मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम आपले आभार.
तुम्ही स्पर्धा परीक्षार्थी चे प्रश्न जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी येत आहात.
सर्व परीक्षार्थी ची मागणी आहे संयुक्त गट ब परीक्षा 2026 जागावाढ झाली पाहिजे.
सर्वांना विश्वास आहे सकारात्मक निर्णय होईल.
#जागावाढ
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम आपले आभार.
तुम्ही स्पर्धा परीक्षार्थी चे प्रश्न जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी येत आहात.
सर्व परीक्षार्थी ची मागणी आहे संयुक्त गट ब परीक्षा 2026 जागावाढ झाली पाहिजे.
सर्वांना विश्वास आहे सकारात्मक निर्णय होईल.
#जागावाढ
निवेदन
प्रती,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
विषय :- आयोगाकडे 2026 मध्ये येणाऱ्या सर्व नवीन सरळसेवेतील तांत्रिक /अतांत्रिक गट -ब व गट -क (अराजपत्रित) पदांची परीक्षा पद्धत सध्या सरळसेवा पद्धतीनुसारच(एकच पेपर पॅटर्न) लागू करणेबाबत...
संदर्भ:-
1.शासन पत्र क्रमांक:- सर्व पदे mpsc कडे जाणे बाबत.
2.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग जाहिरात-2025
मा.महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खालील परीक्षा पद्धत राबविण्याबाबत स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून आयोगास मागणी करण्यात येत आहे:-
महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी सध्या गेल्या 4 वर्षांपासून टी.सी.एस आणि आय.बी.पी.एस या पॅटर्न नुसार सरळसेवा परीक्षाचा अभ्यास करत आहे, तसेच त्या आधीसुद्धा इतर पद्धतीने पदे भरल्या जातं होती.
परंतु आता सर्व गट -ब आणि गट -क अराजपत्रित तसेच इतर सरळसेवेतील गट अ आणि गट ब राजपात्रित पदे 2026 पासून आयोगाकडे देण्यात येईल.
उपरोक्त बाबी नुसार फक्त सरळसेवा पॅटर्न ने अभ्यास करत आलेल्या उमेदवारचा विचार करून सर्व परीक्षा आयोगाने काही वर्षे तरी सरळसेवा पद्धतीनेच घ्यावी, म्हणजेच एकच 100 प्रश्न(200) गुणाच्या पेपर मधूनच अंतिम निवड करावी. तसेच राजपत्रित गट अ व ब ची पदे सुद्धा चाळणी परीक्षा+ मुलाखत याच पद्धतीने कायम ठेवावी.
• आयोगाने 2026 सरळसेवा पदासाठी नवीन पाच संवर्ग निर्माण करावे:-
1. गट-क(अराजपत्रित) अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
2.गट -ब (अराजपत्रित)अतांत्रिक सरळसेवा परीक्षा
3.गट - क (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
4.गट - ब (अराजपत्रित)तांत्रिक सरळसेवा परीक्षा
5. राजपत्रित गट-अ आणि गट-ब सरळसेवा चाळणी परीक्षा
•अभ्यासक्रम:-
40 GS प्रश्न(सर्व विषय) + 60 general(15 इंग्लिश,15 मराठी,15 गणित 15 इतर )
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
किंवा
•25 चा पॅटर्न:-
25 प्रश्न GK,
25 प्रश्न बुद्धिमत्ता,
25 प्रश्न मराठी,
25 प्रश्न इंग्लिश
एकूण 100 प्रश्न (200 गुण)
•तांत्रिक पदे:-(विशिष्ट पात्रता व विशिष्ट अभ्यासक्रम) 100 प्रश्न 200 गुण.
•तांत्रिक पात्रता सर्व तांत्रिक पदवी वाल्यांसाठी एकच परीक्षा एकाच दिवशी घेणे.
