मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ची सुधारित तारीख आपण "लवकरात लवकर " जाहीर
करणार होता.
यावेळी आपण आवडता शब्द "यथावकाश" टाळला होता,त्यामुळे
प्रगती झाली असे वाटले होते.
परंतु 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप आपण यावर बोलायला तयार नाही.
🔶 निवडणूक वर्षात राज्यसेवा परीक्षा एप्रिल ऐवजी फेब्रुवारीत घेण्याचा इतिहास असताना आपण जाणूनबुजून
28 एप्रिल ला परीक्षा आयोजित केली होती.
👉पण निवडणुकामुळे व मराठा आरक्षण मुळे अर्थातच आपल्याला 28 एप्रिलला
परीक्षा घेणे शक्य झाले नाही.
तीन महिने परीक्षा पुढे ढकलली.
अर्थात आपण हे जाहीर करण्यासाठी सुद्धा उमेदवारांतर्फे आम्हालाच पाठपुरावा करावा लागला होता.
👉 आपण 6 जुलै नवीन तारीख दिली.
मराठा आरक्षण संदर्भातील क्षुल्लक
तांत्रिक बाबींची पूर्तता आपण केली नाही.
6 जुलै ला परीक्षा घेणे अशक्य झाले.
👉 आपण पुन्हा नवीन तारीख दिली
21 जुलै.
तिथेही आपण 'fail'
तेच कारण:- मराठा आरक्षण तरतूदी
साठीचा तांत्रिक अभाव
👉 नवीन तारीख 25 ऑगस्ट
दिली.
ज्यादिवशी IBPS exam असल्यामुळे
उमेदवार दोन महिने आपल्याला वारंवार विनंती करत होते.
exam overlapp होत आहे.
परंतु आपण दुर्लक्ष केले व शेवटी आंदोलन करावे लागले व परीक्षा postpone झाली.
🔶 आता 15 दिवसात आपल्याला परीक्षेसाठी नवीन तारीख ठरवता आली नाही याचे आश्चर्य वाटते.
विचार काय आहे आपला नेमका?????
👉असेच timepass करायचा व पुन्हा
विधानसभेची आचारसंहिता ,निवडणुका हे कारण सांगून मुद्दाम परीक्षा लांबवण्याचा तर डाव नाही ना?
👉 लोकसभा निवडणुकामुळे जे केले तेच कारण पुन्हा विधानसभा निवडणुकीचे दाखवायचे व निवांत राहायचे असे षडयंत्र तर रचले जात नाही ना?
👉 स्वत��च्या चुकांची शिक्षा उमेदवारांना देऊ नका.
संविधानिक आयोगाकडून अशा गोष्टी
अपेक्षित नाहीत.
आपला कारभार असा असावा की सत्ताधारी किंवा विरोधक कुणाला बोलण्याची गरज पडू नये किंवा हिम्मत सुद्धा कुणी करू नये.
पण त्यासाठी मा.आयोगाला चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे.
👉"आत्मपरीक्षण " केल्यास
corona lockdown काळापासून
#MPSC चा कारभार कोणत्या पातळीला गेला आहे याचे उत्तर मिळतील.
यात लाखो उमेदवारांचे फक्त आणि ���क्त प्रचंड नुकसान झाले आहे
याचे भान आपल्याला कधी येईल????
👉 पुन्हा एकदा सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
" परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करण्यात यावी"
🙏🙏
धन्यवाद
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@ssaunik
@MaheshZagade07
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@NANA_PATOLE@ssaunik
जसजशी रात्र होत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.
पण सरकारचा प्रतिसाद बघता,
“हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है”, अशी विद्यार्थ्यांची भावना असली तरी सरकारचा #इगो आणि विद्यार्थ्यांची सहनशीलता यांच्यातल्या या लढाईत विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच विजयी होईल.
असो! आता #आमचं_ठरलंय! #नोटिफिकेशन
काढत नाही तोपर्यंत उठायचं नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हि��ाचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
🔶बेरोजगारांच्या जीवावर उठलेल्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत.
रेकॉर्डब्रेक आमदार सत्तेत सामील आहेत ( सत्तेत जाण्याचा
मार्ग कोणता का असेना )
पण एकालाही गोरगरीब विद्यार्थ्यांचे देणेघेणं नाही.
🔶 कित्येक दिवसापासून 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट
MPSC exam & ibps exam dates overlapping issue आपल्या निदर्शनास आणून दिला ,तरीदेखील आपण काल या उमेदवारांचे नुकसान केलेच
.अजूनही वेळ गेलेली नाही,तात्काळ निर्णय घ्या.
