Objective ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील चळवळ आहे त्यामुळे आपण जिथे कुठे असतील तिथून ताकदीने सहभागी होयाचं आहे.भंपकगिरी करून poll घेणारे दळभद्री आणि लाखोंच्या फीस लाटणाऱ्या भुरट्यांना आपल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करू द्याच नाही आता.
@Objective2027 🔥💯
TWITTER WAR 🔥
दिनांक - 18 ऑक्टोबर
वेळ - सकाळी 10 ते 12
विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दगडी मारली तर ९ जणं त्यातली OBJECTIVE SUPPORTER आहेत
प्रत्येकानं उद्या ट्विटर War मध्ये सहभाग घ्या.
@yogsara @GaneshgSpeaks@BaliramDoleyINC @Nikhil_A_Patil @SGVRathod@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळला!
महाराष्ट्रातील MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आशादायी निर्णय!
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भरती प्रक्रियेत पदसंख्या वाढविण्याबाबत दिलेला शब्द पाळत, उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त ११ हजारांहून अधिक पदा��चा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी हा निर्णय हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.
युवकांच्या अपेक्षांचा सन्मान करत त्यांच्या भविष्याचा विचार करणारे हे संवेदनशील आणि सकारात्मक नेतृत्व आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, आता युवकांना संधी मिळणार!
धन्यवाद देवाभाऊ🙏🏻
@DevendraFadnavis
#MPSC #Maharashtra #YouthEmpowerment
@Dev_Fadnavis
Mpsc Objective संदर्भात काल पुणे मनपा सभागृह नेते गणेशजी बिडकरांची भेटू घेऊन लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली..त्यांनी @Dev_Fadnavis साहेबांना संपर्क साधून आपली समस्या पुन्हा एकदा त्यांचा कानावर ��ातल्या लवकर सकारात्मक दृष्टीने काम होणार असेही सांगितले.
धन्यवाद बिडकर साहेब🙏
Objective 2027 💯🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@mohol_murlidhar
@BJPGaneshBidkar
Descriptive Pattern / Objective Pattern हे जे पोरं MPSC #Prelims उत्तीर्ण झाले त्यांना विचारायला हवं.
काही माठखैरे..तलाठी MPSCत आली म्हणून MPSC देताय.. त्यांना तर OBJECTIVE तुक्केबाजीच आवडणार..!
पण; जोपर्यंत Descriptive साठी Infrastructure नाही तोपर्यंत OBJECTIVE असूद्या! ✅
Descriptive Pattern / Objective Pattern हे जे पोरं MPSC #Prelims उत्तीर्ण झाले त्यांना विचारायला हवं.
काही माठखैरे..तलाठी MPSCत आली म्हणून MPSC देताय.. त्यांना तर OBJECTIVE तुक्केबाजीच आवडणार..!
पण; जोपर्यंत Descriptive साठी Infrastructure नाही तोपर्यंत OBJECTIVE असूद्या! ✅
वर्णनात्मक पॅटर्नमधून पत्रकारितेची पदवी (Degree) घेतलेल्या काही पत्रकारांनी केवळ कोचिंग संस्थांचीच बाजू उचलून धरत माध्यमांमध्ये दाखवणे कितपत योग्य आहे? जेव्हा विद्यार्थी आंदोलनात 'अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे' अशी मागणी करत होते, तेव्हा त्यांनाच टोमणे मारल्यासारखे 'त्यांच्या राजीना��्याने तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?' असे एकच प्रश्न वारंवार विचारणारे काही पत्रकार होते. अशा सर्व पत्रकारांना माझी नम्र विनंती आहे की, कधीतरी कोचिंगवाल्यांच्या आलिशान AC ऑफिसमधल्या मुलाखती घेण्याचे सोडवून, कधीतरी सदाशिव पेठेत येऊन विद्यार्थी किती मेहनत घेत आहेत, हे सुद्धा ऐका आणि समजून घ्या.जर Descriptive पॅटर्नच फक्त चांगला आणि Objective वाईट असेल, तर भारतातील पत्रकारांनी 'बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन' (BJMC) ची पदवी वर्णनात्मक पॅटर्नने पास करूनसुद्धा आज जगात भारतीय मीडियाची रँकिंग इतकी खराब का आहे?