(फक्त पेपर वाटप वेगवेगळे करणे आणि अभ्यासक्रम नुसार किंवा आयोग ठरवतील तसा अभ्यासक्रम):-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1)गट क तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
2)गट ब तांत्रिक सरळसेवा नावाची परीक्षा
•अतांत्रिक पदे:- 100 प्रश्न 200 गुण
•सर्व any graduate सरळसेवा पदे :-
(खालील दोन नवीन संवर्ग निर्माण करा)
1) गट क अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
2) गट ब अराजपत्रित सरळसेवा परीक्षा
उमेदवारांच्या आयोगास इतर सूचना आणी नियोजन, व्यवस्थापन या बाबत मागणी:-
•पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट MH-SET(सहा प्राध्यापक पात्रता परीक्षा) विविध विषय साठी एकाच दिवशी आयोजित करते. पेपर ऑफलाईन पद्धतीने घेते. एखादे परीक्षा केंद्र दिले असल्यास त्या केंद्रावर कला, वाणिज्य, व्यवस्थापन, लायब्ररी सायन्स, समाजकार्य, समाजशास्त्र अशा इतर सर्व विशेष अभ्यासक्रम आधारित वेगवेगळ्या पेपरचे व्यवस्थापन करते तसेच mpsc ने तांत्रिक पदासाठी करावे.
• गट क तांत्रिक सरळसेवा या सर्व पदाला एकच परीक्षा, एकाच दिवशी असावी आणि अंतिम निवड यादी या एकाच परीक्षावर ठरवावी.
•ज्या पदाला व्यावसायिक चाचणी/स्किल टेस्ट घेणे आवश्यक आहे याबाबत आयोगानी ठरवावे उदा. स्टेनोग्राफर, लिपिक.
• तांत्रिक/अतांत्रिक या सर्व सरळसेवेतील पदांच्या परीक्षासाठी सदर वर्षात येणारे सर्व मागणीपत्र सर्वप्रथम गोळा करून घेणे. त्यानंतरच त्या वर्षाच्या जाहिरात प्रसिद्ध करावी.
•तांत्रिक पदांसाठी एमएच -सेट सारखे एकाच दिवशी परीक्षा व्हावी आणि त्याचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन व्हावे:-
प्रत्येक जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्र /उपकेंद्र वर विशेष पात्रता करिता केंद्र ठेवावे उदा.समाजकार्य पदवी( MSW) वर त्या अर्ज संख्येनुसार परीक्षा केंद्र देणे सोबतच इतर लायब्ररी सायन्स, अभियांत्रिकी, कृषी व इतर विशिष्ट शैक्षनिक अहर्ता करिता परीक्षा केंद्र देणे. ( हे सर्वच जिल्हा केंद्रावर लागू करणे)
किंवा
उपरोक्त व्यवस्थापन करणे शक्य आहे पण तरीही आयोगास जे योग्य वाटतील त्यानुसार व्यवस्थापन करावे.
•गट-ब आणि गट क तांत्रिक सरळसेवा परीक्षा या वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•गट-ब आणि गट क सरळसेवा परीक्षा(तांत्रिक सोडून इतर) अन्य पदवी वर आधारित या सुद्धा वेगवेगळ्या दिवशी घेणे.
•नकारात्मक गुण पद्धती बाबत आयोगाने ठरवावे.
आपले
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
एमपीएससी लिपिक टंकलेखक 2023 भरतीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. हजारो विद्यार्थ्यांनी घरदार सोडून, नोकऱ्यांचे पर्याय टाळून, फक्त या भरतीवर विश्वास ठेवून अभ्यास केला, पण आयोगाच्या संथ, बेफिकीर आणि बेशिस्त कारभारामुळे आज त्याच विद्यार्थ्यांची स्वप्नं चुरगाळली जात आहेत. फक्त उडवा-उडवीची उत्तरं देणं, वेळकाढूपणा करणं आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणं हाच आज आयोगाचा 'नवा कार्यधर्म' झालाय का?
