बहुतांश अहिंसावादी लोकांचं #गांधी प्रेम म्हणजे #सावरकर विरोध आणि बहुतांश #हिंदुत्ववादी लोकांचं सावरकर प्रेम म्हणजे गांधी विरोध. या लोकांच्या वादात या महान व्यक्तींची नाहक बदनामी होते. ही लोकं इतिहासाच्या माहितीशिवाय दुसऱ्याला डिवचण्यासाठी यांच्यावर बदनामीकारक आरोप करत असतात. #म+
माणूस उत्क्रांत झालाय की नाही माहित नाही, पण उथळ मात्र नक्कीच झालाय.
आवड, अभिरुची, उत्सुकता, संवेदनशीलता.. सगळ्याच बाबतीत त्याची पातळी मात्र अगदी रसातळाला गेलीय.
आपले दुसरे मराठी बालगीत ‘ कोरा कोरा कागद ‘ नक्की ऐका आणि तुमच्या चिमुकल्यांना सुद्धा ऐकवा..
मराठीमध्ये स्वलिखित बडबडगीतांचा प्रयोग करतोय..
प्रेम राहुद्या.. 😇🙏🏻
https://t.co/dg8JqrA7LH
स्वयंपाक असा झाला म्हणून तीला कधी बोलू नये.. आपल्या खाण्यासाठी ती राबत असते.. आत्ता गॅस आले, उदाहरणार्थ चुलीचा धूर खात घरादाराची खळगी भरणाऱ्या स्त्रिया तर 'राबबहाद्दूरच'.. खाणाऱ्याला काय, उचलली जीभ लावली टाळ्याला.. अन्न कसंही असलं तरी पचतं, बोललेले शब्द सहजासहजी पचत नसतात..❤️
#म
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.
आण��� सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का ?
सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे अ��ं त्यांचं ठाम मत होतं.
हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना ���्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.
उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत ? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे.
आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन ���ेलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का ? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे ? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामु��े वापर कमी करणार आहेत.
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण - इस्रायल युद्धावर टाकू नका ! आपण पंतप्रधान झाल्या पासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं ,हे कशामूळे झालं ते सांगा ! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले ? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे , ऐकून घ्यायचे . आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार ? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका.
तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेंव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचार��यचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं !
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
��००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं त��ंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हण��ात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्��� लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्व���त्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
Every Maharashtrian should watch his today's speech !
If you want to know how great are marathi people and Maharashtra and how we have forgot about our own people,you will understand How Marathi people has major contribution in building आमची मुंबई💙
#Pune@RajThackeray
“मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे” - राज ठाकरे
पैंजेवर सांगतो, आव आणून बोलायचं ठरवलं तरी इतकं थेट आणि स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातला कोणताही नेता जाहीर भाषणात करणार नाही. यासाठी महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम लागतं. #महाराष्ट्रदिन
५०० चौ. फुटापर्यंत अतिक्रमण विनामूल्य: निर्णय का चुकीचा ठरू शकतो? (विस्तारित भूमिका)
महाराष्ट्रातील @Dev_Fadnavis@cbawankule यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ५०० चौ. फुटापर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. हा निर्णय वर करणी सामान्य नागरिकांना दिलासा देणारा वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो अनेक गंभीर अन्याय आणि गैरप्रकारां��ा कायदेशीर कवच देण्याचा धोका निर्माण करतो.
१. कायद्याचा धाक कमी होण���याची शक्यता
अतिक्रमणाला विनामूल्य मान्यता दिल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकते. भविष्यात जाणीवपूर्वक अतिक्रमण वाढण्याची शक्यता आहे.
२. प्रामाणिक नागरिकांवर अन्याय
ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कर्ज काढून किंवा नियमांचे पालन करून मालमत्ता घेतली आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक ठरतो.
३. शहरी नियोजनाचा बोजवारा
अशा निर्णयांमुळे शहरांचे नियोजन कोलमडत��, रस्ते, नाले, सार्वजनिक जागा यावर अतिक्रमण कायम राहते.
४. पर्यावरणीय धोका
नदीकाठ, नाले, खुली मैदाने यावर केलेले अतिक्रमण वैध ठरल्यास पूर आणि प्रदूषणासारख्या समस्या वाढू शकतात.
५. मूळ मालकांच्या हक्कांवर गंभीर गदा (महत्त्वाचा मुद्दा)
हा सर्वात गंभीर आणि दुर्लक्षित मुद्दा आहे. अनेक ठिकाणी खालील प्रकार घडल्याचे आरोप वारंवार समोर येतात:
खाजगी मूळ मालकांची कागदपत्रे असतानाही मालमत्ता ���ळकावणे
काही प्रकरणांमध्ये मूळ मालकांकडे कायदेशीर कागदपत्रे असूनही त्यांच्या जमिनी/घरांवर अतिक्रमण करून ताबा घेतला जातो.
