TET पेपरही फुटला... महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम!
महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण, आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली आहे, ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात TETचा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने कष्ट करून, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. पण काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्या सर्व मेहनतीवर एका क्षणात पाणी फेरले गेले.
ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भविष्याची चोरी आहे.
सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यातच व्यस्त असते. दरवेळी दोषींवर कारवाई करू असे सांगितले जाते, पण पुढचा पेपर पुन्हा फुटतो. याचा अर्थ दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत आहे.
आज महाराष्ट्रातील युवक बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा पेपर नेमका कसा फुटला? त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का? याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून चालणार नाही, तर या रॅकेटमधील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@dadajibhuse
#TETexampaperleak #PaperLeak #TETExam
news @lokmat 🗞️
अयोध्येच्या राम मंदिरातील देणग्या चंपत; सोनं, चांदी, पैशांची बंडलं ट्रस्टच्या लोकांनीच चोरले; ८ जणांना अटक. ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि मुख्य ट्रस्टी अनिल मिश्रा यांचे राजीनामे; पण त्यांच्या अटकेची मागणी.
आता टीईटी (TET) अर्थात 'शिक्षक पात्रता परीक्षे'चाही पेपर फुटला. NEET असो की TET या सरकारला एकही परीक्षा नीट घेता येत नाही हे देशाचं दुर्दैव आहे.
NEET चा पेपर फुटल्याने ती रद्द करावी लागली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. जरी ही परीक्षा पुन्हा घेतली गेली, तरीही या एकंदर प्रकरणात शिक्षणक्षेत्राबाबत शासन कसे उदासीन आहे, या खात्याचा कारभार किती गलथान आहे हे संपूर्ण देशाने पाहिले. महाराष्ट्र परीक्षा परिषदेने 'नीट'च्या पेपरफुटीतून धडा घेतला नाही हे स्पष्ट आहे.
NEET परीक्षा घेण्यासाठी सरकारने लष्कराला पाचारण केले होते. आता शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यासाठी एखाद्या 'अदृश्य महाशक्ती'ची मदत घेणार का?
@CMOMaharashtra
महाराष्ट्रातील TET पेपरफुटीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की भाजप सरकारला कुठलीच परीक्षा व्यवस्थित पद्धतीने घेता येत नाही.
त्यांचे लक्ष केवळ राजकीय डावपेचांवर असून, पक्ष फोडणे आणि आमदार-खासदारांना विकत घेने यावरच केंद्रित आहे.
TET पेपरही फुटला... एक परीक्षा ही व्यवस्थित घेऊ न शकणारे बेजबाबदार महायुती सरकार!
आज पेपरफुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,ही संतापजनक बाब आहे.
उद्याच्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याच्या बातम्यांमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आली.
परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींनी काय कपडे घालायचे याचे कडक नियम लादले जातात, पण या सरकारला एक परीक्षा पेपर न फुटता घेता येत नाही? सरकारची जबाबदारी कुठे?
यापूर्वी NEET पेपरफुटीचे धागेदोरेही महाराष्ट्रात सापडले.एकामागून एक स्पर्धा परीक्षांमध्ये गोंधळ होत असताना सरकारकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाय का दिसत नाहीत?
लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, आर्थिक आणि मानसिक संघर्ष करतात,पण काही लोकांच्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. ही केवळ पेपरफुटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि भविष्याशी केलेला विश्वासघात आहे.
सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे पेपर नेमका फुटला कसा? यामागे कोणाचा हात आहे? यातील लोकांना राजकीय संरक्षण आहे का? वारंवार पेपरफुटी होत असतानाही आतापर्यंत काय कारवाई सरकारने केली?
आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असलेल्या या सरकारला शेतकरी, तरुण, विद्यार्थी यांच्या समस्यांशी देणंघेणं नाही.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींना अटक झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे!
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला!
भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने!
गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे.
दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची?
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
कधी MPSC…
कधी NEET…
आता TET !
विभागातील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचे मुख्य कारण आहे.
ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET आणि विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो आणि यामुळे येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य तर वेगळंच !
TET ची केस थोडी वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्याही सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे 20-30 वर्षे सेवा केलेले शिक्षकही जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहे त्यांना सुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचंच पापच या व्यवस्थेने केले आहे.
आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास 80 वर्षे होतील. जग Artificial Intelligence आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचलं आहे. पण आपण अजूनही पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण MPSC चे निकाल वेळेवर देऊ शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो.
या सर्वच विषयांवर मी परवाच विधिमंडळात आवाज उठवत याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये, ही व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझं ठाम मत आहे.
The TET paper leak in Maharashtra proves that the BJP govt can’t conduct even a single exam.
All they can do is break political parties and poach MLAs and MPs.
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
#NEET परीक्षा नीट पार पडत नाही तोच आज शिक्षक पात्रता परीक्षेचा #TET पेपर फोडून पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलं. मुळात या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाल्यामुळं कुठल्याही परीक्षेच्या पेपरफुटीला हे सरकार आळा घालू शकत नाही. आता या पेपरफुटीमुळं #TET परीक्षेची तयारी करणाऱ्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतोय, याची जबाबदारीही घेऊन सरकारने माफी मागावी आणि याला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी.
@Dev_Fadnavis
भारत की शिक्षा व्यवस्था आज सिर्फ़ एक वसूली तंत्र बन गई है।
ज़रा सोचिए - देशभर के परिवार जितना पैसा सिर्फ़ NEET की तैयारी पर ख़र्च करते हैं, वो भारत सरकार के पूरे शिक्षा बजट के बराबर है।
आज कोटा से, और देश के हर कोने से, लाखों युवा एक सुर में कह रहे हैं - इस व्यवस्था ने हमारे साथ अन्याय किया है।
हर युवा अलग है, पर सबकी कहानी एक - या तो सपने देखने नहीं दिए गए, या देखे हुए सपने तोड़ दिए गए।
‘छात्रों की गूंज’ सिर्फ़ अभियान नहीं - एक क्रांति है। हमें एक ऐसी व्यवस्था बनानी है जो आपको बड़े सपने देखने का हक़ दे और आपकी ज़िंदगी गिरवी रखे बिना, उन्हें पूरा करने में आपका साथ दे।
#ChhatronKiGoonj