दोन वर्षं होऊन गेली, पण अजूनही यादी नाही, स्पष्टता नाही, जबाबदारी नाही... हे बघून संताप अनावर होतोय! आम्ही सरकारलाही थेट सांगतो ही फक्त भरती नाही, हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं युद्ध आहे! तात्काळ ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि त्या आंदोलनातून होणाऱ्या पूर्ण परिणामाची जबाबदारी आयोग आणि शासनाची असेल!
@Dev_Fadnavis@Drsuvarnas@Mpsc_Andolan
मा.@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP एमपीएससी गट ब 2024 2 वर्षयानंतर होणारी परीक्षा आणि त्यात पण 480 एवढ्या कमी जागा. सरकारी पक्षातील आमदारांचे जर #गृहमंत्री ऐकत नसेल तर बाकी विद्यार्थ्यांचे कधी ऐकणार.
2024 साठी त्वरित जागा वाढ करावी. एवढी विनंती.
@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी.
@mpsc_office@Drsuvarnas
आदरणीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
खालील परीक्षांच्या अंतरिम निवड याद्या तातडीने जाहीर कराव्यात.
▪️ राज्यसेवा परीक्षा 2023
▪️ लिपीक टंकलेखक 2023
गेल्या दोन वर्षापासून दोन्ही भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवार मानसिक तणावातून जात आहेत.
@mpsc_office
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील सर्व निर्णय घेतले जावेत.
➡️Combine जाहिरात 'वय वाढ' आणि 'जागा वाढ'
➡️राज्यसेवा 35 संवर्ग जागा वाढ
➡️आरोग्य 50% मार्गदर्शक तत्वे
➡️राहिलेल्या सरळसेवा जाहिराती
@CMOMaharashtra@mieknathshinde
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
1.
जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा राज्यसेवा 2024 संदर्भात....
👉सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा या जाहिरातीत असाव्या या रास्त व न्याय्य मागणीसाठी गेल्या 9-10 महिन्यापासून
आपणाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे.अद्याप ही मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये तीव्र असंतोष व अन्यायाची भावना आहे.
आपण आंदोलन करून Attempt मिळवले म्हणून सरकारने जागा न काढुन 2023 चा Attempt तर वाया घातलाच ,
आता 2024 ला आपल्यावर सूड उगवला जात आहे हे त्यांना कळून चुकले आहे.
👉 मी नम्रपणे आपले आभार मानतो
आपण 205 पदांची मूळ जाहिरात मध्ये
आमच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यात वाढ करून 431 पर्यंत आणले आहे.
मला हे ही माहित आहे की अजूनही काही संवर्ग संदर्भात कार्यवाही सुरु असून ते
"in process" आहेत.त्याची वाढ होईलच.
परंतु हे सर्व इतके संथगतीने का सुरु आहे???
👉 उपजिल्हाधिकारी ,पोलीस उपाधिक्षक
मुख्याधिकारी गट अ,गट
ब ,शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी सह
आदिवासी विभागातील उपसंचालक पदासह इतर 17 संवर्गाची जास्तीत जास्त पदांचे मागणीपत्रक तात्काळ #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
👉 @RVikhePatil
7महिने पाठपुरावा केल्यावर आपण फक्त 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली
त्यात OBC सह इतर काही category ना
भोपळा दिला.
आपणास आठवण करून देतो
2014 मध्ये काँग्रेसने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीत
44 उपजिल्हाधिकारी
35 तहसीलदार
227 ना.तहसीलदार
होते
आपण तर ZERO ZERO चे record केले आहे.
कशासाठी हा अट्टाहास सुरु आहे????
👉 संवेदनशील मुख्यमंत्री महोदय,
ह्या राज्यसेवा उमेदवारांनी पुन्हा रस्त्यावरची लढाई लढावी अशी आपली ईच्छा आहे काय??????
विधानसभा निवडणूकपूर्वी हे आंदोलन सरकारला झेपणार आहे का?
