महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात अमरावतीत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही निर्लज्ज आणि निष्क्रीय सरकारसाठी शरमेची बाब आहे. वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या भविष्याशी खेळ मांडला जात असताना शासन डोळे मिटून गप्प का बसले आहे? प्रत्येक वेळी आक्रोश आणि आंदोलन केल्याशिवाय या मुजोर व्यवस्थेला जाग येणार नाही का?
लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांना तातडीने पदावरून हाकलून या संपूर्ण घोटाळ्याची आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा भ्रष्ट कारभार आम्ही खपवून घेणार नाही; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
#MPSC #MPSCExam #MPSCStudents #MPSCScam #PaperLeak #MPSCPaperLeak #MPSCProtest #StudentProtes
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माननीय महेबुब शेख यांनी आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "जे विद्यार्थी गैरप्रकार करून अधिकारी होतील, ते उद्या समाजात कोणत्या पद्धतीने काम करणार आहेत? किती कीड आपण समाजामध्ये पसरवत आहोत, याचा विचार MPSC आयोग करणार आहे की नाही? अरे, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा." अशा शब्दांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर टीका केली.
🚨 MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या मूल्यांकनावर गंभीर प्रश्नचिन्ह!
200 गुणांच्या वर्णनात्मक पेपरमध्ये 181/200 गुण?
130+ उमेदवारांना 75% पेक्षा अधिक गुण?
15 गुणांच्या प्रश्नाला 8 गुण, तर काही ठिकाणी 20 पैकी 20 गुण? हे गुणदान नेमके कोणत्या निकषांवर झाले? वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण कसे मिळाले, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची MPSCने पारदर्शकपणे उत्तरे देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणलेल्या काही गंभीर विसंगती :
🔴 P1 आणि P2 मध्ये काही उमेदवारांच्या गुणांमध्ये 50–89 गुणांचा फरक
🔴 15 गुणांच्या उत्तरात केवळ 3 मुद्द्यांसाठी 8 गुणांचे गुणदान
🔴 वर्णनात्मक पेपरमध्ये काही उमेदवारांना 20 पैकी 20 गुण
🔴 135 गुणांचे मूल्यमापन होऊन अंतिम गुण 68 करण्यात आल्याचा दावा
🔴 काही प्रकरणांमध्ये 17 गुण मोजले गेले नसल्याचा आरोप.
ही आकडेवारी आणि दावे सत्य असल्यास, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन ऑडिट होणे आवश्यक आहे.
📢 आमच्या मागण्या स्पष्ट आहेत:
1️⃣ प्रत्येक उत्तरपत्रिकेची पुन्हा तपासणी करावी. सरसकट Moderation झाले नाही आणि काही उत्तरपत्रिकांचे थेट Chief Moderation झाले असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी करून संपूर्ण प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करावे.
2️⃣ दळवी समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी.
3️⃣ Paper-2 चे मूल्यांकन संबंधित विषयातील पात्र व तज्ज्ञ परीक्षकांकडूनच झाले आहे का, याची खात्री करावी.
4️⃣ गुणदानाचे Independent Audit करावे.
मूल्यमापन पद्धती, Moderation, Chief Moderation आणि गुणांमध्ये झालेल्या बदलांची स्वतंत्रपणे तपासणी करावी.
5️⃣ फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांवर कोणताही अन्याय होणार नाही.
6️⃣ पारदर्शकतेसाठी Top Rankersच्या उत्तरपत्रिका, मूल्यांकन पद्धती आणि Moderationचे निकष नियमानुसार सार्वजनिक करावेत.
ही मागणी कोणत्याही उमेदवाराविरुद्ध नाही. ज्यांनी मेहनत घेतली आहे, त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही. आमची एकच मागणी आहे - प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक मूल्यांकन आणि न्याय मिळाला पाहिजे. MPSC ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची संस्था आहे. तिची विश्वासार्हता टिकवण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता ही तडजोड न करता पाळलीच पाहिजे.
विद्यार्थ्यांना उत्तर हवे आहे, उत्तरपत्रिकांचे स्वतंत्र पुनर्मूल्यांकन हवे आहे, मूल्यमापनाचे Independent Audit हवे आहे आणि सर्वात महत्त्वाचे - विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे!
@INCMaharashtra@INCHarshsapkal@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@INCRojgar
#AgriMPSC #AgriMPSC2024 #MPSC #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #MPSCवाचवा #StudentsForJustice
MPSC व विविध शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे असा शांततापूर्ण मोर्चा आयोजित करण्यात येत आहे.
MPSC पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, CBI/न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी, MPSC अध्यक्ष व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी, MPSCची सर्वसमावेशक पुनर्रचना आणि भविष्यातील सर्व MPSC परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्याची मागणी या प्रमुख मागण्या आहेत. या मोर्चासाठी आवश्यक पोलीस परवानगी मिळावी म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत लेटरहेडवर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडे अर्ज सादर केला आहे.
यापूर्वी २१ ऑगस्ट रोजी आयोजित “रोजगार न्याय सत्याग्रह” रॅलीस पुणे पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. सदर रॅली शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली आणि पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले.
७ सप्टेंबरचा मोर्चाही पूर्णपणे शांततामय, अहिंसक व संविधानिक मार्गाने पार पाडला जाईल.
