भावपूर्ण श्रद्धांजली!
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. दत्ताजींनी आपल्या दीर्घ राज��ीय आणि सामाजिक प्रवासात नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक उपक्रमांना नवी दिशा आणि बळ मिळाले.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि मेघे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती
#JSW फेज-३ जनसु���ावणी आणि तरुणांची जबाबदारी -
- ॲड. काशिनाथ ठाकूर.
धरमतर जेट्टी (JSW फेज-३) प्रकल्पाची 22 ऑगस्टची जनसुनावणी जवळ आली आहे आणि त्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु दुर्दैवाने, या चर्चेत तरुणांचा सहभाग अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. तरुणांना “नोकऱ्या मिळतील” या गोड बोलांनी कंपनीकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की... मागील वीस वर्षांत कंपनीने स्थानिक तरुणांना किती नोकऱ्या दिल्या? आजही आपल्या तालुक्यातील हजारो तरुण ट्रेन आणि गाड्यांमध्ये उभे राहून तालुक्या बाहेर नोकरीसाठी जातात. मग एवढ्या वर्षांत जर कंपनीत स्थानिकांना नोकऱ्या- रोजगार मिळाला नाही, तर आता अचानक फेज-३ मध्ये हजारो नोकऱ्या मिळतील असा विश्वास ठेवणे ही केवळ भ्रमनिरास करणारी गोष्ट ठरणार आहे.
स्थानिकांचा कटू अनुभव असा आहे की कंपनीने आतापर्यंत रोजगाराचे आश्वासन देऊन फार थोड्यांना संधी दिली आहे. उलट कंपनीतील मोठ्या प्रमाणातील कर्मचारी बाहेरगावाहून आणले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर तरुणांनी फक्त “नोकरी मिळेल” या एका कारणासाठी फेज-३ ला पाठिंबा देणे म्हणजे स्वतःच्या भविष्यावरच पाय ठेवण्या सारखे आहे. कारण जेवढे प्रदूषण आज आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रदूषण या फेस-3 च्या विस्तारीकरणामुळे निर्माण होणार आहे. यामुळे परिस्थिती अशी बनेल की, कदाचित काही नोकऱ्या उपलब्ध होतीलही... पण त्या नोकऱ्या करणं प्रचंड वाढलेल्या प्रदूषणामुळे अशक्य होईल. आरोग्याचा बळी देऊन रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही, तर तो अधिक गंभीर बनेल.
आजची पिढी ही केवळ नोकऱ्यांच्या आशेवर भुलून जाईल, तर उद्याचं संपूर्ण आयुष्य धोक्यात येईल. रोजगार मिळणं हा तरुणांचा हक्क आहे, परंतु आरोग्यदायी, सुरक्षित वातावरणात रोजगार मिळणं हा त्याहूनही मोठा ��क्क आहे. प्रदूषणाने ग्रासलेल्या वातावरणात नोकरी करणे म्हणजे सुरक्षीत आयुष्य जगणे नव्हे, तर ते आयुष्य संपवणे ठरेल. त्यामुळे आजचा युवक भावनेच्या किंवा प्रलोभनाच्या आहारी न जाता, जागरूकपणे, अभ्यासपूर्वक आणि ठामपणे फेज-३ ला विरोध करण्याची भूमिका घेईल, हिच खरी काळाची हाक आहे.
👉 तरुणांनो, आज आपण उठून उभे राहिलात तर उद्याचा इतिहास बदलू शकतो. रोजगार मागणे चुकीचे नाही, पण रोजगाराच��या नावाखाली प्रदूषण स्वीकारणे म्हणजे आत्मघात आहे. म्हणूनच फेज-३ विरोध ही तुमची जबाबदारी आहे आणि भविष्य वाचवण्याची खरी लढाई आणि संधी आहे.
ॲड. कशिनाथ ठाकूर. कोलेटी - पेण.
