फोडाफोडीच्या राजकारणात बेरोजगारांच्या आंदोलन उपोषणे आणि समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो या खुर्ची प्रेमी माणसांना @mieknathshinde@dadajibhuse@RRPSpeaks
@MuleSawata@Shivsenaofc@mieknathshinde@dadajibhuse@ChivateMangesh १ जूनपासून आम्ही आझाद मैदानात न्यायासाठी आंदोलन केले, पण शिक्षणमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. दोन दिवसांच्या आंदोलनाला मात्र तात्काळ भेट! आमच्या संघर्षाची किंमत कमी का? न्याय सर्वांसाठी समान असावा.
@bothikarvr@mieknathshinde@CMOMaharashtra@Dhananjay4INC@dadajibhuse आपली मागणी रास्त आहे आपल्याला भेट द्यायला घाबरत असतील किंवा आपली मागणी मान्य करावी लागेल या धाकाने मंत्री महोदय आले नसतील, आपण पण ताफ्यावर अटॅक करा काळे झेंडे दाखवा, यांच्या ताफ्याला ट्रक आडवा लावू किंवा रस्त्यात दगड रचून ठेऊ असं काही तरी करावं लागेल
@Shivsenaofc आम्ही याजागी 30 दिवस बसलो मंत्री आम्हाला 2 मिनीट सुद्धा भेटले नाहीत या लोकांचा इतका पुळका का?
आम्ही 5-5 वेळा tet सारख्या परीक्षा पास होऊन आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला टाळले का?
तळतळाट घेऊ नका? @mieknathshinde@dadajibhuse@ChivateMangesh
@abpmajhatv यांना लोकांच्या समस्यांची गरज नाहीये, फक्त पक्षाचा विकास चालू आहे आंदोलनाला 1 महिना बसून सुद्धा शिंदे साहेब एकदा सुद्धा भेटले नाही आणि दिसले सुद्धा नाही पक्ष प्रवेश वाल्यांना बर कसे भेटायचे
या राज्यात मंत्री महोदयांची भेट होणं खूप अवघड आहे एक महिन्याभरात शिंदे साहेब एकदा पण नाही भेटले निवेदन देऊन आणि नंदनवन बंगल्यावर जाऊन पण, आमचा मुद्दा रास्त असताना सुद्धा इतका संघर्ष करावा लागतो, पक्ष प्रवेश वाल्यांच्या भेटी सहज होतात.https://t.co/ullKBV7f00
📍 ठाणे |
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत #रायगड जिल्ह्यातील #श्रीवर्धन तालुक्यातील उबाठा गटाचे नगराध्यक्ष ॲड.अतुल चौगुले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्वांचे शिंदे साहेबांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रीतम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतीक पालवे, नियती जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यासोबतच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष ऑस्कर किणी यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे देखील शिंदे साहेबांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Shivsenapakshapravesh