पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of DCP ZONE 5 Mumbai. For Emergency Dial 100/112.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित परिमंडळ 05 मधील एकूण 07 पोलीस ठाणे पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150#Ek
of educational institutions.
FIRs filed against 8 accused under the Juvenile Justice Act, 2015. 56 illegal stalls removed/seized with support from @mybmc . Action taken against 111 individuals under COTPA.
Ensuring a safer, substance-free environment for our children.
जय हिंद सर
आज दिनांक 21/06/2025 रोजी मा. सह पोलिस आयुक्त (का व सु ) सो यांच्या आदेशाने धारावी पोलीस ठाणे हद्दीत धारावी पोलीस स्टेशन चे अधीकारी व अंमलदार, CRP व RCP यांच्यासह संयुक्त *Familiarization Exercise* चे आयोजन करण्यात आलेले होते*.
प्रिय मुंबईकर,
सध्या शहरात मुसळधार पावसाची स्थिती आहे, आणि तुमची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.
कृपया काळजीपूर्वक बाहेर पडा, अधिकृत सूचनांचे पालन करा आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १००, ११२ किंवा १०३ या हेल्पलाईनवर कळवा.
आमचे पथक २४x७ तुमच्यासाठी कार्यरत असून, तुमच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे.
सावध रहा, सुरक्षित रहा!
#MTPUpdates
#StaySafeMumbai
#MonsoonAlerts
पुणे सी.पी.आर. येथे पार पडलेल्या केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक २०२२ प्रदान सोहळ्यात मा. @dgpmaharashtra यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आलेले माझे सहकारी पोलीस उप आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, वपोनि प्रमोद तोरडमल आणि पोनि दिपशिखा वारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
हा गौरव म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा केलेला सन्मान आहे.
#RewardingExcellence
Congratulations to my colleagues DCP Krishnakant Upadhyay, Sr. PI Pramod Tarodmal & PI Dipshika Vare on receiving the Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation 2022, presented by Hon. @dgpmaharashtra Rashmi Shukla in a special ceremony at C.P.R, Pune.
A proud recognition of their outstanding investigative work.
#RewardingExcellence
अवघ्या ६ तासात घडवली कुटुंबाची भेट!
@Mahim_PS हद्दीत एक ६ वर्षाची मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली. माहिम पोलिसांनी तात्काळ शोध सुरु केला. तसेच मुलीच्या शोधासाठी @DcpZone5Mumbai यांनी @DharaviPS आणि @ShahuNagarPS ची पोलीस पथके तयार केली.
तपास करून सदर मुलीला धारावी येथून ताब्यात घेतले. तसेच मुलीला तिच्या पालकांकडे सुरक्षितरित्या सुपूर्त केले.
#MumbaiCaseFiles #ReunitingHappiness
.@VBNagarPS हद्दीत एका अज्ञात इसमाने रिक्षा चोरी केल्याची तक्रार दाखल झाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने गुन्हयातील सराईत आरोपीला अटक केली आहे तसेच पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध मोटार वाहन चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नमूद आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार ३१९/२०२५ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयातील एकूण १,७०,०००/- रु. किमतीचे, रिक्षा आणि तसेच इतर दोन गुन्हयातील दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत.
#MumbaiCaseFiles
धक्काबुक्की करून शिवीगाळ करत, धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार @VBNagarPS पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यावर कारवाई करत तांत्रिक तपासाच्या आधारे डोंगरीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे येथील वाघबीळ जंगलात सापळा रचून २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
#MumbaiCaseFiles
.@VBNagarPS received a complaint of attempt to murder, where the accused had attacked the complainant and his father with a chopper knife.
Using technical investigation and input from informers, the investigating team laid a trap and arrested the two wanted accused from the forest in Dongripada, Thane.
#MumbaiCaseFiles
.@VBNagarPS arrests motor vehicle thief, uncovers links to 3 additional cases.
Acting on a complaint of a stolen auto-rickshaw, VB Nagar Police Station launched a technical investigation and successfully tracked down an individual. Upon arrest, the stolen auto-rickshaw was recovered from his possession. Further investigation led to the seizure of 2 additional motorcycles connected to separate theft cases, with motor vehicles valued at ₹1,70,000/- recovered. In total, three cases have been linked to the accused, and further investigation is currently underway.
#MumbaiCaseFiles
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 व सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये दादर, माहीम, कुर्ला विभाग आणि पोलिस स्टेशन दादर, शिवाजी पार्क, माहीम, शाहू नगर, धारावी, कुर्ला, विनोबा भावे नगर यांना ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
During Hon'ble CM sir's 100 days action plan DCP Zone 5 office and ACP Offices Dadar, Mahim, Kurla Division and Police Stations Dadar, Shivaji Park, Mahim, Shahu Nagar, Dharavi, Kurla, Vinoba Bhave Nagar have been awarded ISO 9001:2015 certificate.
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 5 मुंबई आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@CMOMaharashtra@CPMumbaiPolice@MTPHereToHelp@MumbaiPolice