@TheJSWGroup @jswsteel @rashtrapatibhvn @PTI_News @ACB_Maharashtra @AmitShah @CollectorRaigad @DGPMaharashtra @RaigadPolice @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @mpcb_official @CPCB_OFFICIAL @PMOIndia
#JSW@TheJSWGroup@jswsteel
विषय:- जे.एस.डब्ल्यू प्रस्तावित फेज-3 विस्तारीकरणासाठी हरकत व आक्षेप
जे. एस. डब्ल्यू कंपनीने दिनांक 22/08/25 रोजी जे. एस.डब्ल्यू कंपनी मध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या फेज ची जन सुनावणी आयोजित केली आहे. मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर या जन सुनावणीस प्रखर विरोध करीत आहे. कारण कोकणचा प्रवेशद्वार असलेल्या पेण तालुक्याच्या ठिकाणी जे. एस.डब्ल्यू कंपनी आहे. कोकण म्हणजे निसर्गाने दिलेले एक वरदान अथांग समुद्र किनारा पण जेव्हा पासून जे. एस.डब्ल्यू पूर्वीची निपॉन ही कंपनी कोकणचे प्रवेशद्वार पेण तालुक्यातील डोलवी या गावात धरमतर खाडी किनारी आल्यापासून निसर्गाची विशेष करून समुद्रातील जैविक साधन संपत्त���ची पूर्णविनाश झालेलाा आहे. तिसऱ्या फेज सुनावणी फेज साठी विरोध असण्याचे प्रमुख कारणे खालील प्रमाणे.
1) जे.एस.डब्ल्यू कंपनीमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या जहाजांमुळे खाडी किनारी मच्छीमारी करून उपजीविका करणारे आगरी, कोळी, बांधव यांचा मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन देशोधडीला लागले. कारण जहाजांच्या इंजिनमुळे होणाऱ्या आवाजामुळे समुद्रातून धरम तर खाडीकिनारी येणारे मासे पूर्वेसारखे य���त नाहीत.
2) मोठ मोठे जहाज जे. एस. डब्ल्यू कंपनीत येताना त्यातून होणाऱ्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्याची पूर्णपणे धूप झाले असून खाडी किनाऱ्याची बंदिस्त हे पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारेपाटातील अनेक लोक हे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. हे सध्या सुरू असलेल्या फक्त दोन फेज मूळ जैविक व मानवी जीवनास समुद्र मार्गे होणारे धोके.
3) जे. एस .डब्ल्यू चे आत्ता सुरू असलेले फेज वन व फेस 2 यांच्या चिमणीतून जो प्रदूषणकारी धूर निघत आहे. त्यामुळे परिसरात असलेली नैसर्गिक डोंगरावरील झाड, पान, यांच्यावर ही धूळ बसून ती पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
4) चिमणीतून निघणारे प्रदूषणकारी धूर याच्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना श्वसनाचे आजार, तसेच चर्मरोग, वायु प्रदूषणामुळे कॅन्सर असे भयंकर आजारांना लोकं सामोरे जात आहेत.
हे असे सद्यस्थितीत चालू असलेल्या फक्त फेज वन आणि फेस टू मुळे एवढा मोठा भयंकर वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्य��ने आजूबाजूच्या परिसरात श्वसनाचे रोग, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, तसेच शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. फळझाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मासेमारी पूर्णपणे बंद झालेली आहे. फेज वन व फेज टू मुळे या भयंकर घडणाऱ्या वायू प्रदूषण बाबत कंपनीने आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.
