छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचे चित्र पहायला मिळतयं.
सत्ताधार्याच्या विरोधात बोलाल तर बंगल्यावर नेऊन मारू सत्ताधार्यांच्या विरोधात बोलाल तर खोट्या केसेस करू आणि
सत्ताधार्या सोबत नसाल तर घर ही तोडू. #संविधानबचाओ
परवाच्या बडनेराला दौर्यात माजी मंत्री डॉ. सुनीलजी देशमुख व डॉ.सौ.सोनाली देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी सहकार्यांसह सदिच्छा भेट @SunilPDeshmukh@bjp4amaravati
परवा बडनेराला@ShivarayK या प्रगल्भ अभ्यासू व लोकांशी जोडलेल्या बंधुरायाची भेट झाली अजिबातचं वाटलं नाही कि आमची पहिली भेट होती.सई वहिनी गार्गी यांनी अगत्याने स्वागत केलं वहिनींनी स्वत:च्या हाताने बनवलेली रांगोळी भेट दिली. प्रेम,जिव्हाळा यापेक्षा वेगळा तो काय असतो बंधू मनस्वी आभार
संपुर्ण विदर्भ पहिल्यांदा जिच्या सोबत फिरले ती माझी सखी,सहकारी प्रगती पाटीलच्या घरी नागपूरला गेलेले.
नेहमीसारखचं मायेने आदरतिथ्य करणारी प्रगती व तितक्याच काळजीने रात्री एअरपोर्टवर डबा पाठवणारे अजय जी.
तुम्हा दोघांनाही धन्यवाद नाही म्हणणार कारण क़ायम तुमच्या ऋणात रहायला मला आवडेल.
सध्या पोषणआहार सामग्री घरी पाठवली जाते जसे २०/२२ अंडी,७५०gm सोयाबीन व इतर ते प्रत्यक्ष मातेला मिळत नसल्याचं आमच्या सर्वेत निदर्शनास आलयं.
विनंती या मातांना अंगणवाडीत बसवून आहार द्यावा ज्या उद्देशासाठी अमृतआहार योजना आहे ती सफल होईल.२@CMOMaharashtra@AdvYashomatiINC@Dev_Fadnavis
दुध भुकटी आदिवासी महिला मुलांना मोफत देण्याचा सरकारचा निर्णय निश्चीतचं चांगला.या कोविड काळात पोषणासाठी मुलांना,स्तनदा व गरोदर मातांना त्याचा लाभ होईल मात्र आहार अंगणवाडीत बसवून द्यावा प्रत्येक अंगणवाडीत सरासर ३/४ गरोदर/स्तनदा माता आहेत त्यांना खबरदारी घेत आहार नक्की देतां येईल..१
"अगर तुम सुरज कि तरह चमकना चाहते हो, तो सुरज कि तरह जलना सिख लो"
भारत देशाला अणुशक्ती संपन्न देश बनवत, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारे मिसाईल मॅन,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन..!
#APJAbdulKalam#MissileMan
MITमहाराष्ट्र सरपंच संसद व ग्रामसमृद्धी अतंर्गत नाशिकच्या निफाड व चांदवड या प्रमुख द्राक्षोत्पादक तालुक्यात 1000 द्राक्षबागायतदार मालक महिला ज्यात 40%द्राक्षबागायतदार महिला ह्या स्वतः ट्रॅक्टर,ब्लोअर वापरून आधुनिक पद्धतीने द्राक्षशेती करतात अशा कर्तबगार कारभारणींशी संवाद साधला
संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व नरहरी भक्तांना व समस्त सुवर्णकारांना हार्दिक शुभेच्छा...!
देवा तुझा मी सोनार..
करी नामाचा व्यवहार..!
अजूनही रोह्यातील लहानग्या निर्भयाच्या आई वडील नातलगांचा काळीज भेदणारा आक्रोश कानात घुमतोय.
बलात्कार करून मारून टाकलं निष्पाप लहानगीला.पंचक्रोशी हळहळली पण सरकार ला मात्र याचं काही सोयरंसुतक नाही.किती बळी गेल्यावर सरकार जागे होणार आहे??पुन्हा विचारतीये कधी आणताय “दिशा” कायदा ??