱ्यांनी उस्फूर्तपणे मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे.
या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांचे समाधान होईपर्यंत देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का?
निवडणूक आयोग निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या ईव्हीएम मशीन वापरते. या कंपनीचे दोन संचालक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे असून एक संचालक उत्तर प्रदेश भाजपचा उपाध्यक्ष असून दुसरा संचालक राजकोट जिल्हा भाजपचा माजी अध्यक्ष आहे.
या संचालकांकडे ईव्हीएम संदर्भातली गोपनीय माहिती नसेल यावर कुणाचाही विश्वास बसणं कठीण आहे.
निवडणूक आयोगाने नेमलेल्या टेक्निकल एक्सपर्ट कमिटीचे ((TEC) एक सदस्य हे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरात राज्यातील गिफ्ट सिटी, गुजरात ऊर्जा निगम लिमिटेड या कंपन्यांचे संचालक आहेत.
दाल मे काला नहीं, पुरी दाल ही काली है अशी जनतेची भावना होऊ लागली आहे.
आयोगाने शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी जर केली तर जनतेच्या मनातील सर्व शंकांचे निरासन होईल!
दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कुठल्याही महाशक्तीने विसरू नये.
जय महाराष्ट्र ! जय भारत 🇮🇳
#EVM_मुर्दाबाद
नमस्ते डॉ. सुवर्णा मॅडम,
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२३ निकाल लवकरात लवकर जाहीर करुन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
धन्यवाद,
@Drsuvarnas@mpsc_office
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनापत्र!
नमस्कार मित्रांनो,
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनपत्राच्या मागणीसाठी आपण अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होतो. या मागणीसाठी आपण गेल्या आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानात बेरोजगारांचा महामोर्चा आयोजीत केला होता.
आपण हा विषय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी मुंबईतील महामोर्च्यास सक्रिय पाठिंबा दिला, ते स्वतःमोर्चात सहभागी झाले आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करुन आपला विषय मार्गी लावण्याचे सर्व उमेदवारांना आश्वासन दिले होते.
त्या दिवसापासून, आजपर्यंत ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सततचा पाठपुरावा केल्यामुळे आत्ता थोड्या वेळापूर्वी, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी ग्राम विकास विभागाने यासंदर्भात “सूचनापत्र” काढले आहे. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
आज सूचनापत्र निघाल्यामुळे जवळ जवळ २६०० उमेदवारांना हक्काची सरकारी नोकरी मिळेल. सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक चौकटीत लढल्यास नक्की यश मिळते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
२६०० उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे मा. अंबादास दानवे साहेबांचे खूप खूप आभार 🙏.
लडे है…. जिते है 🇮🇳
@iambadasdanve@AUThackeray
@SanjyLakhePatil
@MahavikasAghad3
#DhananjayShinde
माननीय गिरीश महाजन साहेब आपण संकटमोचक म्हणवता आणि #आरोग्य_सेवक_50% पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 3-3 महिने झुलवत ठेवता?...विद्यार्थ्यांनीआपलं काय नुकसान केलं आहे?...विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊन न्याय कधी देणार की नुसती आश्वासनच देणार?
मेहनत घेऊन पास झालो आहोत..
@girishdmahajan
@RRPSpeaks#आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
@RRPSpeaks नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.@mieknathshinde
@RRPSpeaks वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती
@RRPSpeaks Process ला वैतागून जर एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी गिरीष महाजन जबाबदार अ
सेल. गिरीश महाजन ने विद्यार्थांना त्रास देउन प्रवृत्त केलं आहे.माझ्याकडे विद्यार्थांचे रडताना recording आहेत #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@RRPSpeaks 🔥रोहित पवार साहेब 🔥
आरोग्य सेवक 50%
👉वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे.