वक्तृत्व खूप बघितले आता नेतृत्व हवे.महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक संधी तर दिलीच पाहिजे.#राजसाहेबठाकरे#मनसे#मराठी
बाकी मी महाराष्ट्र सैनिक, मी अभियंता 💻
आज एका खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या अस्वच्छ जागेची तक्रार करणार होतो पण FDA आणि FSSAI चा फुलफॉर्म माहीत नसल्यामुळे थोरा मोठ्यांच्या सल्ल्यानुसार विषय सोडून दिला. 🙌🏻
अशी असते पाहणी !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी आज रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना मुंबई - गोवा महामार्ग ह्याची पाहणी केली. पाहणी केली म्हणजे विमानातून खाली पाहिले नाही. तर रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदार सोबत चर्चा केली , स्वतः गाडी चालवून यंत्रणेला पळवले.
आणि नेहमीप्रमाणे सत्तेत बसले कावळे कावकाव करू लागले. म्हणजे पाहणी ची चाचणी योग्य ठरली.
#mumbaigoaexpressway #mns
असा रस्ते बंद करून वगैरे लोकांना त्रास द्यायचा आणि मग म्हणायचं मुलांची भाषा चांगली नव्हती..
तुमच्या कृपेने लोकांच्या आयुष्यात आधीच खूप चिडचिड आहे, त्यात असं काही केलं की लोक उद्धार करणारच ना!
Raj Thackeray is the biggest anti establishment Leader Maharashtra has seen in last few decades at least!
Protests are his home ground! If you want your voices against injustice to be heard by those in power, he is your man!
Tomorrow will be huge…
#Mumbai#CJPProtest
NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
मराठी संगीतात जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात एक सन्मानाचं स्थान झी मराठीच्या शीर्षक गीतांसाठी द्यायला पाहिजे. 😬
काय एकाहून एक सरस गाणी आहेत! एक ऐकलं की रांगच लागते! ❤️
वादळवाट, उंच माझा झोका, कळत नकळत, राधा ही बावरी…
अशोक पत्की, निलेश मोहरीर!!!
आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच.
१) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.
२) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत.
३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ?
४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ?
५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
राज ठाकरेंना अनेक मंडळी सोडून गेली
पण निक्षून सांगतो त्यातली अनेक मंडळी ही राज ठाकरेंनी त्यांचे कान उपटल्यामुळे सोडून गेली
सगळं काही हातून निसटून चाललंय तरीही पक्षशिस्त महत्त्वाची आहे. हे राजसाहेब कृतीतून सांगतात
सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे अनुकरण करायला नको?
“500mm rain in 24 hours. Any city in the world will collapse.”
Yes but that ‘any city in the world’ at least stays fine on remaining 364 days. Why don’t you compare our cities with that city then? 😂 Our cities look and behave as if every day is a ‘500mm rain’ day.
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं. विजयाबाई जवळपास ७० वर्ष तर नक्कीच रंगभूमीवर कार्यरत होत्या. कदाचित गेली काही वर्ष किंवा एखादं दशक असं असेल की त्या कदाचित फारशा सक्रीय नसतील, पण विजयाबाईंसारख्या व्यक्तीच्या असण्याने सुद्धा अनेक माणसं प्रेरणा घेऊन, प्रयोग करत राहतात, त्यामुळे त्यांच्यासारख्यांचं असणं महत्वाचं. जेंव्हा आसपास खुज्यांची खोगीरभरती सुरु आहे असं वाटत असतं तेंव्हा विजयाबाईंसारखी माणसंसुद्धा आहेत हे देखील त्या क्षेत्रातील माणसाला दिलासादायक असतं.
माझी विजयाबाईंच्या बाबतीतील पहिली आठवण १९८८ च्या आसपासची. माझ्या आणि शर्मिलाच्या साखरपुड्यात अर्थात माझ्या सासऱ्यांमुळे म्हणजे मोहन वाघांमुळे पहिल्यांदाच विजयाबईंना भेटण्याचा योग आला . त्यानंर अनेकदा गाठीभेटी झाल्या. मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडला की या मेहता इतक्या सुंदर मराठी कसं काय बोलतात आणि त्यात मराठी रंगभूमीसाठी एवढं काम का करतात ? मग समजलं की मूळच्या विजया जयवंत ! मराठी कुटुंबात जन्मलेल्या ! अर्थात रंगभूमीच्या बाहेरच्या लोकांना अजूनही बऱ्याचदा हा प्रश्न पडतो ! असो . .
