#धाराशिव -जनगणना-२०२७ च्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात जनगणना पूर्वतयारीला गती देण्यात आली असून घर यादी व गृहगणना टप्प्यापासून डिजिटल जनगणनेपर्यंत सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
पीटीसी – @devidaspathak
#धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप येथे येत्या २९ तारखेला ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी,ग्रंथप्रदर्शन,चित्रप्रदर्शन,परिसंवाद,कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिर असे उपक्रम घेण्यात येणार आहे.
पीटीसी – @devidaspathak
#धाराशिव -कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आज धाराशिव येथे साडी वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले. यात शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवरुन साडी परिधान करुन महिलांनी कर्करोगाबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
पीटीसी- देविदास पाठक
#धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी मतदान सुरू आहे. आमदार राणा जगजीत सिंह पद्मसिंह पाटील यांनी तेर येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
पीटीसी – @devidaspathak
अ.भा. विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार डॉ अशोकराव मोडक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
वैचारिक मंथन आणि शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच होते. भारतीय तत्त्वज्ञान, एकात्म मानवदर्शन आणि वीर सावरकर इत्यादींवर विपुल लेखन त्यांनी केले. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. रशिया आणि भारत संबंध हा सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. छत्तीसगड केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏
२०२५ या वर्षात काय काय घडलं? जाणून घ्या दृष्टीक्षेप २०२५ या तीन भागांच्या विशेष मालिकेत!
📅 २९ ते ३१ डिसेंबर
⏰ रात्री ९ वाजता
📺 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर
पाहायला विसरू नका!
#दृष्टीक्षेप2025#Drushtikshep2025#DDSahyadriNews
#धाराशिव - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची उपस्थिती होती.
#धाराशिव - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे जिल्हा पोलीस दलातर्फे आज एकता दौड घेण्यात आली. पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते.
पीटीसी - @devidaspathak
#धाराशिव - धाराशिव तालुक्यातल्या तेर येथे पुरातत्त्व खात्याकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज पाहणी केली. श्री संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात सुरू असलेली विविध विकास कामं चार महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
#धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने खासगाव आणि वागेगव्हाण या गावात पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. सीना नदीच्या काठावरून पुरबाधित ग्रामस्थांकडून पुरपरिस्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यावेळी उपस्थित होते.
#धाराशिव - अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत तहसीलदार यांच्याकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
पीटीसी – @devidaspathak
#धाराशिव – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात आयोजित नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी दोन हजारहून अधिक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. मेळाव्यात ४७८ युवकांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.
पीटीसी – @devidaspathak
#धाराशिव - श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोज डोलारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
पर्यावरणीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
📢 मुंबई दूरदर्शन केंद्रात पदभरती!
प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर (मराठी) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांच्या संपूर्ण माहितीसाठी: https://t.co/veDF4euhYL
📅 पात्र उमेदवारांनी १५ दिवसांत https://t.co/IYUK0TCiC3 वर ऑनलाइन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी: https://t.co/MjrWdxyG5g
#MarathiJobs #Marathinokri #openings #vacancies #Jobs #MumbaiDoordarshan #JobAlert #PrasarBharati #DDSahyadriNews
#धाराशिव:उमरगा च्या माऊली प्रतिष्ठानने दरवर्षी दसरा सणानिमित्त काढण्यात येणारी हिंदू शौर्य यात्रा सीमोल्लंघन कार्यक्रम साध्या पद्धतीने करून यावर खर्च होणाऱ्या रकमेतून जिल्ह्यात पूर परिस्थितीत संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला.
@devidaspathak
#धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मौजे नागुर इथं पुरामध्ये बुडून मृत्यू झालेल्या बालाजी व्यंकट मोरे यांच्या कुटुंबियांना आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शासनाकडून ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
पीटीसी - @devidaspathak