त्यातच जे.एस.डब्ल्यू कंपनीने आता फेज थ्री करिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पूर्वीचा फेज वन व फेस टू चा अनुभव पाहता फेस थ्री च्या विस्तारासाठी प्रदूषण महामंडळाने जर परवानगी दिली. तर आजूबाजूस राहणाऱ्या पंचक्रोशीतील रहिवाशांचे जीवनमान पूर्णपणे उध्वस्त होईल. निसर्ग साधन संपत्ती उध्वस्त होईल, समुद्रातील जैविक साधन संपत्ती नष्ट होईल, म्हणून मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर (सामाजिक कार्यकर्ता) कंपनीच्या फेस थ्री च्या विस्तारास हरकत घेत आहे. त्यातच दिनांक 22/ 8 /2025 रोजी आयोजित केलेल्या जन सुनावणीस विरोध करीत आहे. तरीही कोणी दबावाला बळी पडून जन सुनावणी घेतली आणि कंपनीच्या फेज 3 विस्तारणी करण्यासाठी परवानगी दिली. तर मी जे. एस.डब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करीन.!! माझ्या आत्���दाहणानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जे.एस.डब्ल्यू कंपनी डोळवी रायगड आणि उपप्रादेशिक अधिकारी रायगड- 2, प्रादेशिक कार्यालय/ उपप्रादेशिक कार्यालय रायगड-2, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ- रायगड भवन यांची राहील.
@CMOMaharashtra @ACB_Maharashtra @CollectorRaigad @RaigadPolice @maha_governor @PMOIndia @rashtrapatibhvn @PTI_Ne @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @INCIndia @PawarSpeaks @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @IASassociation @IPS_Association @ABPNews @TV9Marathi @loksabhaspeaker @LoksattaLive @SaamanaOnline @lokmat @AUThackeray @MahaChiefSec @advanilparab @VijayWadettiwar @iambadasdanve
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन नवी मुंबई
@Navimumpolice आपण 23/07/2025 रोजी मला एक अर्ज चौकशी करिता बोलवण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये 01/07/ 2025 रोजी मी जी माहिती निदर्शनास आणली आहे त्यात 11 मुद्दे आहेत. तुम्ही मला चौकशीला बोलावण्याऐवजी त्या 11 मुद्द्यांवर काय कारवाई केली त्याचं उत्तर पाठवलं असतं तरी चाललं असतं. त्या 11 मुद्द्यांपैकी प्रामुख्याने विठ��ठल जाधव मुद्दा ते दुबईला गेले होते का.?? त्याची चौकशी झाली का?? खरंच सर्वात सीनियर प्रशिक्षक तडवी यांना 173 मुलांसमोर फ्रंट रोल मारायला ला��ले का.?? त्यामुळे ते मानसिक स्थिती ठीक नसले कारणाने सिक मध्ये गेले त्याची चौकशी करा.?? ते प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत याची चौकशी केली का?? कारण एवढ्या वर्ष सर्विस करून नवप्रविष्ट मुलांसमोर फ्रंट रोल मारणे अतिशय वेदना दायी आहे !! मी निदर्शनास आणले नंतरच महिला पोलीस शिपाई शिंदे यांना पुणे येथे बदली वर मुक्त केले. त्याआधी त्या काय ड्युटी करत होत्या.?? त्याची चौकशी केली का? तुमची भारत देशाबद्दल थोडी तरी आत्मीयता असेल तर दिवसा किंवा रात्री मुख्यालयाचे जे दोन गेट बंद आहेत तिथे जाऊन व्हिजिट करा तिथे कर्मचारी असतात का??
10 /07/2025 रोजी जी मी माहिती आपल्या निदर्शनास आणली त्यामध्ये प्रामुख्याने पीईपी कंपनी जनरल ड्युटी अमलदार राकेश पाटील यांना बदली होऊन सुद्धा का सोडले नाही?? जर इतर अमलदारांना सोडले जाते तर राकेश पाटील साठी वेगळा न्याय का?? प्रोटेक्शन जनरल ड्युटी अंमलदार बनकर यांना एक वर्��ाची मुदतवाढ कोणत्या कामगिरीमुळे दिली?? याची चौकशी केली का??
