पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीला १ अब्ज रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले ७५ हजार…
नमस्कार मित्रांनो,
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भयंकर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली, उभा महाराष्ट्र त्यावेळेस हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपपल्या परीने मदत करत होता. अशात मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत देण्यासाठी लोकांचा ओढा वाढला, सरकारी पातळीवरून सुद्धा स्पेशल मोहीम राबविण्यात आली, सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला, आमदारांनी आपले महिन्याचे वेतन दिले, अगदी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी साखर कारखान्यांना तंबी देऊन एक टन उसामागे १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे सांगितले, शासनाने तसा जीआर काढला.
सहजच मी आपला एक RTI टाकला की ऑक्टोबर २०२५ मधे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये किती रुपये जमा झाले आणि त्यातील किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. तर त्यातून मला मिळालेले उत्तर असे ‘तब्बल १ अब्ज रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा झाले आणि फक्त ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली’.
आपण दिलेली मदत गरजू पीडित व्यक्तीला पोहचेल असे वाटणाऱ्या देणेकऱ्यांचे काय? किती आशेने त्यांनी पैसे दिले आहेत, कोणी अगदी आपले लग्न साधे करून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देते, कोणी रिटायर व्यक्ती आपले पेन्शनचे पैसे आणून देतो, कारण त्यांना सरकारवर विश्वास असतो. पण सरकार करतेय काय? माझी तर अशी मागणी आहे की सरकारने आपली पारदर्शकता उंचावण्यासाठी एक स्वंतंत्र डॅशबोर्ड विकसित करावा, ज्यात महिन्याला किती पैसे आले अन त्याचा विनियोग कसा झाला हे समाजमाध्यमात जाहीर करावे.
RTI मधून असे उत्तर मिळणे खेदजनक आहे. हा त्या सगळ्या दानकर्त्या लोकांच्या विश्वासाला तडा बसण्याचा प्रकार आहे. इथून पुढे कोणी का पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावे ? स्वतःच परस्पर मदत का करू नये ? याचे उत्तर प्रशासन देईल का? दिलेच उत्तर तर त्या उत्तराने संकटासोबत दोनहात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@supriya_sule@VijayWadettiwar@rautsanjay61@AUThackeray
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेवर नाव नसण्याचे कारण म्हणजे Table of Precedence नुसार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यानंतर पंतप्रधान यांचा क्रमांक येतो.
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याचा अधिकार हा न्यायालयाला नसून संबंधित कायदेमंडळाला असल्याचे म्हणणे केंद्र सरकारने याप्रकरणी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिले आहे.
समलिंगी संबंधांना मान्यता देण्याबाबतच्या प्रवासातील पुढचा टप्पा म्हणून या याचिकांकडे बघितले जात असून यापूर्वी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांचं गुन्हेगारीकरण रोखलं होतं. आता समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
असे विवाह भारतीय परंपरेच्या विपरीत असून विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य ही संकल्पना असताना समलिंगी विवाहांना त्यात जागा नाही अशी भूमिका केंद्राने मांडली आहे.
गोध्रा रेल्वे जाळपोळ प्रकरण-
17 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगत असल्याच्या कारणावरुन जामीन मागणाऱ्या एका दोषीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सदर दोषीची जन्मठेपेची शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील प्रलंबित आहे.
अग्निवीर हे शिपायांपेक्षा कनिष्ठ दर्जाचे सैनिक, अग्निवीरांची सेवा ही सशस्त्र दलातील नियमित सेवेचा भाग मानली जाणार नाही.
- केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती
महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना CBI प्रकरणात जामीन मंजूर
देशमुख यांच्यावर CBI आणि ED कडून 2 केसेस दाखल असून ED प्रकरणात यापूर्वीच त्यांना जामीन मंजूर झाला आहे. आता CBI प्रकरणात जामीन मंजूर झाल्यामुळे देशमुख न्यायालयीन कोठडीतून बाहेर येतील.
भीमा कोरेगावप्रकरणी गौतम नवलखा यांच्याविरुद्धचा स्थानबद्धतेचा रद्द करणारा आदेश न्या. मुरलीधर यांनी दिल्यानंतर अग्निहोत्री यांनी यावर अवमानकारक टिप्पणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जाती (SC) दर्जा देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका नॅशनल कौन्सिल ऑफ दलित ख्रिश्चन (NCDC) नावाच्या संघटनेने दाखल केली आहे.
धर्मांतर केलेल्या दलितांना आरक्षण देता येईल का यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात खल सुरु आहे. यासंबंधी नेमण्यात आलेल्या रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशी स्वीकारणार नसल्याची स्पष्ट भूमिका सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली.
निवृत्त CJI रंगनाथ मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक आयोगाने सादर केलेल्या 2007 च्या अहवालात दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची शिफारस केली होती.