वेळ द्यायचा म्हणजे किती द्यायचा ह्याला पण मर्यादा आहेत.
अजूनही वेळ गेली नाही
मागणी लवकरात लवकर मान्य करून त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
👉 हा सर्व इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
पण कसा ते आपल्यावर आहे
2.
👉@mpsc_office ने
महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रूवारी-2024 ला प्रसिद्ध करण्यात येईल
परीक्षा तारीख :- 16 जुन 2024
अशी घोषणा नोव्हेंबर 2023 मध्ये केली होती.
👉आज 5 महिने उलटून गेले अद्याप जाहिरात प्रसिद्ध तर झाली नाहीच परंतु
परीक्षेची सुधारित तारीख सुद्धा विद्यार्थ्यांना कळवण्यात आलेली नाही.
👉सरकारला ही जाहिरात काढायची आहे की नाही?? विनाकारण
विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे.
गेली 5 महिने हे विध्यार्थी आज जाहिरात येईल,उद्या येईल या आशेवर जगत आहेत.
अजून किती वेळ हवा आहे आपल्याला??
इतकी असंवेदनशीलता का?
👉तात्काळ यावर कार्यवाही करून लवकरात लवकर जास्तीत जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करावी.
PSI, STI ,ASO ,TAXassistant,
Excise SI सह इतर सर्व संवर्गाचे
जास्तीत जास्त पदे जाहिरातीत यावी यासाठी "आतापर्यंत जो पाठपुरावा" केला त्याला सरकारकडून उत्तम प्रतिसाद मिळेल व ही पदे जाहिरातीत दिसतील
अशी अपेक्षा ठेवतो.
धन्यवाद 🙏🏻
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@ssaunik@abpmajhatv@TV9Marathi@pudharionline@prabhatkhabar @News18lokmat
#mpsc #andolan #baliramdoley
@Dev_Fadnavis@Devendra_Office
माननीय देवेंद्रजी जलसंपदा विभागाची विविध संवर्गाची निवडणूक प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालू आहे आधीच आचारसंहितेमुळे ४ महिना उशीर झाला आहे, कागद पडताळणी होऊन महिना होऊन चाललाय तरी अद्याप आरक्षण-निहाय निकाल लावला नाहीये असा गोंधळ युक्त कारभार चालू आहे
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज २० ते २५ दिवस उलटुन गेले आहेत.
या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल लावून त्वरित नियुक्त्या द्याव्यात असा मंत्रिमंडळाचा आदेश असताना सुद्धा जाणून बुजून भरती प्रकिया रखडवण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना अशी शंका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी तरी नियुक्त्या मिळणार आहेत का हा प्रश्न विद्यार्थी वर्गामध्ये आहे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan@punyachiMPSC
#MPSC #DhananjayShinde
#Maharashtra
देर आए दुरुस्त आए....
सर्वप्रथम आपण केलेल्या मागणीसाठी आपले धन्यवाद. 🙏
गेल्या सात-आठ वर्षांपासून सर्व पदभरती (गट-अ ते गट-ड) MPSC कडे द्यावी म्हणून आम्ही आंदोलने करत आहोत. मोठा काळ फडणवीस साहेबच सत्तेत होते पण त्यांनी नोकर भरतीचे कंत्राटे खासगी कंपन्यांना दिल्याने, देशातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला. सर्व लिपिक पदे MPSC कडे देण्याचा प्रस्ताव माविआ काळात आमच्या मागणी नंतर समोर आला होता, आणि त्यानंतर फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात त्याला मंजुरी देण्यात आली होती.
सरळसेवा नोकर भरती MPSC कडे द्यायचीच होती तर #75000 मेगाभरती कारण्याआधी द्यायला हवी होती. भाजप सरकार किमान विधनाभेच्या निवडणुका बघून तरी सर्व शासकीय नोकर भरती MPSC कडे देईल की हा निव्वळ स्टंट ठरेल याची उत्सुकता राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@mpsc_office .