��िनांक 21/07/2025 रोजी जी माहिती निदर्शनास आणली ती तर स्पष्ट आहे. राकेश पाटील यांना जनरल ड्युटी अंमलदार पदावरून काढून जनरल ड्युटी अंमलदार मदतनीस केले नक्की काय साध्य केले?? राकेश पाटील आजही सुट्टीवर असताना साध्या कपड्यात येऊन शेळके यांना मदत करतात की अजून काही साध्य करतात?? तुम्ही घेतलेल्या नव-प्रविष्ट मुलांच्या दरबारा मध्ये तुम्हीच स्वतः सांगताय काही तक्रार असेल तरी करायची नाही याचा अर्थ काय?? याचाच अर्थ सर्व गोष्टी उमजत असून पण समजत नाहीत असं वागायचं!! सर्व प्रकार पाहता तुम्हाला फक्त राखीव पोलीस निरीक्षक रोडपाली नवी मुंबई यांना वाचवायचं आहे. कारण तुम्ही 01/07/2025, 10/07/2025, 21/07/2025 या तीन तारकांची दखल घेतली पण 16/07/2025 रोजी मेल द्वारे केलेल्या तक्रार किंवा निदर्शनास असलेल्या माहितीची जाणीवपूर्वक दखल घेतली नाही असं दिसत आहे. कारण चौकशीसाठी पाठवलेल्या पत्रामध्ये सोळा तारखेचा उल्लेख नाही. का���ण स्पष्ट आहे राखीव पोलीस निरीक्षक उर्फ गुरु (पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे) यांचे हार घातलेले फोटो मी पुराव्यासहित पाठवले आहेत.
तरी माझी आपणास हात जोडून विनंती आहे माझी चौकशी करण्यापेक्षा!! चौकशी राखीव पोलीस निरीक्षक व सहा जनरल ड्युटी अंमलदार यांची करा. आणि एवढी माहिती निदर्शनास आणून देखील आपणास साधी चौकशी करता येत नसेल, तर आपली सद् विवेक बुद्धी भ्रष्ट झालेली आहे किंवा तुम्ही तपास करत असताना राखीव पोलीस निरीक्षक यांना वाचवण्यासाठी आपल्या बुद्धीची लक्तरे वेशीवर टांगलेली दिसत आहेत.!!
@CMOMaharashtra @ACB_Maharashtra @CollectorRaigad @Navimumpolice @maha_governor @PMOIndia @rashtrapatibhvn @PTI_Ne @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @INCIndia @PawarSpeaks @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @IASassociation @IPS_Association @ABPNews @TV9Marathi @loksabhaspeaker @LoksattaLive @MahaDGIPR @CPMumbaiPolice @milindbharambe @MumbaiPolice @SaamanaOnline @lokmat @Navimumpolice @AUThackeray @MahaChiefSec @AhireBhagw81354 @advanilparab @VijayWadettiwar @iambadasdanve
तरीही तुम्हाला हवे असलेले माहितीचे फोटो मी पाठवत आहे. जे हायलाईट्स केलेले आहेत. त्याच लोकांना त्या ड्युटी का?? कारण नवी मुंबईत आंतर जिल्हा बदली करून फक्त व्हीआयपी राहण्यासाठी लोक येत असतात. त्या साठी कोकण भवन गेट नंबर 2 हा बंद असलेला गेट ठरलेला पॉईंट आहे का?? पाहिजे असेल तर मागच्या महिन्यात पुण्या वरून ज्या महिला अमलदार बदलून आल्यात त्यांच्या साठी कोकण भवन गेट नंबर दोन हीच ड्युटी का?? कोकण भवन गेट नंबर 2 जो कायम बंद असतो. मुख्यालय गेट नंबर 2 व 3 जे कायम बंद असतात. असे अनेक गार्डचे पॉईंट आहेत तिथे नवीन मुलांना रोज ड्युटी येते. आणि व्हीआयपी लोकांना तीन दिवसांनी ड्युटी येते?? मी माहिती निदर्शनास आल्यानंतर माताजी टेकडीवरील गार्ड कोकण भवन 2 नंबर गेट ला टाकले कारण हे सर्व कलेक्टर आहेत.
