काही विशिष्ट टेलिग्राम चॅनेल्स आणि फेक अकाऊंट्सवरून 'परीक्षा रद्द करा' अशी मागणी करण्यासाठी Paid Campaigns चालवले जात आहेत. MPSC चे वातावरण खराब करणे आणि ४-४ वर्षे अभ्यास करून निवड झालेल्या प्रामाणिक गुणवंत विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे!
आमची नम्र विनंती: SIT चौकशी मुदतबद्ध पूर्ण व्हावी.SR पदाची DV प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी SR ची DV आधी झाली, तर ७६ कॉमन मुले मोकळी होऊन STI च्या ७६ जागा वेटिंग लिस्टसाठी उपलब्ध होतील आणि मागील ४ महिन्यांपासून सरावात असलेल्याPSI ग्राउंडचा मार्ग मोकळा होईल
आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते खूप खूप धन्यवाद
MPSC गट-ब परीक्षेतील ऐनवेळी रद्द झालेल्या सब-रजिस्ट्रार(SR)पदाच्या DV आणि विद्यार्थ्यांच्या व्यथांबद्दल आपण अत्यंत खंबीरपणे प्रशासकीय व्यासपीठावर आवाज उठवला याबद्दल समस्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनापासून आभार!
@VikramPachpute_ परीक्षेची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे परंतु प्रामाणिक आणि गुणवंत विद्यार्थी ह्यांवर अन्याय होणार नाही आणि त्यांची प्रक्रिया सुरळीत चालू रहावी, ह्यावर लक्ष दिले गेले पाहिजे @CMOMaharashtra@mpsc_office@cbawankule
MPSC संयुक्त गट-ब २०२५ उमेदवारांच्या मागण्यांवर संवाद !
📍 मंत्रालय, मुंबई
MPSC संयुक्त गट-ब २०२५ परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांनी माझी भेट घेऊन त्यांच्या कागदपत्र पडताळणी आणि पुढील नियुक्ती प्रक्रियेबाबतची भूमिका व मागणी निवेदनाद्वारे सविस्तरपणे मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, याबाबत कोणतीही तडजोड नसावी; मात्र गुणवत्ता व नियमानुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि नियुक्ती प्रक्रिया अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
या विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे मेहनत घेऊन, MPSCच्या निर्धारित प्रक्रियेतील विविध टप्पे पूर्ण करून गुणवत्ता व पात्रतेच्या आधारे यश मिळवले आहे. त्यामुळे तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे सुरू असतानाच, त्याचा परिणाम प्रामाणिकपणे निवड झालेल्या उमेदवारांच्या भवितव्यावर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक नियोजनावर या प्रक्रियेच्या विलंबाचा परिणाम होत असल्याने त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन याबाबत शासनस्तरावर योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब सकारात्मक असून, विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी ते अतिशय योग्य पद्धतीने कार्यवाही करतील, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तपास प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप न करता दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि त्याचवेळी गुणवत्ता व नियमानुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व पुढील नियुक्ती प्रक्रिया नियमांच्या चौकटीत शक्य तितक्या लवकर सुरू व्हावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
#MPSC #स्पर्धा_परीक्षा #संयुक्त_गट_ब #लोकसेवा_आयोग #महाराष्ट्र
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी पार पडली असून याला जवळपास तीन महिने झाले तरी अद्याप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आजपर्यंत कधीही इतका विलंब झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या गुणवत्ता यादीकडं लक्ष लागलं असून गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणं सोपं जावं म्हणून MPSC ने तातडीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
🔶मा. @mieknathshinde साहेब
पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे
आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो...
आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर
सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही.
त्यामुळे मा. @Dev_Fadnavis साहेब
"आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार"
आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठरवा.
एव्हाना हे लक्षात आले असेलच...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो.
🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब,
बेरोजगार #MPSC उमेदवार
"हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा '
याची जाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष
व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला.
उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी)
👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची
राज्यसेवा परीक्षा जाहिरात "सर्वसमावेशक"
असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे.
ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही.
आम्ही रस्त्यावर उतरायचे नाही तर काय करायचे मग??????
🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) ,
उपजिल्हाधिकारी
मुख्याधिकारी गट-अ व ब,
पोलीस उपाधीक्षक,
तहसीलदार ,ना.तहसीलदार
शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी
सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
सह जाहिरात सुधारीत करणे.
👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे
काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :- 42 ,44
पोलीस उपाधीक्षक :- 40, 24
तहसीलदार :- 38,35
ना.तहसीलदार :- 227
सहायक गट विकास अधिकारी:-100
असे आकडे एक दशकापूर्वी होते.
आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत.
काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील आकडे एक दशकानंतर
किमान दुप्पटीने वाढायला हवे.
ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.
पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र.
👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत
मा. @mpsc_office ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती.
7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा
पत्ता नाही.
जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत.
अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा
करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ???
🔶किती अन्याय होणार आहे अजून?
किती अंत बघणार?
परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यातच
सरकारचे व मा.@Drsuvarnas आपले अपयश आहे
🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर
उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@AdvYashomatiINC@VijayWadettiwar@INCMaharashtra@atullondhe@ravishndtv@varunchoudhary2@kcvenugopalmp@satejp@patilvishalvp@vishwajeetkadam@ShindePraniti@AmitV_Deshmukh@MahaDGIPR@AlankarSawai
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
MPSC च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा अधिक वेळ आयोगाच्या मनमानीपणाशी लढण्यातच खर्च होतो अनेकदा
25 तारखेला परीक्षा आहे, आता अवघे तीन दिवस उरले असतानाही निर्णय घेतला जात नाही
आधीच आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांची कमतरता त्यात परीक्षा संस्थांची अशी असंवेदनशीलता... विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करणारे लोक आयोगात नसतातच का?
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@NANA_PATOLE@ssaunik
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.