आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात., करिअरला कळत नकळत आकार देतात.
उगीचच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्वल भविष्याचा विचार अन् साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती ...
-प्रफुल्ल वानखेडे
#Valesofmoney
अपारंपारिक उर्जा क्षेत्र देशात व जगभरात बऱ्यापैकी वाढतंय.
यात सोलार प्लांट इन्स्टॉलेशन्स, ऑपरेशन्स आणि मेंटेनेंसमधे अजून नोकऱ्या वाढतील.
परंतू खरी सुवर्णसंधी ही ती उर्जा साठविण्याच्या तंत्रज्ञानात असेल. बॅटरीज्……मोठमोठ्या “बॅटरी बॅंक्स” हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
आपलं मन कशातून जातंय, ते काय सहन करतंय,त्याला काय वाटत आहे, हे आपल्याला पण माहीत असतं पण हेच मन कुठेतरी गुंतवून आपण त्याला divert करतो आणि आपल्या मनावर आपल्याकडून च वारंवार दुर्लक्ष होत असतं.
आपल्या चांगल्या वाईट काळात आपण स्वतःसोबत कायम खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं असतं.. चांगल्या काळात आनंदासोबत नम्रपणा घेऊन आणि वाईट काळात संयमासोबत स्वतःवरील विश्वास ढळू न देता सोबत द्यायला हवी..स्वतःची भक्कम सोबत ही लाखमोलाची असते.ती आपण स्वतःला द्यायलाच हवी..
ज्यांना आपलं सूख, प्रगती बघून मनापासून आनंद होतो तिच लोकं आपली असतात. बाकी, आपल्याला मजेत बघून अस्वस्थ होणारे आणि आपल्या नावाने बोटं मोडणारे तर आजूबाजूला कचऱ्यासारखे पडलेले असतात.
#निरीक्षण
पूर्वीच्या काळी माणसाला मरायला म्हातारपण यावं लागायचं. आता मात्र मरायला वयाच्या बंधनाची अट शिथिल करण्यात आलेली आहे असे वाटते. कुणाच्या आत्म्याचा फ्युज कधी उडेल काही सांगता येत नाही. प्रत्येक क्षण आपला आणि मृत्यूचा लपाछपीचा खेळ सुरू असतो.
माणसाचं एवढ पाठांतर तरी असावं की कुठल्याश्या शून्य रिकाम्या vaacum क्षणी माणसाला दोन ओळी, कवितेच्या,अभंगाच्या, श्लोकाचा किंवा शायरीच्या तरी गुणगुणता याव्यात म्हणजे ती क्षणाची पोकळी भरुन काढता येईल..
माणसाने असच असावं असं मी म्हणणार नाही पण आपण सोडून गेलेल्या ओढ्याच्या मागे तळं होऊन राहण्यात काही एक अर्थ नसतो ... ओढाच व्हा जमलं तर , दुसरा प्रवाह भेटला की मिसळायचं आणि पुढे कुठेतरी जाऊन बाजूला झालोच तरी आपलं वाहत राहायचं ... तळं होऊन राहण्यात काही एक अर्थ नाही ...!
!! वेळ अमावस्या शेतातला विशेष सण !!
शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात.
सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही
‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
भारतीय सिनेमा को नई ऊँचाई देने वाले महान फिल्म निर्माता, श्याम बेनेगल जी के निधन की खबर दुखद है।
उनका योगदान हमेशा याद रखा जाएगा।
विनम्र श्रद्धांजलि...💐🙏🏼
#श्यामबेनेगल#shyambenegalpassedaway
ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली
सरकार दरबारी अडकलेल्या कामांची ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध
ग्रामपंचायत, तहसिल, पंचायत समिती, ZP, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, महानगरपालिका / शासनाच्या कोणत्याही विभागात निःशुल्क तक्रार करु शकता
☎️
१८००१२०८०४०
https://t.co/5xhG81jjV8
जुन्या,खडखड वाजणार्या,लाल भडक रंगाच्या एस-टी मधून प्रवास करणारे प्रत्येक लहान मुल हे 'आपण सुद्धा कंडक्टर किंवा डायवर व्हावे आणि गावोगावी फिरावे;प्रत्येक डेपोला थांबून आलेपाक,ऊसाचा रस,गारेगार खावे' असे स्वप्न पाहत असते.त्यांच्या या कोवळ्या स्वप्नांतच एस-टीचे महात्म्य दडले आहे.