@PuneCityPolice@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@DGPMaharashtra@PuneCongress@JagtapSpeaks
#MPSC #MPSCStudents #स्पर्धापरीक्षा #पेपरफुटी #रोजगारन्याय #MPSCReform #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांविरोधात अमरावतीच्या भूमीतून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने रणशिंग फुंकले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायाची ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल.
परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, पेपरफुटीचे आरोप आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे ही काळाची गरज आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी या प्रकरणातील प्रशासकीय व नैतिक जबाबदारीच्या अनुषंगाने आपल्या पदांवर राहणे योग्य आहे का, याचा विचार करावा. चौकशीत जबाबदारी निश्चित झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेपापासून मुक्त, स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यासाठी हे प्रकरण #CBI कडे सोपवावे, अशी आमची स्पष्ट मागणी आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे विनंती आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी तडजोड नाही, त्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ देता कामा नये. सत्य समोर आले पाहिजे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. न्याय मिळेपर्यंत संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील.
अमरावतीकरांना सलाम!
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजुटीने लढूया आणि जिंकुया !!!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@BalwantINC@INCMaharashtra
निवड झालेल्या पहिल्या १२ पैकी १० एकाच केंद्रातले
हा योगायोग की भ्रष्टयोग ?
MPSC च्या अध्यक्षांचा विद्यार्थी रस्त्यावर सत्कार करतील..!
@MahebubShaikh20@NCPspeaks
ऑनलाईन विरोधात देखील सर्वात पहिला आवाज अमरावतीकरांनी उठवला होता.....!
आणि आता पेपरफुटी विरोधात देखील अमरावती येथील उमेदवारांनीच पुढाकर घेतलेला आहे....!
अमरावतीकर ❤️✊🤝
#सुरवात झाली आहे. @CMOMaharashtra
MPSC तील पहिला घोळ हा FSO मध्ये करण्यात आला, त्यानंतर कृषी सेवा आणि आता सगळ्याच परीक्षांमध्ये...
विदर्भ IAS अकॅडमीच्या सागर सरांनी आज अमरावती मध्ये मोर्चा आयोजित केला आहे....... अमरावतीतील सर्व विद्यार्थी आणि क्लास चालकांनी सहभागी व्हा..
पुण्यातील शिक्षकांना जाग येणार कि नाही?
#MPSC तील पहिला घोळ हा FSO मध्ये करण्यात आला, त्यानंतर कृषी सेवा आणि आता सगळ्याच परीक्षांमध्ये
विदर्भ IAS अकॅडमीच्या सागर सरांनी आज अमरावती मध्ये मोर्चा आयोजित केला आहे.
सर्व विद्यार्थी आणि क्लास चालकांनी सहभागी व्हा
#पुण्यातील मुलांना आणि शिक्षकांना जाग येणार कि नाही?
#MPSC
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra@maha_governor@satejp@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
@RRPSpeaks पेपर फोडून तरुणाचा स्वप्नाचा, मानसिकतेचा , कष्टाचा महत्वाकांशेचा शरीराचा खून करणाऱ्या आरोपी अधिकाऱ्यांना जन्मठेप\ फाशीचा शिक्षा द्या.पेपर फूटी लक्षात आणून देणाऱ्याना धमकी देणारे सचिव Harpalkar आणि अध्यक्ष Bhimanvar यांना सहआरोपी करा ही CM साहेबाना नम्र विनंती.
राज्यातील लाखों विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा खुन करणाऱ्या #MPSC च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीचा योग्य तपास व्हावा यासाठी आज अमरावती येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या. सरकारने वेळीच MPSC च्या गैरकारभाराची दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अन्यथा आज अमरावतीत हा मोर्चा झालाय उद्या राज्यभरात यापेक्षा मोठे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी #अमरावती #विद्यार्थी_आंदोलन
मा.@mpsc_office@bhimanwar
जा . क्र. 014/2026 मधील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांची गुणवत्ता यादी जाहीर नाही अस का? याच जाहिरातीतील संयुक्त मुख्य परीक्षा द्वारे घेतलेल्या उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक पदाची गुणवत्ता यादी तर आली बाकी का नाही आल्या ?
जा.क्र.010/2026 मधील पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल अजून आला नाही काही अडचण आहे का?
#MPSC #निकाल
अध्यक्ष सचिव आणि भ्रष्ट अधिकारी अजूनही आयोगात ठाण मांडून आहेत,
ही माणसं जोपर्यंत आयोगात आहेत तोपर्यंत गोरगरीब प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करणार🫵
घटनात्मक आणि पारदर्शकता फक्त नावालाच👎
केसाने गळा कापला..😔
#Mpsc#पेपरफुटी@RRPSpeaks@Dhananjay4INC
@Arvikasai ऑक्टोबर २०२६ गट क पूर्व आणि dec २०२६ मुख्य परिक्षा वरती परिमाण न होता सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन MPSC अध्यक्ष आणि सचिवांना पायउतार होण्यास सांगावे! ऊशिरा निर्णय घेतल्यास १२ लक्ष विद्यार्थी असणाऱ्या या परीक्षा वरती परिणाम होऊ शकतो.