प्रति,
मा. श्री. अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार
नवी दिल्ली.
सस्नेह जय महाराष्ट्र !!
विषय : महाराष्ट्राच्या भूमीवर आयोजित हिंदी राजभाषा संमेलनात महाराष्ट्राच्या राज्यगीताचा सन्मानपूर्वक समावेश करावा तसेच नवी मुंबईतील "महाराष्ट्र भवन" व "मराठी भाषा भवन" उपकेंद्र बांधकाम पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी याबाबत.
महोदय,
नवी मुंबईत वाशी येथे आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय "हिंदी राजभाषा संमेलनाच्या" निमित्ताने आपण महाराष्ट्रात येत आहात. देशाच्या विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करणे ही भारतीय संघराज्याची आणि संविधानाची मूलभूत भावना आहे. परंतु एकाच राज्यात दोन वेळा हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या संमेलनात हिंदीचा सन्मान करताना ज्या महाराष्ट्राच्या भूमीवर हा कार्यक्रम होत आहे, त्या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा, अस्मितेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान होणे हीदेखील तितकीच आवश्यक बाब आहे.
हिंदी ही भारतातील एक व्यवहाराची भाषा आहे, हे आम्ही मान्य करतो; महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या राज्यगीताला स्थान देणे हा कोणत्याही भाषेचा अपमान नसून महाराष्ट्राच्या भूमीचा आदर आहे. म्हणूनच या संमेलनाच्या अधिकृत कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यगीत समाविष्ट करून त्याचा सन्मान राखला जावा.
याच पार्श्वभूमीवर दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत तो म्हणजे आपण नवी मुंबईतील ज्या कार्यक्रमासाठी वाशी येथे येत आहात त्या परिसरात विविध राज्यांची भवने दिमाखाने उभी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या-त्या राज्यांच्या नागरिकांसाठी त्यांची संस्कृती, प्रशासन, उद्योग, पर्यटन आणि सामाजिक ओळख मांडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु कार्यक्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र भवनच्या राखीव भूखंडावर प्रत्यक्ष काम सुरु होण्यास अनेक वर्ष गेली. मुळातच तो भूखंड विकण्याच्या मानसिकतेत असलेल्या सिडको प्रशासनाचा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाच्या माध्यमातून हाणून पाडला गेला त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्राचे स्वतःचे भव्य ‘महाराष्ट्र भवन’ उभे करण्याचे स्वप्न महाराष्ट्रातील जनतेला पाहता येत आहे.आपण देशाचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रात येत असताना या प्रश्नाकडे केवळ एका इमारतीच्या बांधकामाचा विषय म्हणून पाहू नये. इतर राज्यांची भवने तत्परतेने उभी राहिली परंतु महाराष्ट्र भवनचे प्रत्यक्ष काम सुरु होण्यास इतका विलंब का लागला हा प्रश्न वारंवार महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे. महाराष्ट्र भवन म्हणजे महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील येणाऱ्या सर्वसमावेशक घटकासाठीची ओळख, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, कला, साहित्य, उद्योग, पर्यटन आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या अभिमानाचे केंद्र असणार आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम पूर्ण होण्याची उत्सुकता साहजिकच आमच्या मनात आहे.
तिसरा आमच्या जिव्हाळयाचा आणि अस्मितेचा प्रश्न म्हणजे ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्र. विशेष म्हणजे महाराष्ट्रात हिंदी भाषा संमेलन आयोजित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची यंत्रणा, नियोजन आणि प्रशासकीय क्षमता वापरली जाऊ शकते परंतु ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच मराठी भाषा भवन उपकेंद्राची जागा असून देखील वीट रचता येऊ नये हे गंभीर आहे. जर त्या संदर्भात देखील आपण पुढाकार घेवून त्याच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचा निर्णय जाहीर केला तर मराठी अभिजात भाषेचा प्रचार व प्रसार होण्याचे ते केंद्र बनेल आणि इतर भाषिक लोकांचा मराठी शिकण्याचा मार्ग सुकर होईल.
म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी स्पष्ट आहे हिंदी संमेलन घेऊन हिंदीचा सन्मान करताय पण महाराष्ट्रात येताना मराठीचाही सन्मान करा. हिंदी भाषेचा उत्सव साजरा करा पण महाराष्ट्राच्या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा मोठेपणही दाखवा.त्याच बरोबर महाराष्ट्र भवन आणि मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या नावाने वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रतीक्षा आता संपवा.
त्यामुळे आपण या संमेलनाच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राच्या जनतेसमोर घोषणा करावी की नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन संपूर्ण बांधून लोकार्पण कधी होणार व मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या राखीव भूखंडावर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, भूमिपूजन कोणत्या तारखेला होणार आणि कोणत्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण होणार. ‘लवकरच’ किंवा ‘लवकरच पूर्ण होईल’, ‘प्रक्रिया सुरू आहे’ अशा सर्वसाधारण उत्तरांपेक्षा महाराष्ट्राला आता निश्चित तारीख आणि निश्चित कालमर्यादा ह्याची स्पष्टता हवी आहे.ती आपण द्याल ही अपेक्षा.
गजानन श्रीकृष्ण काळे
राज्य प्रवक्ता / शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नवी मुंबई
पश्चिम बंगाल मध्ये भाजप चा मुख्यमंत्री मंदिरात मासे,मटन खातोय ?
इथे राजसाहेब फक्त मटण हंडी बोलले की झोंबतय भाजपवाल्याना ...
काय खायचे,काय नाही खायचे याचा
शहाणपणा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी माणसाला शिकवणार ...
पश्चिम बंगाल,आसाम ,गोवा मध्ये गुडगे टेकणार ...
आज पुण्यात जो मोर्चा निघायला त्याला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज नाही..मी मागे पण सांगितले आहे DJ वर चर्चा होऊ शकते. पण तो बंद होत नाही.
DJ चा ज्यांना त्रास होतो तीच जनता सकाळी ७ ला उठून धर्मावर मतदान करती आणि तो पक्ष. ह्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही.
आपण कच्चून DJ लावायचे
नास्तिकांनी धर्मात लुडबुड करु नये असं वाटत असेल तर आस्तिकांनी धर्मातला कचरा साफ करावा. कायदा- सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो तेव्हा प्रश्न समाजाचा होतो!
#डिजेमुक्त_गणेशोत्सव_हवाच
श्री संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा करावा!
२१ सदस्यांच्या समितीत ११ सदस्य मेंढपाळ समाजातील बाळूमामांच्या भक्तांचे असावेत. अध्यक्षही बाळूमामांचा भक्त असावा. देवस्थानचा कारभार पारदर्शक आणि भक्तांच्या सहभागातून चालला पाहिजे!
#SantBalumama#DhangarCommunity#JaiMalhar