📌 भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक
पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि जिल्हा मोर्चा अध्यक्ष यांची विभागीय आढावा बैठक पुणे येथे संपन्न झाली.
या बैठकीप्रसंगी कोल्हापूर शहर / पूर्व / पश्चिम, सांगली शहर / ग्रामीण, सोलापूर शहर / पूर्व / पश्चिम, सातारा, पुणे दक्षिण/ उत्तर / शहर, पिंपरी चिंचवड या परिसरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मंडल कार्यकारिणी तसेच मंडलाची निकषानुसार झालेली रचना, बूथ समित्यांची रचना, शक्ती केंद्र प्रमुखांची अद्ययावत यादी तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची रचना इ. सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
बूथ समिती व शक्ती केंद्र प्रमुख हे पक्षाच्या संघटनात्मक रचनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बूथ समिती या पूर्ण क्षमतेने तयार करा व त्या दृष्टीने संघटनात्मक कामाचे नियोजन करा असे आवाहन यावेळी केले.
या बैठकीला महामंत्री राजेश पांडे, महामंत्री रवि अनासपुरे इ. मान्यवर उपस्थित होते.
#Kolhapur #Sangali #Solapur #Satara #Pune #PCMC #WesternMaharashtra #Jilhadhyaksh #MandalAdhyaksh #JilhaMorchaAdhyaksh #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्रयागराज येथे दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगी कोठे परिवाराची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झालो.
स्व. महेश अण्णांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईशवर चरणी प्रार्थना!
#सोलापूर #Solapur
आपल्या अक्कलकोट मधील चपळगाव येथील रिनती इंग्लिश मीडियम स्कूल येथील वार्षिक स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी श्री. कुमारप्पा पाटील, श्री. उमेश पाटील, श्री. महेश पाटील, ह.भ.प. श्री. गुरव महाराज, श्री. अमर पाटील, श्री. अंबण्णप्पा भंगे, श्री. मनोज इंगुळे, श्री. रेवणसिद्ध भंगे, श्री. सुरेश सुरवसे, सौ. सुमन कुमारप्पा पाटील, सौ. रोहिणी उमेश पाटील, सौ. कल्पना जाधव, सौ. वर्षा भंडारकवठे, श्री. दीपक पाटील, श्री. राहुल काळे, श्री. प्रदीप पाटील, श्री. नागराज कुंभार, श्री. जाधव साहेब, श्री. अप्पू भंगे, श्री. सिद्धाराम भंडारकवठे आदी मान्यवर उपस्थित होते.
#Solapur #सोलापूर #स्नेहमेळावा #Snehmelava
सोलापूर लोकसभा मतदासंघासाठी भाजपा-महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आमचे परम मित्र, माळशिरसचे आमदार श्री. राम सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन आणि विजयासाठी अनेकानेक सदिच्छा !
#सोलापूर#लोकसभा#solapur#loksabha@RamVSatpute
अहो उद्धवजी...
निलंबित सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेताना कोण मनोरुग्ण होतं?
१०० कोटींच्या वसुलीचे आदेश कोणत्या मनोरुग्णाच्या काळात निघाले?
'ऍंटालिया'समोर स्फोटकं कोणत्या मनोरुग्णाच्या काळात सापडले?
मनसुख हिरेन या साक्षीदाराचा खून कोणत्या मनोरुग्णाच्या काळात झाला?
मराठी माणसाच्या पत्रा चाळीतल्या घरात कोणत्या मनोरुग्णाच्या संमतीने पैसे खाल्ले?
साधुंच्या हत्त्या होऊनही मूग गिळून बसणारा कोण मनोरुग्ण होता?
कोविड काळात मृतदेहांच्या बॅग्जमध्ये पैसे कोणत्या मनोरुग्णाच्या नेतृत्वात खाल्ले?
@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra@PrakashGade13