Objective Pattern मागणी का चालू आहे? वर्णनात्मक पॅटर्नचे पेपर कसे rechecking साठी जात आहेत? या महत्त्वाच्या गोष्टींवरही प्रकाश टाका. कधीतरी पत्रकारांनी सत्याशी ���कनिष्ठ राहावे, हीच अपेक्षा!
#objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil @Dhananjay4INC @phoenixiasbyNS
आदरणीय राहुल कुलकर्णी सर,
आपण जो काल obj vs des चा TM सरांचा जो व्हिडिओ युट्यूब वर तसेच इतर माध्यमांना वरती टाकला त्या खालच्या कमेंट plz एकदा वाचा...जेणेकरू आपल्याला लक्षात येईल आणि तसेच एकदा पोरांना येऊन सर्व विषय समजून घ्या...
descriptive पॅटर्न का नको आहे हे TM सर पेक्षा जे मुले आता हे सगळे फेस करत आहे ते जास्त चांगले सांगतील...TM सरांना परीक्षा देऊन 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी ओलांडला आहे.
अनेक वर्ष प्रयत्न करून सुध्दा mpsc मधून मात्र ते क्लास 1 होऊ शकले नाही एवढ्या हुशार माणसाला ज्या व्यवस्थेत यश मिळाले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना.
तुमची भूमिका आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सारखी एकतर्फी दिसून येत आहे हे सगळे कशासाठी हे समजण्यापलीकडे आहे...
आम्ही विद्यार्थी नाहीत का आम्ही तयारी करून हे सगळे प्रकार फेस करत आहोत आमची मानसिक-स्थिती तुमच्या लक्षात येत नसेल तर आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या आता..
तुमच्यासारख्या पत्रकारा कडून जास्त अपेक्षा ठेवतो...या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हाच मोठा स्टेक होल्डर आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत तुम्ही तरी त्याचा भाग बनू नका...त्याला समजून घ्या त्याला काय बोलायचं ऐकून घ्या...हीच विनंती 🙏
फक्त descriptive चे गोडवे गावू नका ..
तुमच्यासारखे चांगले लोक येऊन बसा mpsc मध्ये आणि द्या हमी कसलाही गैरप्रकर होणार नाही तुम���े वेळ आणि वर्ष वाया जाणार नाही आणि ��ुशाल घ्या कोणत्याही पॅटर्न ने परीक्षा...
स्वतःचे मिनिट सुद्धा वाया न घालवणारे तुम्ही आमची अनेक वर्षी अशीच जात आहे याचा विचार करणार का नाही...
2025 ची परीक्षा descriptive पॅटर्न ने झाली आता 2027 चालू होईल परंतु अजून काहीच नाही... एका परीक्षेला 2/3 वर्ष जाणार असेल तर विचार नाही करायचा आम्ही...
बाकी eng,agri,FSO यांच्याबद्दल बोलायलाच नको...मागच्या 3 वर्षापासून हे पोरं न्यायची भीक मागताय एकदा भेटा त्यांना मग कळेल काय करून ठेवले आहे ह्या descriptive ने
Thanku sir🙏
@CMOMaharashtra
@RahulAsks
@Nikhil_A_Patil
@AbhiPawarBJP
@AbhijitKaran25
@Objective2027
आपल्या सर्वांच्या मागण्या सातत्याने सरकार दरबारी मांडण्याचे काम करणारे आणि तेवढ्याच आपलुकीने विचारणारे देवेंद्रजी सुध्दा एवढा विश्वास ठेवतात निखिल आलाय तर नक्कीच विद्यार्थ्यांचा मागण्या घेऊन आला असतील,मागच्या काही महिन्यानंपासून अनेक वेळा निखिल पाटलांनी mpsc विद्यार्थ्यांसाठी cm साहेबांची भेट घेऊन त्याच्या गोष्टी मार्गी लावण्याचे काम केले आहे..कुठे गाजावाजा न करता विद्यार्थी हित पुढे करून तुम्ही काम करत आहात हे सगळे विद्यार्थी बघत आहे दादा..🔥
आमचा मुद्दा मार्गी लावला की mpsc इतिहासात आपले नाव cm साहेबासोबत अजरामर होईल यात शंकाच नाही.
