लेंढवेचा पेपर नको❌,
नवीन सेट करा!
उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला!
#mpsc#FairRajyasevaMains2026
विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी
३ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. FDA औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाली. या प्रकरणातील संशयित अधिकारी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने, ३ ऑक्टोबरच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची खात्री देता येणार नाही. MPSC आयोगातील सध्याचे वातावरण आणि घडलेल्या घटना पाहता या परिक्षेमध्ये काही काळेबेरे झालं नसेल कशावरून ? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ३ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलणे आणि प्रश्नपत्रिका नव्याने तयार करणे हाच पारदर्शकतेचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीाचा विचार करावा.
@CMOMaharashtra@bhimanwar@mpsc_office
आदरणीय पवार साहेब (@PawarSpeaks),
जेव्हा महाराष्ट्रातील तरुणांवर संकट आले, आपण आधारवड ठरला आहात. आज राज्यसेवा मुख्य २०२६ च्या घाईमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा
@Dev_Fadnavis@VikramPachpute_
आम्ही तुम्हाला तुम्ही जे सांगताय त्याचीच अंमलबजावणी करायला सांगतोय.. मुख्यमंत्र्यांचेच म्हणणे आहे की फुल प्रूफ सिस्टम शिवाय परीक्षा नको. याला राज्यसेवा मुख्य 2026 अपवाद कशी होते?सुधार झाल्याशिवाय पेपर घेणे हे चुकीचे आहे
#FairRajyasevaMains2026
मा. CM @Dev_Fadnavis साहेब,
आपण शब्द दिला होता—फुलप्रूफ सिस्टमशिवाय परीक्षा नाही
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबतही आपल्या शब्दाची अंमलबजावणी व्हावी, ही हजारो विद्यार्थ्यांची विनंती.
पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची अपेक्षा आहे. 🙏
@VikramPachpute_#FairRajyasevaMains2026
SIT च्या धडक कारवाईने MPSC चा राज्यभरातील घोटाळा उघडकीस अजूनही कारवाई सुरूच.
अशा पेपरफुटीच्या वातावरणात परीक्षा का? संशयित जुने पेपर रद्द करून नव्याने सेट करूनच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घ्यावी!
https://t.co/wyMazarmkb
@mpsc_office@CMOMaharashtra#MPSC#MPSCMain2026
मा. CM @Dev_Fadnavis जी हे दूरदर्शी नेतृत्व व कणखर प्रशासकीय सचोटीचे उत्तम उदाहरण आहेत. पारदर्शकतेचा आपला आग्रह सार्वजनिक विश्वासाचा मोठा आधार आहे. आपलेच न्यायप्रिय नेतृत्व विद्यार्थ्यांची चिंता दूर करून नवीन प्रश्नपत्रिकांचा निर्णय घेईल, हा पूर्ण विश्वास आहे!
#MPSCMains2026
राज्यसेवा २०२६ च्या मुख्य परीक्षेचे ३ ऑक्टोबर रोजी आयोगाने आयोजन केले आहे. परंतु २०२५ च्या मुख्य परीक्षेसंदर्भातील काही त्रुटी अजूनही दूर झालेल्या नसल्याने या परीक्षेसंदर्भात देखील विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत.
तसेच पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेले अभिजीत लेंडवे, विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे यांच्या काळात सदरील पेपर सेट झाल्याचे निदर्शनास येत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नपत्रिकेबाबत अधिक संशय निर्माण झालेला आहे. मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीबाबत व्ही. राधा समितीला विद्यार्थ्यांनी अनेक शिफारसी केलेल्या आहेत. परिणामी आयोगाने मुख्य परीक्षा २०२६ बाबत विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
गेल्या काही महिन्यांतील परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC ला पुढे “ढकलावीच” लागेल.
@mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या म्हणण्यानुसार औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन महिने आधीच सेट झाला होता. मग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर नेमके कधी आणि कुणाच्या काळात सेट झाले, हा विद्यार्थ्यांचा रास्त सवाल आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळात सेट झाले असण्याची दाट शक्यता आहे. मग या पेपरच्या सुरक्षिततेची हमी आयोग कशी देणार?
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर सीलबंद अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचला, तरीही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
मग आगामी राज्यसेवा परीक्षेचे पेपर खरंच सुरक्षित आहेत का? विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. घाईघाईने परीक्षा घेऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याऐवजी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.
जुने पेपर रद्द करा, न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करा आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग आता बस्स झाले!
#MPSC #StopPaperLeak