On Thu, 24 Jul, 2025, 7:15 pm ACP (Admin), Navi Mumbai, <[email protected]> wrote:
दया कुछ तो गडबड है !!
ऐसा लगता है सब चोर है!!
रोडपाली मुख्यालय नवी मुंबई राखीव पोलीस निरीक्षक यांनी चालविलेली व्हीआयपी संस्कृतीची गोपनीय चौकशी होऊन राखीव पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई होणे बाबत.
राखीव पोलीस निरीक्षक रोडपाली नवी मुंबई यांनी चालवलेली व्हीआयपी संस्कृती बाबतची माहिती मी ॲड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर अनेक वेळा दिली. पण आपली शासकीय लाचखोरी आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली. कारण मी पीईपी जनरल ड्युटी अंमलदार ��ाकेश पाटील यांना बदली होऊन सुद्धा बदली ठिकाणी का नाही सोडलं⁉️ अशी माहिती दिनांक 10 जुलै 2025 रोजी आपल्या निदर्शनास आणली. राखीव पोलीस निरीक्षक यांनी त्यांना जनरल ड्युटी अंमलदार पदावरून काढून जनरल ड्युटी अंमलदार मदतनीस नियुक्त केले. याला त्यांची काय बुद्धिमत्ता समजावी. बदली झालेल्या ठिकाणी का नाही सोडत याचाच अर्थ काही तरी गडबड आहे. आणखी मोठं वैशिष्ट्य म्हणजे राकेश पाटील यांना हक्क रजेवर स��डून सुद्धा ते साध्या वेशात नवीन जनरल ड्युटी अंमलदार शेळके यांना मदत करायला येतात."" देश कसा भ्रष्ट असावा याचे हे एक उत्तम उदाहरण.(खरं खोटं बघायचं असेल तर जनरल ड्युटी अंमलदार कक्षातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावेत)
खालील सर्व उच्च पदावर बसलेल्यांना विनंती आहे थोडी तरी लाज शरम बाळगा आणि कारवाई करा.!!
मा.राष्ट्रपती साहेब, मा. उपराष्ट्रपती साहेब, मा. लोकसभा अध्यक्ष, मा. केंद्रीय गृहमंत्री साहेब. मा. राज्यपाल साहेब, मा. मुख्यमंत्री साहेब, मा. पोलीस महासंचालक साहेब, यांच्या निदर्शनास एवढी गंभीर गोष्ट आणून देखील आज पर्यंत का कारवाई होत नाही हा मला प्रश्न पडत आहे.
मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जाणून बुजून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत कारण या मागे खूप मोठा आर्थिक गोड बंगाल आहे. कारण पण तसंच आहे, प्रोटेक्शन कंपनी जनरल ड्युटी अंमलदार बनकर यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. कारण काय तर ते राखीव पोलीस निरीक्षक राहत असलेल्या घराचे घरभाडे, लाईट बिल आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च या गोष्टी बघत आहेत. प्रोटेक्शन कंपनीमध��ये 243 लोक आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरटीपीसी सोडले तर प्रत्येक पॉईंटचे दर तीन ते पाच हजार ठरलेले आहेत. ""माताजी टेकडीचे दर जास्त आहेत कारण तिथे पॉईंटला असणारे कलेक्टरच आहेत."" सीबीआय गार्ड, असे अनेक गार्ड आहेत तिथे दोन नवीन मुलं टाकतात जी २४ तास ड्युटी करतात आणि पैसे देणारे एक रात्र ड्युटी करून तिसऱ्या रात्री ड्युटीला येतात. याबाबत नवप्रविष्ठ मुलांनी वरिष्ठांकडे तक्रार केली असता. दिनांक 18/07/ 2025 रोजी पुन्हा एकदा एक खोटा दरबार रोडपाली मुख्यालय नवीमुंबई येथे घेण्यात आला. सर्व नव प्रविष्ट मुलांना वर्किंगच्या नावाखाली सकाळी सात वाजता हजेरीवर बोलवण्यात आले व दरबार घेण्या अगोदर नवीन मुलांची दोन ते तीन वेळा फॉलिंग घेण्यात आली. त्यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक यांच्या जवळचे डी. आय. कांबळे यांनी मुलांना धमकावले की कोणतेही तक्रार कराल तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. तसेच मा.सह पोलिस आयुक्त हे दरबार घेऊन गेल्यानंतर एडमिन A C P यांनी मुलांना विचारले तक्रार आहे का.?? आणि असेल तरी सांगायची नाही.!! गप्प राहायचं.!! असा नकळत इशाराच दिला.!!त्याम���ळे प्रोटेक्शन कंपनीमध्ये 200 लोकांचे तीन ते पाच हजारांनी पैसे जरी आले तर आपणास अंदाज येतो की यांना मुदतवाढ का मिळाली .!!
