साहेब, तुमचं कोणी ऐकत नाही काय❓@dadajibhuse
4 महिने झाले तरी बिंदूनामावली पूर्ण होतं नाही.
शिक्षण विभागाला तुकाराम मुंडेची नितांत गरज.. बाकीच्यांनी आश्वासनाचे कागदी घोडे नाचवणं बंद करा आणि तात्काळ शिक्षकभरती कडक आदेश द्या, लढावं का लागतंय..! @MahaDGIPR@Dev_Fadnavis@RRPSpeaks
TAIT-3 परीक्षेला १ वर्ष पूर्ण!
पण महाराष्ट्रात शिक्षकभरतीचा पत्ता नाही. ⚠️
हजारो तरुण बेरोजगार ठेवून सरकार नक्की काय साध्य करतंय? तात्काळ पवित्र पोर्टलवर भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश द्या!
#दादा_भूसे_राजीनामा_द्या@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawar
पवित्र पोर्टल वरती जाहिरात देण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत वाढ शेवटची आणि अंतिम समजून जास्तीत जास्त जागा पोर्टल वरती द्यावेत असे कडक आदेश आपल्या स्तरावरून द्यावेत आणि मनपा,नपा,आदिवासी आश्रम शाळा जाहिराती पाहिल्या टप्प्यात द्यावेत ही नम्र विनंती @dadajibhuse
मराठी शाळा बंद का होत आहेत? याला जबाबदार कोण?स्वतः पालक ? की सरकार?भाषेची लाज का वाटते?कॉन्व्हेंट शाळा जास्त का वाढत आहेत? याचा परिणाम ग्रामीण भागातील गरिबांच्या शिक्षणावर कसा होतो?शासनाची उदासीनात? सर्व उत्तर मिळतील धन्यवाद @hemantdhome21 सर हा ज्वलंत मुद्दा उपस्थित केल्याबद्दल
अनेकदा विरोध करूनही महाराष्ट्र शासनाचे कंत्राटी भरतीचं खूळ काही कमी होत नाही. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, लाखो गुणवत्तापूर्ण TET, TAIT, B.Ed/D.Ed उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असं असूनही शासन कायमस्वरूपी भरती काढतंच नाही. सरकारकडून पद्धतशीरपणे पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि आता तेच कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत, यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण का नाकारलं जात आहे? शासनाने १८,६०८ कंत्राटी नव्हे तर १८,६०८ कायमस्वरूपी शिक्षकांची मेगा भरती करावी आणि शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तत्काळ थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@dadajibhuse
अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks@Sujat_Ambedkar@AjitPawarSpeaks
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र" मार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde
सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाठ साहेब व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांना शिक्षकभरती जलद मोठ्या प्रमाणात करावी, कंत्राट शिक्षकभरती रद्द करावी ,समूह शाळा योजना कायमचे बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
अगोदर हिंदी मराठी वाद लावला,त्यानंतर राज्यातील रोजगार पळवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता गोरगरिबांचे शिक्षण बंद करायला सुरुवात झाली
शिक्षणआयुक्त यांच्या काल झालेल्या VC नुसार राज्यातील 0 ते 5 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद होणार.!
समूह शाळा सुरू होणार.
त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार तर हजारो मूल शाळाबाह्य होणार वंचित,दुर्लक्षित घटकाचे शिक्षण नष्ट होणार
"RTE ACT आणि भारतीय संविधान कलम 21 A शिक्षणाचा मूलभूत अधिकार "
दुर्दैवाने आत्महत्या करताना दिसत आहे.?
मूलभूत अधिकारांची पायमल्ली..!!
अत्यंत दुर्दैवी असून या निर्णयांच्या विरोधात
@Yesjassociation संघटनेच्या माध्यमातून
राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार.
@Dev_Fadnavis@dadajibhuse@Prksh_Ambedkar@DRPANKAJBHOYAR@RRPSpeaks
#मराठी_शाळा_वाचवा
#शिक्षण_वाचवा
आज शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना शिक्षकभरती मोठ्या प्रमाणात व्हावी या संदर्भात हिंगोलीच्या टीमने निवेदन दिले.
त्यापूर्वी अगोदर निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी सुधा वाचून घेतले हे विशेष त्यानंतर मंत्री भुसे साहेब यांना शिक्षकभरती संदर्भात निवेदन देत असताना निवेदनावर संदीप कांबळे सरांचा नाव वाचूनच मंत्री महोदय म्हणले आता कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती करावीच लागते😂🔥❤️
यावरून समजते की शिक्षण मंत्री साहेब आणि कांबळे संदीप सर यांचा नियमित संवाद होतोय.!!
यावेळी उपस्थित शुभम लांडे सर, शिलानंद कांबळे सर, बळीराम कल्याणकर सर, संदीप रोडगे सर, शिवाजी पवार सर, शुभम पडोळे सर , प्रताप कांबळे सर, मनोहर जाधव सर, धम्मपाल वानखेडे सर, राम बांगर सर, वैजनाथ घुमणार सर, दत्ता कल्याणकर सर , सचिन काळे सर उपस्थित होते.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Dev_Fadnavis@Prksh_Ambedkar@PawarSpeaks@DhungelRojina@Dhananjay4INC
अल्पसंख्यांक विभागाच्या शाळांची भरती प्रक्रिया #पवित्र_पोर्टल मार्फत करा विद्यार्थ्यांना मिळतील योग्य #शिक्षक &गुणवतापुर्ण उमेदवारानां मिळेल नौकरीची संधी
भरतीत पारदर्शकता येईल,शाळांची गुणवत्ता वाढेल,शिक्षणाचा स्तर उंचावेल भावी पिढ्यांसाठी मजबूत पाया तयार होईल
@madhurimisal