माझे मराठी रंगभूमीवर काम करणारे अनेक कलाकार हे परिचयाचे आहेत , अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल चर्चा होत असते परंतु जेव्हा कधी विजयाबाईंचं नाव येतं तेव्हा ते सर्व आपापले कान पकडतात ! मी नेहमी सांगत असतो की मला नाटक हा कलाविष्कार कधी समजलाच नाही , म्हणजे त्याची मांडणी ! माझ्या मते नाटक हा विषय चित्रपट , वेब सिरीज , सिरियल किंवा अजून काही असेल यापेक्षा प्रचंड कठीण आहे ! आणि त्यात विजयाबाईंबद्दल ही सर्व मंडळी जेव्हा भरभरून बोलतात तेव्हा समजतं की या बाई देखील त्याहून समजण्या पलीकडे आहेत !
एखादा माणूस काळाला आकार देतो, का काळ त्या माणसाला घडवतं? याचं उत्तर या दोहोंचा संगम जिथे घडतो तिथे काहीतरी सज्जड घडतं.
मराठी रंगभूमीच्या बाबतीत घडलं ते विजयाबाई, विजय तेंडुलकर असतील, डॉ. श्रीराम लागू असतील किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या रूपाने. या सगळ्यांना आसपासचा काळ कसा बदलतोय, जग कसं बदलतंय याचं अचूक भान होतं. त्या जगाकडे बघण्याची हिंमत होती. इथे हिंमत होती अशा अर्थाने म्हणतोय की आपल्या जगापेक्षा खरंच काहीतरी वेगळं, मोठं बाहेर सुरु आहे हे बघणं, ते मान्य करणं. आणि आपल्या जगात असलं काही नाही हे मान्य करणं आणि त्यातून काहीतरी आपल्या अस्सल भारतीय, मराठी जाणिवांना साजेसं निर्माण करणं, याला एक वेगळी शक्ती लागते. ती शक्ती त्या काळात अनेकांच्यात होती. ती विजयाबाईंच्यात पण होती.
रंगायन' नाट्यसंस्थेच्या त्या प्रमुख संस्थापक. 'रंगायन'ने प्रायोगिक रंगभूमीला आकार दिला. १९६० च्या दशकांत जेंव्हा रंगायनची स्थापना झाली, तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेंव्हा प्रबोधन आणि सामाजिक सुधारणा याच्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात, औद्योगिक पाया रचला जात होता.
यंत्रयुगाशी आणि त्या यंत्रयुगाचा उगम ज्या जगात झाला त्या जगाशी मराठी माणसाची तोंडओळख व्हायला लागली होती. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला सुरुवात झाली होती. साहित्यात प्रयोग होत होते. नेमाडेंचं “कोसला” ज्याने मराठी साहित्यात खळबळ उडवली ते त्याच काळातलं. त्यामुळे मराठी रंगभूमी म्हणजे भव्य सेट्स, मेलोड्रामा याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं नाटक असावं, त्याने किती तिकिटं विकली गेली याची चिंता करू नये, त्याने खऱ्या अर्थाने प्रायोगिक व्हावं याची गरज निर्माण झाली. आणि ती पोकळी विजयाबाईंनी भरून काढली. मराठी सिनेमा बदलायला तयार नसल्यामुळे मोठ्या अपेक्षेने तेंव्हाचा तरुण रंगभूमीकडे अपेक्षेने बघत होता आणि ती अपेक्षा विजयाबाईंनी पूर्ण केली.
विजयाबाईंना कुठेतरी, अस्तंगतला काय चाललं आहे, किंवा गेल्यात जमा आहे याचं एक सुप्त आकर्षण पण होतं आणि भान पण असावं. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची संख्या मोठी, त्यांनी अभिनय केलेली नाटकं पण अनेक. पण त्यांनी दिग्दर्शित केलेली आणि रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली नाटकं म्हणजे हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष, संध्याछाया, वाडा चिरेबंदी.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
आपले महाराष्ट्र सैनिक पक्षाचा विचार, राजसाहेबांचा आदेश, महाराष्ट्र हित यांना २० वर्ष चिटकून बसले आहेत
महाराष्ट्रासाठी जीवही द्यायला तयार असणारे हे मावळे राजसाहेबांनी घडवले. हेच त्यांचं सर्वात मोठं राजकीय यश आहे
जे सत्तेच्या नव्हे तर महाराष्ट्र प्रेमाच्या फूटपट्टीत मोजता येईल
मनसेची सर्वाधिक मते ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी भागात आहेत आणि याच शहरी भागात परप्रांतीय मते सर्वाधिक आहेत.
तरीही या परप्रांतीयांचा विरोध करुन मनसे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेते कारण राजसाहेब हे एकमेव राजकारणी आहेत. जे "मतांसाठी" नाही तर "मराठीसाठी" लढतात.
तुकाराम मुंढेंना वाढता पाठिंबा आशादायी आहे!
आता फक्त देवेंद्र फडणविसांनी मित्र मंडळींचे हितसंबंध बघून त्यांची बदली करू नये हीच प्रार्थना!
निदान एका विभागाला तरी राजकारणापासून बाजूला ठेवा. PLEASE!
@Dev_Fadnavis@Devendra_Office