तसाच प्रकार एडमिन कंपनीत आहे. एडमिन कंपनीत तर मुख्यालय पार्किंगला तीन लोक दाखविले जातात. प्रत्यक्ष त्यातील एकच उपस्थित असते. बाकी तीन दिवसांनी येतात. एडमिन कंपनीतून जे कैदी पार्टीला लोक दाखवतात त्यांना कैदी पार्टी सुद्धा नसते. असा सर्व प्रकार चालू असताना वरिष्ठांना कसा समजत नाही. कारण आज पोलीस स्टेशनला मनुष्यबळ अभावी पोलिसांना सुट्ट्या मिळत नाहीत. आजही एवढं निदर्शनास आणून देखील ��ा कंपनीतून त्या कंपनीत दाखवणे, कागदावर ड्युटी दाखवणे मात्र प्रत्यक्षात घरी!! बंद गेट असले तरी तिथे लोक दाखविणे असे अनेक प्रकार चालू आहेत.
तरी माझी मा. राष्ट्रपती साहेब, मा. उपराष्ट्रपती साहेब, मा. लोकसभा अध्यक्ष साहेब, मा. केंद्रीय गृहमंत्री साहेब, मा. राज्यपाल साहेब, महाराष्ट्र राज्य. मा. मुख्यमंत्री साहेब, मा. पोलीस महासंचालक साहेब यांना विनंती आहे की एवढी गंभीर गोष्ट निदर्शनास आणून देखी��� PEP जनरल ड्युटी अमलदार राकेश पाटील यांना बदली ठिकाणी का सोडले नाही. प्रोटेक्शन जनरल ड्युटी अमलदार बनकर यांना का मुदतवाढ दिली.!! आणि आजपर्यंत जनरल ड्युटी अंमलदार तेच का ??त्यामध्ये बदल का नाही.?? तसेच राखीव पोलीस निरीक्षक आपले प्रमोशन का नाकारत आहेत.?? पोलीस प्रशासनाचे कोणतेही धार्मिक सण पोलिसांनी साजरे न करण्याचे निर्देश असताना देखील 10 जुलै 2025 रोजी राखीव पोलीस
मा.पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब
अजब तुमचे सरकार !!
मी ॲड. काशिनाथ ठाकूर सामाजिक कार्यकर्ता💐 डिसेंबर 2024 रोजी प्रथम आपणास राखीव पोलीस निरीक्षक रोडपाली नवी मुंबई हे पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घरी बसून पगार घेणारे म्हणजेच व्हीआयपी पद्धत चालू असल्याबाबत कळविले असता प्रथमदर्शनी चौकशीत त्यात तथ्य नाही असे आपणास दिसून आले असा खोटा तपास आपण केलात. पण राखीव पोलीस निरीक्षक रोडपाली व त्यांचे सहा ��नरल ड्युटी अंमलदार कागदावर फक्त ड्युटी दाखवतात प्रत्यक्षात व्हीआयपी आजही जास्तीत जास्त सवलती घेत आहेत. रोडपाली मुख्यालय येथील जिम मॅनेजर हे तर राखीव पोलीस निरीक्षक यांच्या वरदहस्ताने दुबई सारख्या परदेश वारी कोणतीही सुट्टी न घेता, कोणतीही परवानगी न घेता करत आहेत.
