स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही आहे प्रामाणिक भावना… त्यामुळं MPSC वरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सध्याच्या अध्यक्षांपासून सर्वांनाच बदलून पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेच���या अधिकाऱ्यांच्या हाती एमपीएससीचा कारभार देणं आवश्यक आहे. सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही .
पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#विद्यानंद_बापट #पुणे_पोलीस #गुंडागर्दी
सामाजिक सुधारणांची आणि सौहार्दाची भूमी असलेल्या पुण्यात विरोधात बोललात, तर तुमचा ‘पंडित’ आणि ‘बापट��� करू, असा संदेश सरकारकडून दिला जात आहे का?
पुण्यात असे हल्ले नवीन नाहीत. काल दाभोळकर होते, आज बापट आहेत. त्यामुळे गावगुंडांच्या मदतीने हल्ले करून तर्काची लढाई थांबवता येईल, या मानसिकतेत सरकारने राहू नये. पत्रकारांच्या बाबतीतही सरकारकडून हेच होऊ शकते.
#पुणे #अभिव्यक्ती_स्वातंत्र्य #विद्यानंद_बापट #लोकशाही #महाराष्ट्र_सरकार
@bhimanwar अध्यक्ष महोदय तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी समजतंय का??? घटनात्मक आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आरोप हे तुमच्यावरच होणार... पळवाट शोधू नका, उत्तरं द्या 🙏
@bhimanwar मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही म्हणायला तुम्ही काय टिळक नाही आहात.. शेंगा तुमच्या लोकांनी खाल्ल्या आहेत, टरफले तुम्हालाच उचलावी लागणार... 🙏
@mpsc_office अध्यक्ष महोदय,
आपले सचिव आधी म्हटले होते की paper फुटला नाही आणि आज आपण officially सांगताय की जानेवारीत paper फुटला होता
परंतु परीक्षा तर 22 मार्च ला झाली होती.
आता आमचं डोकं बंद पडले आहे.
परीक्षे पूर्वी 2 महिने पेपर बाहेर होता
याची गंभीर दखल CM साहेबांनी घ्यावी.CM maharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्म�� पद्धतीने पार पडली असून नुकतेच उमेदवारांचे विषयनिहाय गुण प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र, काही उमेदवारांच्या विविध विषयांतील गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याची बाब विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. विशेषतः निबंध तसेच वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरमधील गुणांमध्ये अनाकलनीय फरक असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांनी आज भेट घेऊन ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिली. यानुसार मी विद्यार्थ्यांसमक्ष आयोगाच्या सचिवांशी संवाद साधून गुणांकन प्रक्रियेची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांच्या या शंकेची योग्य ती पडताळणी होणे आवश्यक असून हे शंकानिरसन झाल्यानंतरच मुलाखत कार्यक्रम सुरु करणे उचित राहिल असेही सांगितले आहे.
#MPSCExam #महाराष्ट्र_लोकसेवा_आयोग #UPSC #राज्यसेवा #MPSCStudent
@mpsc_office अध्यक्ष महोदय,
आपले सचिव आधी म्हटले होते की paper फुटला नाही आणि आज आपण officially सांगताय की जानेवारीत paper फुटला होता
परंतु परीक्षा तर 22 मार्च ला झाली होती.
आता आमचं डोकं बंद पडले आहे.
परीक्षे पूर्वी 2 महिने पेपर बाहेर होता
याची गंभीर दखल CM साहेबांनी घ्यावी.CM maharashtra
@mpsc_office सध्या आम्ही सर्व विध्यार्थी खूप मानसिक त्रासात आहे कधी विचारही केला नव्हता mpsc पेपर फोडते. पण तुम्ही विश्वासघात केला आता तुम्ही सर्वांनी राजीनामा द्यावा आणि पुढील 25 oct ची exam घ्या तोपर्यंत एकही exam घेऊ नका पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत
म��. अध्यक्ष साहेब आपण एका घटनात्मक पदावर बसलेला आहात #mpsc पारदर्शकपणे निष्पक्षपणे परीक्षा आयोजन करण्याचे काम करते आणि करत आलेले आहे त्या परीक्षेतला एक ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटलेला आहे आम्हाला शंका आहे की 2021 पासून झालेल्या पेपर मध्ये काहीतरी गडबडी झालेल्या आहे आणि आयोगातील अध्यक्ष, सचिव ,सदस्य ,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, अजून यामध्ये कोण कोण सहभाग��� आहे ? जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत आपण राजीनामा दिलेला बरा आणि या सर्व प्रकरणाची जोपर्यंत अंतिम चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत सर्व एक्झाम होल्ड वर ठेवण्यात याव्या.
एक विद्यार्थी म्हणून आम्ही कोणत्या मनस्तापातून आणि कोणत्या परिस्थितीतून जात आहे तुम्हाला याची कल्पना नसेल साहेब
@RRPSpeaks
@bhimanwar
@mpsc_office 🚨पेपर फुटला म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका फुटली नाही;आयोगाच्या सुरक्षा व्यवस्थेतील छिद्रही उघडे पडले.
पडद्यामागे नेमके काय घडले,हे समोर आणणे गरजेचे आहे.
दोषी कोण?प्रक्रिया कुठे फेल झाली?आणि जबाबदारी कोणाची?विद्यार्थ्यांना ���ा प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.
@mpsc_office @CMOMaharashtra
@mpsc_office#MPSC च्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर याची जबाबदारी कोणाची?
नोकऱ्या जर पैशांच्या रेटनुसारच वाटायच्या असतील, तर परीक्षा घेण्याचा फार्स तरी कशासाठी?
@mpsc_office@bhimanwar@RRPSpeaks
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज ���िद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स���वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयो���ावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
कष्टकरी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी सुरू असलेला हा खेळ अत्यंत चिंताजनक!
चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी स्वतःचे आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी वर्षानुवर्षे अहोरात्र परिश्रम घेतात. पोटाला चिमटा काढून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोजक्या अन्नावर दिवस काढून हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संशयास्पद आणि अपारदर्शक कारभारामुळे या विद्यार्थ्यांच्या अपार कष्टांवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे.
स्पर्धा परीक्षेच्या मुख्य निकालांमध्ये भाषा व इतर विषयांत उत्तम कामगिरी असलेल्या उमेदवारांना ऐच्छिक विषयाच्या एकाच पेपरमध्ये अत्यंत नगण्य गुण मिळणे अत्यंत संशयास्पद आहे. परीक्षा मूल्यमापन पद्धती व गुणदानातील तफावतीमुळे विद्यार्थ्यांना आता आयोगावर विश्वास राहिला नाही. सतत होणारी पेपरफुटी, ऐनवेळी परीक्षा रद्द होणे, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात तीव्र अविश्वास, असंतोष आणि नैराश्याचे वातावरण पसरले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांचे वर्षांनुवर्षांचे कष्ट वाया जाऊ दिले जाणार नाही. हा विषय केवळ परीक्षेच्या गुणांचा नसून लाखो कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. परीक्षा आयोगाने आपले उत्तरदायित्व स्वीकारून यावर त���त्काळ योग्य पावले उचलावीत.
@mpsc_office
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@INCMaharashtra @IYC
#JusticeForStudents #YouthJustice #PratibhaDhanorkar #Chandrapur