MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा या ऑफलाईन असाव्यात की ऑनलाईन?
हा पोल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा जेणेकरून या विषयाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचा कल MPSC व सरकारच्या लक्षात येईल.
Join Telegram: https://t.co/SLR9EGTnP3
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
MPSC व राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला पुराव्यासह जो विरोध करत आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
विद्यार्थ्यांचा आवाज दाबून CBT लादण्याचा हट्ट बंद करा! लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ऑनलाइन परीक्षा रद्द करा, ऑफलाइन परीक्षा जाहीर करा. अन्यथा राज्यभर तीव्र लोकआक्रोशाला सामोरे जावे लागेल.
@ShelarAshish#MpscOffline@Dev_Fadnavis
😡प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क.
तुम्ही हळूहळू सामान्य जनतेचा
करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवलं दिसतंय.
"ही व्यवस्था आम्ही निर्माण केली आमच्या साठी आणि आमच्या प्रमाणेच काम करेल."
#offlineExam@mpsc_office@Mpsc_Andolan@RRPSpeaks@AbhiPawarBJP
'राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा' - कैलास पाटील
#KailasPatil#MPSC#CBT#MarathiNews#news
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office@Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
मुख्यमंत्री म्हणाले होते, 'विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्या.' मा. @bhimanwar सर संपुर्ण महाराष्ट्र मधुन online exam ला आपल्या निर्णयाला विरोध होत आहे आपण किमान मुलांची मत जाणुन घ्या !
एकतर्फी निर्णय लादू नका विध्यार्थी सोबत संवाद साधा !
@mpsc_office@Dev_Fadnavis
स्पर्धा परिक्षेची तुलना प्रवेश परिक्षेसोबत करणे जरा जोखमीचे.तुुलनात्मक गुणवत्ता निश्चितीसाठी विशीष्ट पूर्वपरीक्षेत हजर उमेदवारांचे एकाच संधीतील प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता गुुणांची सिमारेषा निश्चित करणे उचीत.गुुणवर्धनासाठी अतिरिक्त पूर्वपरीक्षां अनावश्यक व वेळखाऊ ही!
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा. आयोग,
आपल्या CBT परिपत्रकातील मुद्दा क्रमांक ५ चा दावा तर्कसंगत नाही.
कारण,
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) अनेक महत्त्वाच्या राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेते.
तेथे सर्वच गट अ, ब, क च्या परीक्षा नियमित ऑनलाईन होत नाहीत.
#Operation_ऑफलाईन#Mpsc#ऑफलाईन
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
स्पर्धा परीक्षा मधील GS हा विषयच मुळात subjective आहे
म्हणजे एकादा प्रश्न एकाला सोपा जाऊ शकतो तर एकाला अवघड अशा वेळेस मा.@mpsc_office कसकाय ठरवू शकतो की ही shift सोपी & ही shift Hard?
तसेचअनेक shift म्हणजे प्रश्नाचा दर्जा किती खालावेल याची कल्पना आहे का?
@bhimanwar#Mpsc