राखीव पोलीस निरीक्षक व्हीआयपी प्रथा बंद कशी होईल. यापेक्षा याबाबतची माहिती ॲड. काशिनाथ ठाकूर यांना कोणी दिली यासाठी महिला कर्मचारी यांना सीडीआर काढण्याची धमकी देत आहेत. त्याबाबत मी पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी अर्ज केला असता पांडुरंग शामराव सूर्यवंशी मो. 9819200100 या पोलिसांने पर्सनल मोबाईल नंबर वरून कॉल करतात व सांगतात की उद्या तुम्ही दिनांक 25 /2 /2025 रोजी केलेल्या तक्रारी अर्जा संबंधात चौकशी कामी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय एडमिन सहा - पोलीस आयुक्त किशोर गायके यांच्याकडे उपस्थित रहा. सूर्यवंशी यांनी पर्सनल फोनवरून फोन करून मला बोलविणे हे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. असं बोलावणे म्हणजे राखीव पोलीस निरीक्षक व पांडुरंग सूर्यवंशी माझं काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत का असं मला प्रश्न पडत आहे. कारण पांडुरंग सूर्यवंशी हे पूर्वी राखीव पोलीस निरीक्षक यांचे रायटर होते मग सूर्यवंशी राखीव पोलीस निरीक्षक साहेबांचे पांग फेडत आहेत का !!?? चौकशी माझी करण्यापेक्षा मी तक्रारी अर्जात जिम मॅनेजर राखीव पोलीस निरीक्षक यांच्या वरदहस्ताने दुबईला जाऊन येतात त्यांचा पासपोर्ट चेक करा. सत्य समोर येईल. चौकशीच करायची असेल तर प्रोटेक्शन जनरल ड्युटी अंमलदार यांची करा. कारण डिसेंबर मध्ये मी केलेल्या तक्रारीनंतर एकाच दिवसात 37 कर्मचारी सुट्टीवर सोडले आहेत. सोडलेल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर अगोदर का रजेची आवश्यकता का भासली नाही⁉️. राखीव पोलीस निरीक्षक हे भाड्याने राहत असलेल्या घराचे घरभाडे, लाईट बिल सर्व प्रोटेक्शन जनरल ड्युटी अंमलदार हे स्वतः भरत असतात, चौकशी करायची असेल तर यांची करा,
पण सर्व पद्धतच कठीण आहे. चोर ��ोडून संन्याशाला फाशी !! देण्याचीच पद्धत पोलीस आयुक्त साहेब आपल्या कार्यकर्दीत दिसत आहे. आपण आपल्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचे काय शोध घेत असाल असा प्रश्न पडतो आहे ⁉️
यावरून आपण एक निष्क्रिय पोलीस आयुक्त आहात असे दिसून येते.
तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक यांना विनंती आहे की पांडुरंग सूर्यवंशी यांनी कोणाच्या सांगण्यावरून मला त्यांच्या पर्सनल फोनवरून फोन करून बोलाविले. याची चौकशी व्हावी.
अन्यथा माझा घातपात झाल्याशिवाय राहणा नाही!!
@Navimumpolice
@milindbharambe
@CMOMaharashtra @ACB_Maharashtra
@hmo_maharashtra @RealBacchuKadu @Mahad671Kevel @maha_governor @PMOIndia @rashtrapatibhvn @PTI_News @rashtrapatibhwn @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @INCIndia @PawarSpeaks @NCPspeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @IASassociation @IPS_Association @ABPNews @TV9Marathi @loksabhaspeaker @LoksattaLive @MahaDGIPR @CPMumbaiPolice @MumbaiPolice @SaamanaOnline @lokmat @AUThackeray @MahaChiefSec @advanilparab @VijayWadettiwar @iambadasdanve