🔶 लाडक्या बहिणीच्या नादात त्या बहिणीच्या संसारात काय घडत आहे ह्याचा विसर पडू देऊ नका.
भाचा -भाचीला संकटात ढकलून त्यांचा
आयुष्याचा तमाशा बघत बसण्यास कसला आनंद आहे आपल्याला ?
🔶 @dhananjay_munde
कृषीमंत्री साहेब MPSC Agri 2024 साठी 258 जागांचे मागणीपत्रक
#MPSC notification मध्ये का convert होत नाही?
आम्ही मारल्यासारखे करतो,तुम्ही रडल्यासारखे करा असे षडयंत्र कशासाठी ?कुणासाठी?????
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@NANA_PATOLE
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापा���ून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office
@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का ��ा मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशा��ाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय ��िरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड ���ानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व ��िळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी देणे बाबत लवकरच शासनाकडून नि���्देश दिले जातील. प्रवर्ग बदलाची संधी परीक्षेच्या आधीच द्यावी अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना असल्याने याबाबत सामान्य प्रशासन विभाग व
1/2 #MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. ��ुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक ��बाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे.
तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी.
@mpsc_office @mieknathshinde
@NANA_PATOLE @Dev_Fadnavis
@Drsuvarnas
#MPSC
राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
👉 @mieknathshinde साहेब
गेल्या 7 महिन्यापासून राज्यभरातील
राज्यसेवा उमेदवारांच्या वतीने आपणास जागावाढ संदर्भात वारंवार सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा ची योग्य मागणी करत आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
मुख्याधिकारी गट- अ,
मुख्याधिकारी गट- ब
या दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य जागा
( ZERO) आहेत.
असे का????
👉@RVikhePatil
7 महिने उमेदवारांनी वारंवार विनवणी केल्यानंतर आपण उपजिल्हाधिकारी पदाच्या ��क्त 7 जागा काढल्या आहेत.
त्यातही OBC व इतर काही category साठी एकही जागा नाही.
हाच का आपला सामाजिक न्याय?
last attempt च्या exam साठी
उपजिल्हाधिकारी 07 जागा,
तहसीलदार व ना.तहसीलदार दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य ( भोपळा)
जागा काढून आपण गोरगरीब उमेदवारांची क्रूर चेष्टा करत आहात.
👉 @Dev_Fadnavis
मंत्री महोदय...पोलीस उपअधीक्षक
या संवर्गाचे एकही पद राज्यसेवा जाहिरातीत का नाही?
महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला नवीन DYSP ची गरज नाही की काय???
तसे असेल तर ते ही सांगावे.
👉 @DrVijayKGavit
आपल्या विभागाच्या उपसंचालक /उपायुक्त हे पद 2018 मध्ये राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट केले,
परंतु गेल्या 7 वर्षांत एकदाही या संवर्गाचे एकही पद जाहिरातीत आले नाही.
त्यामुळे हे पद म्हणजे 35 संवर्गातील पांढरा हत्ती समान झाले आहे
Last attempt exam साठी तर
आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा.
👉 @dvkesarkar
राज्यसेवेतुन शिक्षणाधिकारी व
उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही ��ंवर्ग पदभरती करायची असते याचा आपणास विसर पड��ाय की काय?
चक्क शून्य ( ZERO ) पदांचा उमेदवारांना आहेर दिला आहे आपण.
👉 @iAditiTatkare
महिला बालविकास अधिकारी वर्ग 1
चे पद हे राज्यसेवेतून भरावायचे असते
याची माहिती आपणास एव्हाना झाली असेलच.
यासोबतच गट -ब चे असंख्य
पदे रिक्त असताना कसली काटकसर सुरु आहे?
आपल्या विभागाला राज्यसेवेतून अधिकारी नको आहेत का???
@maha_governor
@CMOMaharashtra
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वे���वेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा असल्याने राज्यसेवा परीक्षेसाठी जागावाढ तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, Dysp यासारख्या पदांचा समावेश करण्यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव नितीन गद्रे साहेब��ंची भेट घेतली. शासनाच्या सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन #MPSC कडे त्वरित पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. जागावाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासित केलं.
तसंच केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल��याने शासकीय पदभरतीच्या जाहिराती काढण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात मागणीपत्रे देऊन भरती प्रक्रियेला गती देण्याची विनंतीही यावेळी केली.