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@Objective2027
🫢
खेळ लावला होता पोरांच्या आयुष्याचा...
अजून वेळ गेलेली नाही विद्यार्थ्यांना ���्याय द्या.. पारदर्शकता व विश्वास असलेला Objective पॅटर्न 2027 लागू करून येणारे मोठे संकट टाळा..
@Dev_Fadnavis साहेब आपण ही ग��ष्ट लक्षात घेऊन यात लक्ष घातले या बद्द्ल धन्यवाद आता फक्त अंमलबजावणी करून द्या आणि लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास या प्रकियेवर पुन्हा स्थापित करा ही विनंती.🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@GaneshBidkarBJP
@Nikhil_A_Patil
विचार करा मित्रांनो!
ही कोचिंग माफिया, ज्यांना काहीही करून आपल्या क्लासचा धंदा चालू ठेवायचा आहे, त्यांना DESCRIPTIVE पॅटर्नच हवा आहे. ज्या आर्थिक हितसंबंधांसाठी हा DESCRIPTIVE पॅटर्न आणला गेला, ती मंडळी या सर्व गोष्टींवर गप्प बसणार! विद्यार्थी मानसिक तणावात राहून झिजले तरी चालतील, पण आमच्या पोटापाण्यासाठी डिस्क्रिप्टिव्हच ठेवा, हीच त्यांची वृत्ती आहे. हे बोलब��्चन करणारे कोचिंग माफिया याच्यावर का काही बोलत नाहीत?
UPSC चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जसाच्या तसा कॉपी क��ला, पण पेपर चेकिंग करताना UPSC जे Moderation,Normalisation आणि Scaling करते, ते यांनी काहीच केले नाही? आपण १० वी पर्यंत प्रायव्हेट ट्युशन लावतो आणि ते जसे पेपर चेक करतात, तसेच पेपर इथे चेक केले गेले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या SANJAY SINGH Vs UPSC या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मान्य केले होते की, मोठ्या प्रमाणावर (Mass level) जेव्हा नागरी सेवांचे पेपर तपासले जातात, आणि खास करून वेगवेगळ्या Optional विषयांसाठी गुणांमध्���े होणारा अन्यायकारक फरक थांबवण्यासाठी नॉर्मलायझेशन झालेच पाहिजे! तरीही MPSC ने असे काहीही केलेले नाही. दहावीचा ट्युशन टीचर जसा पेपर चेक करतो— एकाला २० पैकी २० तर दुसऱ्याला २० पैकी ५, अशी मार्किंग या नागरी सेवा परीक्षेत केली गेली आहे.
यावरून हेच सिद्ध होते की, MPSC आयोगाची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राबवण्याची अजिबात क्षमता नाही! नुसता मोठा पॅटर्न आणायचा आणि मार्किंग मात्र शाळेसारखी करायची, हे आता आम्हाला सहन होणार नाही!
आम्हाला आता पारदर्शक OBJECTIVE (MCQ) पॅटर्नच हवा आहे, जिथे बरोबर उत्तराला बरोबर गुण आणि चुकीच्या उत्तराला ठरलेले निगेटिव्ह गुण असतील.
असा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारा पॅटर्न आम्हाला नको!
#objective2027
MPSC आयोगाला नम्र विनंती आहे की, सध्या समोर कोणतेही निश्चित ध्येय नसल्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे विचलित झाले आहेत. आमची मुख्य मागणी अशी आहे की, आयोगाने लवकरात लवकर राज्यसेवा मुख्य परीक्षा ���०२६ आणि गट-ब मुख्य परीक्षा २०२६ या दोन्ही परीक्षांच्या तारखांची त्वरित घोषणा करावी.
विद्यार्थ्यांना पुणे किंवा इतर शहरांमध्ये राहून अभ्यास करताना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो आणि त्यानुसार मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. जर परीक्षांच्या तारखा वेळेत जाहीर झाल्या, तर विद्यार्थी त्यानुसार त्यांच्या पुढील अभ्यासाचे व राहण्याचे योग्य नियोजन करू शकतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office
Objective pattern सर्व विद्यार्थांच्या हिताचा असणार आहे जे आज वि��ोध करत आहे खाजगी आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देत आहे त्यांचे उद्देश मुळात काय असावा याची कल्पना आहे. मात्र जे माझे मित्र या क्षेत्रात नवीन आले आहे त्या सर्वांना आवर्जून सांगतो उद्या तुम्हीच या कामाबद्दल आमच्या सगळ्यांना धन्यवाद नक्की मानाल.
