काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.
साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं!
कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन!
चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला!
लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता!
महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत!
पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत?
सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे?
शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@ChakankarSpeaks@supriya_sule@iambadasdanve@anjali_damania@BJP4Maharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@mnsadhikrut@MahavikasAghad3@Awhadspeaks@VijayWadettiwar@mohol_murlidhar@DhangekarRavii
@CPMumbaiPolice EOW मुंबई मध्ये टेम्पल रोझ घोटाल्यात मोठे लाभार्थी ज्यांनी लोकांना फसूवन कैक कोटी रुपये कमिशनचा फायदा घेतला, त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कार्यवाही होत नाही.
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही.
या घटनेतील दोषी -
१) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.
२)अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब,Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे.
३)येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले.पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे.
ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच म्रुत्यु झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला.
सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी विशाल आग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
#justicefor_anishashwini
लोकसभेला पंतप्रधानांच्या नावे तर तुम्हाला मते मिळतील. मात्र विधानसभेला आमच्या समस्या जो सोडवील, जो आम्हाला न्याय आणि आमचा घामाचा पैसा परत मिळवून देईल आमचं मत त्याच्याच पारड्यात. @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
@rishikeshchinc3@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra Respected CM and Dy.CMs
We are repeatedly requesting you to spare your valuable Time and solve Temple Rose scam where our hard earned money was invested by Retired senior citizens, Army personnel, youths and Women!
We hope you will take serious interest before Assembly elctns!
@CPPuneCity Plesase arrange meeting of EOW investor with case ralated IO. So many cases are pending for propar investigation. Also lack of Law MPID 1999 knowledge which is importent for EOW investigation cases.
@CPPuneCity Temple Rose froud case investigation officer are transferred , before they understand case details. It is happened from last more than 3 year.