@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.
#MPSC मार्फत जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक एकूण 7006 पदांपैकी आयोगाने 6613 पदांची तात्पुरती निवड यादी जाहीर केली होती. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील 393 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. या 393 जागा अंतिम निवड यादीत समाविष्ट करून पूर्ण 7006 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीसाठी #MPSC च्या काही युवांनी मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. त्यांचा हा विषय सरकारकडं माडण्याचं आश्वासन त्यांना दिलं.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक 2023 नियुक्ती बाबत आज विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर.
एकंदरीत असंच दिसतंय की सर्व परिस्थिती सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, पण तरीही हेतुपूर्वक उमेदवारांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
प्रति,
मा. रजनीश शेठ
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई
विषय: लिपिक-टंकलेखक गट-क मुख्य परीक्षा २०२३ च्या निकाल मागणीपत्रावर अद्याप कोणताही निर्णय किंवा प्रतिक्रिया न मिळाल्याबद्दल स्मरणपत्र.
महोदय,
दिनांक ६ जून २०२५ रोजी आपणास पाठवलेल्या निवेदनाद्वारे आम्ही महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ च्या निकालातील अस्वीकार्य विलंबावर तीव्र निषेध व्यक्त करत १० दिवसांत अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती.
आज २३ जून २०२५ पर्यंत आयोगाकडून या निवेदनावर ना कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे, ना निकालाच्या तारखेविषयी कोणतीही स्पष्टता दिली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि भविष्य याकडे आयोगाने दाखवलेली ही अनास्था अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
हा निकाल आता केवळ परीक्षा व्यवस्थापनाचा विषय राहिलेला नाही, तर तो हजारो तरुणांच्या मानसिक स्थैर्याचा, वयोमर्यादेच्या अन्यायाचा आणि रोजगाराच्या मुलभूत हक्काचा गंभीर प्रश्न बनला आहे. शासन आणि आयोग यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशा वाढत आहे.
आमची अंतिम मागणी पुढीलप्रमाणे:
१.लिपिक-टंकलेखक पदांचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
२.या विलंबामागील कारणांची सार्वजनिक चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
३.विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सल्लागार यंत्रणा तत्काळ सुरू करावी.
जर ३० जून २०२५ पर्यंत निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र संविधानिक आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या संयमाची कसोटी आता संपली आहे. त्यांच्या भविष्यासोबत केलेला हा खेळ खपवून घेतला जाणार नाही.
कृपया निकाल जाहीर करा, अन्यथा लोकशाहीचा आवाज रस्त्यावर घुमेल!
आपला नम्र,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@Drsuvarnas@INCHarshsapkal@Mpsc_Andolan @degree_holders
स्पर्धापरीक्षार्थींना अपेक्षित आहे, MPSC ने पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर करतेवेळी जाहिरात ते अंतिम निकाल या सर्व तारखा जाहीर कराव्यात & त्या पाळाव्यात.
परंतु @mpsc_office ने मे 2025 मध्ये स्वतःच जाहीर केलेली जून पहिला आठवड्याची वेळ पाळली नाही.
आता जून अखेरची वेळ तरी?
लिपिक टंकलेखक 2023 जाहिरात 20 जानेवारी 2023 ला आली होती, सद्या जून 2025 असून तरीदेखील मा. लोकसेवा आयोगाला अजून जाहिरातीची पूर्तता करण्यात आली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सर्वांत मोठे अपयश..
कधी सुधारणा करणार??
@mpsc_office@Drsuvarnas@PawarSpeaks@AbhiPawarBJP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ७००६ लिपिक - टंकलेखक पदांसाठी २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम निवड यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवड यादीतील महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे संभ्रमावस्थेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही विद्यार्थी याच संदर्भात येऊन भेटले होते. या विषयासंदर्भात आज विधानपरिषद विरोधी पक्ष नेते मा. अंबादासदादा दानवे यांची भेट घेतली. यावेळी सोबत विद्यार्थीही उपस्थित होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम निवड यादी जाहीर होईल असे आयोगाने कळविले आहे. आता पुन्हा पुढची तारीख न मिळता अंतिम निवड यादी जाहीर व्हावी अशा सूचना मा. विरोधी पक्षनेते यांनी संबंधित विभागाला दिल्या!
#FightForRight
#MPSCStudents #लिपिक_टंकलेखक_भर्ती #विद्यार्थ्यांचा_हक्क #Transparency #JusticeForAspirants #ClerkRecruitmentDelay
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र केवळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा अवमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: सरकार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वरित सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office@INCHarshsapkal
मा. रजनीश सेठ
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर, नवी मुंबई.
विषय: लिपिक-टंकलेखक भरती 2023 च्या अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत विनंती
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली लिपिक-टंकलेखक भरती 2023 ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. आयोगानेच जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत ती यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी गेली अनेक महिने प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर मानसिक, आर्थिक व सामाजिक तणाव वाढत आहे. भरतीची प्रक्रिया विलंबाने होत असल्यामुळे अनेक उमेदवारांचे पुढील शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरीसंदर्भातील निर्णय रखडले आहेत.
आपल्याकडे नम्र मागणी आहे की:
1. लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी.
2. निकाल प्रक्रियेमध्ये आणखी विलंब होणार असल्यास, त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण व निश्चित तारीख जाहीर करण्यात यावी.
3. आयोगाने भविष्यात अशा भरती प्रक्रियांबाबत वेळापत्रकांचे काटेकोर पालन करावे, ही नम्र अपेक्षा आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (रोजगार विभाग) करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
प्रत: मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समिती
@mpsc_office@INCHarshsapkal
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 अंतिम यादी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल असे आपल्याकडून जाहीर करण्यात आले होते.
#आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. ओपन च्या #393 जागा ऍड करून आज निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा.MPSCआयोग आपण काही दिवसापूर्वी एक परिपत्रक काढले होते.त्यामध्ये तुम्ही सांगितलं होत कि आम्ही जाहिरात क्रमांक 111/2023लिपिक टंकलेखक चा निकाल जून च्या पहिल्या आठवढ्यात लावून टाकू.आज त्याचा शेवटचा दिवस आहे.आयोगाने दिलेला शब्द पाळावा आणि निकाल लावून टाकावा एवढीच विनंती @Drsuvarnas
मा. आयोग लिपिक टंकलेखक 2023 निकालासाठी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून परिपत्रकानुसार तुम्ही तो मागुन घेतला. पण मग आता आठवडा संपन्यात आला आहे तरीही आपल्याकडून आमची उपेक्षाच का???आज निकाल लावून आपली विश्वासार्हता टिकून ठेवाल हीच अपेक्षा...
@mpsc_office@Suvarnakharat4@CMOMaharashtra
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जाहीर करावी.
#MPSC_Clerk लिपिक-टंकलेखक भरती 2023 ची अंतिम निवड यादी जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे आयोगाने जाहीर केले होते. परंतु उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
आयोगाला विनंती आहे, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवावी. निकालासाठी पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती.
@mpsc_office@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AUThackeray@PatilKailasB@RRPSpeaks@Drsuvarnas .