objective पॅटर्न येणार आणि 2027 लाच @Dev_Fadnavis साहेब आणणार.💯🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
बाकी खालील व्हिडिओ माझ्या विरोधी मित्रासाठी ज्यांनी त्यांची नीतिमत्ता गह��ण ठेवली आहे.🙂♥️
माननीय @Dev_Fadnavis साहेब आपण नेहमी स्वच्छ शासन व प्रशासन साठी परिचित आहात.जो काही घोळ mpsc मध्ये यांनी घालून ठेवला आहे तो सर्व सुरळीत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहात ते आम��ही सगळे बघत आहोत.. व्हि राधा समिती विद्यार्थ्यापाशी पोहचली समस्या जाणून घेतल्या हे तुमच्यामुळे शक्य झाले. विविध सुधारणेसहित मुख्य सुधारणा म्हणजे objective pattern ची मागणी 99% विद्यार्थ्यांची आहे आणि न्याय आहे तसेच mpsc वरील विश्वास व पारदर्शकतेसाठी तिची अपरिहार्यता आहे. त्यामुळे diwali अगोदर ही मागणी मान्य करून विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करावी ही विनंती.👏
सर्वच परीक्षा objective नुसार 💯🔥
#mpscobjective2027
@CMOMaharashtra
@mpsc_office
@Nikhil_A_Patil
@PrakashGade13
@Objective2027
वर्णनात्मक पद्धतीमुळे ग्रामीण,आर्थिकदृष्ट्या मागास आणि क्लासेसची फी परवडू न शकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. स्पर्धा आधीच गळाकापू असताना, केवळ वरवरच्या सुधारणांसाठी झालेला हा बदल आत्मघातकी ठरला आहे हे मात्र नक्की.
त्यामुळे पूर्ववत असणार objective परीक्षा पद्धती लागू करून पारदर्शकता परत आण्यासाठी व पेपर फोडणाऱ्यावर टोळीवर कठोरातील कठोर शिक्षेची कारवाई या साठी माननीय @Dev_Fadnavis साहेब आपल्याकडे समस्त mpsc करणारा वर्ग आशेनं बघत आहे आणि आपण शब्द दिल्याप्रमाणे हे सगळं लवकरात लवकर करून या सर्वांची दिवाळी गोड करणार यात तिळमात्र शंका नाही.
Objective 2027🔥💯
@CMOMaharashtra@Objective2027@VRadhaIAS@mpsc_office
सर्व विभागातून objective चीच मागणी मूख्य होती हे सत्��� तर आता नाकारता येणार नाही त्यामुळे @Dev_Fadnavis साहेब बोलल्या प्रमाणे विद्यार्थ्यांचा भावना जाणून घेऊन टास्क फोर्स निर्णय घेईल त्याला अनुसरून objective pattern आणायला अडचण नसायला हवी. विद्यार्थ्यांचा विश्वास असणारा आणि पारदर्शकपणा ठळकपणे दिसून येणारा objective परीक्षा पॅटर्न पुन्हा आणण्याची शिफारस करावी ही 99% विद्यार्थांची विनंती आहे.
Objective 2027 💯🔥
@CMOMaharashtra
@INCHarshsapkal
@GaneshBidkarBJP
@VRadhaIAS
@Nikhil_A_Patil
@BaliramDoleyINC
@Objective2027
@Dhananjay4INC
आनंदाची बातमी!
देशासाठी लढणार्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक ते बदल करुन आता 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून महारा��्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती.
त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा 282 अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे आणि तसे आदेशही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
नव्या भूमिकेत या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
#Agniveer #Maharashtra @adgpi
अरे मित्रा,
मागणी आम्ही आणली याचा अर्थ असा आहे सर्व विद्यार्थांच्या मनात ती धकधक होती आणि ती मागणी निर्माण केली याचा अर्थ आज नाही केली जेव्हा agri,eng,FSO यातील घोटाळे आणि RS तर "the straw that broke the camel's back" ठरली आणि मागणीने तीव्र रूप धारण केले.
@Objective2027 💯🔥