पोलीस, नगरपरिषद अधिकारी आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांचे संगनमत
आरोप असे आहेत की काही ठिकाणी पोलीस व नगरपरिषद अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर प्रॉपर्टी ट्रान्सफर घडवून आणले जातात. त्यामुळे खऱ्या मालकाला न्याय मिळणे कठीण होते.
गुंड व अवैध धंदे करणाऱ्यांचा हस��तक्षेप
काही ठिकाणी अवैध धंदे करणारे किंवा प्रभावशाली घटक प्रॉपर्टी बळकावून त्यावर कब्जा करतात आणि नंतर अशा निर्णयांमुळे त्यांना अप्रत्यक्षपणे कायदेशीर संरक्षण मिळते.
मूळ मालकी हक्कावर अन्याय
हा निर्णय अंमलात आला तर खऱ्या मालकाच्या हक्कावर गदा येऊन “ज्याच्याकडे ताकद त्याची मालकी” अशी चुकीची व्यवस्था निर्माण होऊ शकते.
👉 त्यामुळे ज्या प्रॉपर्टीवर मूळ मालकाचे वैध कागदपत्र आहेत, ���िंवा जिथे बेकायदेशीर हस्तांतरण/कब्जा झाला आहे, त्या मालमत्ता अशा धोरणातून पूर्णपणे वगळणे अत्यावश्यक आहे.
६. राजकीय हेतूंची शक्यता
अशा निर्णयांमागे मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय हेतू असू शकतो, ज्यामुळे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
७. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मालमत्तांवर अन्याय – तात्काळ वगळण्याची गरज
६० ते ७० वर्षांपासून वारसा हक्काने चालत आलेली प्रॉपर्टी ही केवळ जमीन किंवा घर नसून, ती कुटुंबाच्या कष्टांची, इतिहासाची आणि हक्काची ओळख असते. आपल्या पणजोबा-आजोबांकडून मिळालेली मालमत्ता पुढे नेणे हा गुन्हा ठरतो ह्या निर्णय मुळे. मात्र सध्या काही ठिकाणी असे प्रकार समोर येत आहेत की:
मूळ मालकांकडे सर्व वैध कागदपत्रे असतानाही प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या हस्तांतरित केली जाते
काही अधिकारी किंवा स्थानिक यंत्रणांचे संरक्षण मिळाल्यामुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळत नाही
अतिक्रमण किंवा बनावट व्यवहारांच्या आधारे खऱ्या मालकांचा हक्क हिरावला जातो
हे सर्व प्रकार केवळ अन्यायकारकच न��हीत, तर कायद्याच्या मूलभूत तत्वांनाही धक्का देणारे आहेत.
👉 त्यामुळे सरकारने खालील बाबी तात्काळ स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे:
ज्या प्रॉपर्टी पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने चालत आलेल्या आहेत, त्या कोणत्याही अतिक्रमण ��ियमितीकरण धोरणातून पूर्णपणे वगळाव्यात
ज्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरण झाले आहे, अशा प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून मूळ मालकांना न्याय द्यावा
संबंधित अधिकारी किंवा संगनमताने काम करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी
खऱ्या मालकांचे हक्क सुरक्षित राहतील यासाठी स्पष्ट कायदेशीर तरतुदी कराव्यात
निष्कर्ष:
आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क जपणे हा गुन्हा आहे का?गरजूंना मदत करण�� हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु त्यासाठी कायद्याचे उल्लंघन आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणे योग्य नाही. विशेषतः ज्या ठिकाणी मूळ मालकांचा हक्क हिरावला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करून त्या मालमत्ता या धोरणातून वगळल्या पाहिजेत. अन्यथा हा निर्णय सामान्य नागरिकांऐवजी बेकायदेशीर प्रवृत्तींनाच बळ देणारा ठरू शकतो.
@MahaChiefSec @Dev_Fadnavis@cbawankule @RaviDadaChavan @mieknathshinde
@madhurimisal @AshwiniBhide @rahulnarwekar @lonikar_rahul@rahulg_ias @keshavupadhye @ArunPathak1212 @BhatkhalkarA @save_atul @Gajananvghuge @PrakashGade13
#मराठीदिन निमित्�� एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.
मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छ�� आहे. तुम्ही याल का?”
तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं म��� इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली.
त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून ���णि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती ह��” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे.
आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.
मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्ह��� बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.
वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
#Repost
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिव��ाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित���ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही क���त्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोड���ंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाष��� आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत���मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील ��नेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !
घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे म��झ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं 'सुख पाहता' नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू ��रावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.
पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन ���ोतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.
एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.
आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी म���ळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं.
मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा...
राज ठाकरे ।
कोडिंग शिकायचंय पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाहीये?
कधीही कोडिंग केलं नसेल किंवा कोडिंग म्हणजे काय हेही माहित नसेल, तरी काळजी नको. Code Conquest तुमच्यासाठी घेऊन आला आहे एकदम सोप�� मार्ग.
का खास आहे Code Conquest?
✔️अगदी बेसिक गोष्टींपासून शिकायला मिळेल.
✔️तांत्रिक पार्श्वभूमी नसली तरी सहज समजेल.
✔️ कोडिंगच्या प्रवासातील तुमचा सर्वात विश्वासू सोबती.
तुमचा कोडिंगचा प्रवास आजच सुरू करा आणि स्वतःला अपडेट करा!
Link: ⏬
माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला.
मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले.
ह्याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले.
माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल…
म्हणूनच ��जचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे.
जय महाराष्ट्र 🚩
(बाकी ह्या वर्षी त्या marker ची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया)
'राज ठाकरे' हा व्यक्ती खरंच मुंबईसाठी, मराठी लोकांसाठी लढतोय...🙏🏻
विचार करा शिंदे, bjp बरोबर ते सहज जाऊ ���कले असते,वाटाघाटीत 50 जागा सहज मिळवून सेफ राहू शकले असते.
पण 'मराठी' लोकांसाठी त्या माणसाने स्वतःच्या पक्षाचा,सत्तेचा विचार केला नाही.
अश्या लोकांना मुंबईकर गमावू नका 🙏🏻
मनसे पक्ष स्थापन झाला तेव्हा राज ठाकरे यांच्याकडे सत्ता नव्हती, खुर्ची नव्हती, यंत्रणा नव्हती पण मराठी मा���सासाठी उभं राहण्याचं धाडस होतं.
ज्या काळात मराठी भाषा हळूहळू आपल्याच राज्यात दुय्यम ठरवली जात होती, ज्या काळात मराठी बोलणारा माणूस आपल्या ओळखीबद्दल संकोच करू लागला होता त्या काळात राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं “महाराष्ट्रात मराठीच बोलली गेली पाहिजे.”
रेल्वे स्थानकांवरील मराठी पाट्या, सरकारी कार्यालयांतील मराठीचा वापर, बँका, कंपन्या, दुकाने, मॉल्स याठिकाणी मराठी फलकांचा आग्रह ��े सगळं राजकीय सोयीसाठी नव्हतं, हे होतं मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी.
मराठी भाषेला अभिजात भाषे��ा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने आवाज उठवणं, चळवळी, निवेदनं, भूमिका या सगळ्यामागे राजसाहेबांचीच ठाम भूमिका होती. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्यामागे राज ठाकरे यांचं मोठं योगदान आहे हे नाकारता येणार नाही.
मराठी माणसाला स्वतःच्या राज्यात मांसाहार करतो म्हणून फ्लॅट नाकारले गेले, मराठी खाद्यसंस्कृतीला कमी लेखलं गेलं तेव्हा कोणीही पुढे आलं नाही मनसेच रस्त्यावर उतरली. मराठ�� माणसाचा हक्क, त्याचा सन्मान आणि त्याचं जगणं यासाठी मनसे खंबीरपणे उभी राहिली.
मराठी बोलल्यामुळे अपमान सहन करावा लागला, परप्रांतीयांकडून दडपशाही झाली तेव्हा राज ठाकरे शांत बसले नाहीत. तेव्हा त्यांनी मराठी माणसाला डोळ्यात डोळे घालून उभं राहण्याचं बळ दिलं.
राज ठाकरे यांनी मराठी माणसाला फक्त आंदोलन शिकवलं नाही, तर आत्मविश्वास दिला. 'आपण कमी नाही,आपण नेतृत्व करू शकतो' हा विश्वास त्यांनी ��राठी माणसाच्या मनात रोवला.
आज जेव्हा पुन्हा मराठी भाषा, मराठी माणूस आणि म���ाराष्ट्र धोक्यात असल्याची भावना निर्माण होते तेव्हा आठवण येते ती फक्त राजसाहेब ठाकरे यांची. ते फक्त नेते नाहीत, ते मराठी माणसाचा आवाज आहेत. सत्ता आली नाही तरी चालेल, पण मराठीचा अपमान सहन करायचा नाही हा विचार राज ठाकरे यांनी कधीही बदलला नाही.
म्हणूनच मराठी माणसासाठी राज ठाकरे म्हणजे राजकारण नाही तर,
ती एक भावना आहे…
ती एक लढाई आहे…
ती एक ओळख आहे. ❤️