🚨 सिव्हिल इंजिनिअर्सना महाराष्ट्र सरकारचा मोठा धक्का!
MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गासाठी तब्बल 0 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
एकीकडे हजारो कोटींचे रस्ते, पूल, धरणे, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे हे प्रकल्प उभारणाऱ्या सिव्हिल अभियंत्यांसाठी एकही पद उपलब्ध करून दिले जात नाही. हा राज्यातील हजारो गुणवंत अभियंता युवकांवर झालेला अन्याय आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून MPSC 2026 भरती प्रक्रियेत सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव MPSC कडे पाठवावा आणि सिव्हिल अभियंत्यांना न्याय द्यावा.
अन्यथा राज्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांच्या न्याय्य हक्कासाठी व्यापक लोकशाही आंदोलन उभारले जाईल.
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@degree_holders@CongressRojgar
#MPSC2026 #JobsForYouth #Maharashtra #रोजगार_काँग्रेस #EmploymentCongress #YouthRights
MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@GulabraoRPatil@cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार
महसूल विभागांतर्गत उपअधीक्षक-भूमी अभिलेख (गट ब-राजपत्रित) संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचे विविध स्रोतांद्वारे स्पष्ट होत आहे. तरी दि.05.05.2026 च्या भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण शासन निर्णयानुसार रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून
सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्रक देण्यात आले आहे.
सर्व संबंधितांनी स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सुधारित मागणीपत्र
RTI, शासकीय नोंदी व उपलब्ध माहितीनुसार जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही 2023, 2024 व 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्र देण्यात आले आहे.
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
विषय : MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य पदे दर्शविल्याबाबत तातडीने सुधारित मागणीपत्र पाठवून रिक्त पदांचा समावेश करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदसंख्येमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य (0) पदे" दर्शविण्यात आली आहेत. ही बाब राज्यातील हजारो अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारी असून राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत चिंताजनक आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेली माहिती, विभागीय आस्थापना अभिलेख तसेच विविध शासकीय कागदपत्रांमधून जलसंपदा विभागासह इतर विभागांमध्ये स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र न पाठविणे अथवा शून्य पदांची मागणी करणे हे राज्यातील गुणवंत उमेदवारांवर अन्याय करणारे आहे.
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगरविकास आणि इतर पायाभूत सुविधा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू असताना तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. परिणामी कामांच्या गुणवत्तेवर, देखरेखीवर आणि अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की,
1. जलसंपदा विभागासह संबंधित सर्व विभागांमधील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सार्वजनिक करावी.
2. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तातडीने पाठवून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मधील पदसंख्या वाढवावी व रिक्त पदांचा समावेश करावा.
3. सेवाप्रवेश नियमांमधील प्रलंबित बदलांचा परिणाम न होणारी पदे तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
4. गेल्या तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य मागणीपत्र का पाठविण्यात आले याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या विषयात आपण वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
मोबाइल क्र. ९८६७६ ९३५८८
@CMOMaharashtra@INCHarshsapkal@INCMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@degree_holders @mpsc_ofice @Mpsc_Andolan@PunyachiMPSC
#MPSC #MES2026 #CivilEngineering #Maharashtra
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांना 'सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी' म्हणून गौरवण्यात आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते.
तसेच राज्यातील या उपक्रमांतर्गत पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी व संबंधित कार्यालयांचे देखील मनस्वी अभिनंदन! आपल्या सर्वांच्या कार्यशीलतेमुळे प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा हे पुणे जिल्ह्याच्या विकासाला घेऊन कायम कार्यतत्पर राहिले. त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेने आजचे हे यश संपादन केले आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे.
या यशामागे प्रशासनाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होते. पुणे जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येणारे उपक्रम हे इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत. या राज्याची उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते.
@gajananpatilIAS
📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
📍 जलसंधारण विभाग पदभरती
उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_Recruitment@SanjayDRathods
खूप गाजावाजा करून वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू केली परंतु त्याचे सर्वात जास्त दुष्परिणाम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर झाले आहेत. @mpsc_office ने याबाबत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे.
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC E-news latter मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #MES २०२४ साठीच्या जागा एका दिवसात म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात. #MES २०२४ ही फक्त जलसंधारण विभागाच्या ४५ जगासाठीच राहील का?
@BaliramDoleyINC@suvishelke
@Dhananjay_AAP
@Dev_Fadnavis