आदरणीय अध्यक्ष महोदय,
👉 आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे पत्र साहजिकच सर्वांनी वाचले आहे आणि आपणही ते वाचले असणार, अशी अपेक्षा आहे.
सदर आरोप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्यावर करण्यात आलेले नसून, परिवहन विभागाचे प्रमुख म्हणून आपल्या भूमिकेशी संबंधित असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोपांना केवळ “वैयक्तिक आरोप” म्हणून संबोधून त्यापासून अलिप्त राहणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.
👉 आपण या आरोपांवर सविस्तर, मुद्देनिहाय आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. तसेच, त्या आरोपांचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून न देता, आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून स्पष्टपणे जनतेसमोर मांडावे, जेणेकरून आरोप ज्या वैयक्तिक भूमिकेशी संबंधित आहेत त्यावर आपली वैयक्तिक बाजूही स्पष्ट
होईल.
👉 "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीतील घटना नेमकी काय?
प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,
“औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे.”
मात्र यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहतात:
जानेवारी 2026 मध्ये नेमकी कोणती घटना घडली?
ती घटना नेमकी कोणत्या तारखेला घडली?
ती कोणाच्या निदर्शनास प्रथम आली?
आयोगाला याची माहिती कधी मिळाली?
जर जानेवारीमध्येच ही घटना निदर्शनास आली होती, तर त्यावेळी नेमकी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली?
या घटनेची माहिती पोलिसांना कधी देण्यात आली?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रश्नपत्रिका फुटल्याचे कोणते ठोस पुरावे जानेवारीमध्येच उपलब्ध झाले होते?
कारण उपलब्ध माहितीनुसार परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजे 20 मार्च 2026 रोजी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप/दावा समोर आला, असे दिसून येते.
मग जानेवारीतील “घटना” आणि 20 मार्च रोजी समोर आलेल्या कथित प्रश्नपत्रिका फुटीमध्ये नेमका काय संबंध आहे?
हा कालक्रम स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे.
जानेवारीमध्येच घटना निदर्शनास आली होती, तर 20 मार्चपर्यंत नेमके काय घडले? आणि जर 20 मार्चलाच प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रथम समोर आले असेल, तर प्रसिद्धीपत्रकात जानेवारीतील कोणत्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे?
याचे स्पष्ट, तारखांसह आणि अधिकृत नोंदींच्या आधारे स्पष्टीकरण आयोगाकडून अपेक्षित आहे. तसेच जानेवारी मध्ये झालेल्या इतर परीक्षेत देखील पेपरफुटी झालेली आहे का ?
विद्यार्थ्यांना आता भावनिक आवाहन नको आहे त्यांना कालक्रम, पुरावे आणि वस्तुनिष्ठ उत्तरे हवी आहेत.
👉 "अंतर्गत चौकशीबाबत" : पेपर हा आयोगाच्या अंतर्गत फुटला हे सर्वांना माहितीच आहे मग चौकशी अंतर्गत का? हे प्रकरण स्वतंत्र तपास यंत्रणा जसे की CBI ,CID किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यास काय अडचण आहे ?
👉 प्रश्न फक्त औषध निरीक्षक या पदापुरता नसून त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात आता हजारो प्रश्न आहेत इथे विद्यार्थ्यांचे अभ्यासात देखील लक्ष लागत नाही त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपणास देणे आता अत्यंत्य गरजेचे आहे
@bhimanwar@mpsc_office
@Sonalimumbai1 कारण गोदीजीना किंमतच नाहीये जो माणूस बेरोजगारी महागाई भुकमारी विरोधात लढायच सोडून १५ वर्षाच्या पोरीच्या विरोधात लढतोय त्याला कशाला किंमत?
MPSC वरती झालेल्या सर्व आरोपांची सत्यता तपासली जात नाही. तसेच पूर्ण तपासा होत नाही,
MPSC मार्फत कोणतीही परीक्षा, मुलाखत भविष्यात घेऊ नये अशी सर्व परीक्षार्थींचे मत आहे.
आयोग आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही.
कळावे,
एक प्रामाणिक उमेदवार.
@mpsc_office#MPSC#Paper_leak
आधीच जाहीर केल्याप्रमाणे उद्या (मंगळवार, दि. १ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता MPSC कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई..!
यावेळी पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या अध्यक्षांऐवजी नवीन अध्यक्षांची भेट होईल, अशी अपेक्षा आहे. जर जुनेच अध्यक्ष खुर्चीला चिकटून बसले तर त्यांना भेटण्यात कोणताही रस नाही त्यांच्याऐवजी सचिवांना भेटून विद्यार्थ्यांच्या इतर काही विषयांवर चर्चा करू. अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करून, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संविधानिक मार्गाने अंतिम लढा उभारण्याचं नियोजन लवकरच केलं जाईल आणि याचा श्रीगणेशा पुण्यातून होईेल.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
@jaypatilkakde@AJAM_18@mpsc_office@bhimanwar ३ pre २ mains सगळे थोड्याहून हुकायच मी प्रत्येक सिनिअरला पर्सनली भेटून कसे मार्क्स वाढतील हे विचारायचो येड लागलं असत अजून काही दिवसात.
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
@wordsMahfil एक बिहारने केल म्हणजे इथ आलेले सगळेच चांगले असतील असे नाही, इथली भाषा, संस्कृती जर ते मानणार नसतील तर तुम्ही लोकांनी तिकडे जाव ते भारी वाटत आहेत तर.
उद्या सकाळी पेपर फुटी संदर्भात स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षक यांच्यात महत्त्वाची बैठक.
पेपर फुटी संदर्भातील सर्व सत्य समोर यावे ही भूमिका.
असेच एकजूट असेल तर नक्कीच आता पर्यंत जे काही आयोगात चुकीच काम झालं आहे. ते बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
#MPSC#Paper_leak#बैठक
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
MPSC पेपर फुटी प्रकरणी MPSC अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी तर झालीच पाहिजे परंतु यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून जी पदे भरली गेली त्या सर्व जाहिरातीसंदर्भात यांची CID चौकशी झालीच पाहिजे. तसेच बाकी सदस्य व बाकी अधिकारी यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आमचा MPSC वर विश्वास होता पण मागील कोणतीही पार्श्वभूमी विचारत न घेता असे अधिकारी MPSC वर लादले गेले म्हणून आज हा दिवस पाहण्याची वेळ आली आहे.
मायबाप सरकार ला विनंती आहे की कृपया या पापात सहभागी होऊ नका, अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करून कसून चौकशी करा अन्यथा आता महाराष्ट्रातील प्रत्येक मैदान हे जंतरमंतर दिसेल...
वेळीज जागे व्हा... ऑगस्ट महिना तुमच्या हातात आहे... विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणार असाल तर विद्यार्थी लाठ्या खायला तयार आहेत...
किरण निंभोरे
8484086061
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@maha_governor
@PrakashGade13@RRPSpeaks तू सरकार मध्ये आहेस ना, कर चौकशी आणि पुराव्यासकट टाक सगळ, तुझ्या पक्षाने किती नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले ते सगळा देश जाणून आहे.