आपण दिलेल्या स्पष्टीकरणात अनेक दावे आहेत; पण मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
जर परीक्षा पूर्णपणे सुरक्षित होती, तर परीक्षेदरम्यानचा प्रश्नाचा फोटो बाहेर आलाच कसा? मोबाईल जॅमर होते, प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका होती, असे सांगणे पुरेसे नाही. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाली का नाही, याची स्वतंत्र, पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवायचा असेल तर फक्त स्पष्टीकरण नव्हे, तर:
१. फोटोची फॉरेन्सिक तपासणी
२. लॉग्स व CCTV ची पडताळणी
३. स्वतंत्र चौकशी अहवाल सार्वजनिक करणे
ही मागणी कोणाच्या विरोधात नाही; लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या विश्वासासाठी आहे. पारदर्शक चौकशी झाली तर सत्य स्वतःच समोर येईल.
@prajytnair@navalMH@CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal@VijayWadettiwar
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय?
PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune@Dev_Fadnavis@mieknathshinde
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
पुणे महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता JE परीक्षा १ डिसेंबरला घेण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ३००-४०० कि.मी. लांब परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळं दुसऱ्या दिवशी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानासाठी विद्यार्थी पोहोचू शकणार नाहीत, शिवाय आधीच शासकीय सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याने त्यांनादेखील ही परीक्षा देता येणार नाही. याशिवाय परीक्षेत पारदर्शकता राहण्यासाठी ही परीक्षा TCS ION CENTER वरच आयोजित करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.
ही बाब लक्षात घेत शासनाने सदर परिक्षा पुढे ढकलावी आणि निवडणूक संपताच आठवड्याच्या आत ही परीक्षा TSC ION CENTER वर घेऊन व विद्यार्थ्यांचं होणारं संभाव्य नुकसान टाळावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्या
हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला???
🔶मा. @Dev_Fadnavis साहेब
@PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025
रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात
👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर
परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ????
👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ????
👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना
केंद्र निवडण्याचा त्याचे preferences
देण्याचा दिखाऊपणा का करता ???
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन
उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ????
🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ????
👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी
🔶🔶🔶
अत्यंत महत्वाचा मुद्दा
1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर
दूर जाऊन द्यायची
मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ??????
👉 जे उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते
🔶🔶
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@PMCPune
🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण
👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही.
वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही
करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने
नम्र विनंती करतोय.
दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये
🙏🙏🙏🙏🙏
@NANA_PATOLE@INCHarshsapkal
मागील काही दिवस मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही नम्र विनंती 🙏
@mpsc_office
@mybmc
सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे:
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी.
👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात.
👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे.
👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे.
👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे?
यातून नेमके काय साध्य करायचे आहे?????
Computerized online exam
मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात.
पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो.
👉 ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आहे?
मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगराणीजी,
आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच.
"Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@maha_governor@AjitPawarSpeaks@ssaunik
मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका.
त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे.
तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.
🔸 हे सर्व उमेदवार एकत्र आल्यावर
शेवटचा मार्ग कोणता व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच.
🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
चिकटून असणाऱ्या प्लास्टिक खुर्च्या
बाजूला पाहिले तर ४ जणांच्या कॉम्प्युटर स्क्रीन दिसतात
खालच्या floor ला मंगल कार्यालय
असल निकृष्ट दर्जाचं private center @mybmc ने दिलय.
ते पण १००० rs fee घेऊन.
आणि आंदोलन करून पण 🫡
@Dev_Fadnavis@ramkadam@GopichandP_MLA@CMOMaharashtra
परीक्षार्थींना विनंती !
बृहन्मुंबई महानगर पालिका अभियंता परीक्षा २०२५
काल बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान आपण अत्यंत दूरावस्थेत असलेल्या खाजगी परीक्षा केंद्राचा मुद्दा मांडला होता.
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपणांस परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या, “दुरावस्थेत” असलेल्या सर्व खाजगी परीक्षा केंद्राचे या सर्व केंद्रांचे फोटो व ठिकाण DM करावेत.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “मराठी भाषा दिनानिमित्त” या सगळ्या दुरावस्थेतील परीक्षा केंद्रांचे फोटो काढून आयुक्त मा. भूषण गागरणी आणि सहकाऱ्यांना रंगीत फोटो अल्बम बनवून भेट देता येईल.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc@degree_holders@Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC #AAP #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only #TCS #MCGM #Exams
मुंबई महानगरपालिका चे अधिकारी आपण परीक्षा केंद्र निवडताना review पहिले नाहीत का?
तुमचा नक्की विश्वास कोणावर आहे, जे विद्यार्थी भावी अधिकारी म्हणून निवडले जातील त्यांच्यावर की बाकी कोणावर.....???
एवढा अहंकार कामाचा नाही साहेब नम्र विनंती 🙏
#BMC_At_TCS_Ion_Centre
@mybmc प्रशासनाला लाखो विद्यार्थ्यांनी विनंती करून सुद्धा त्यांनी जे करायचे तेच केले. शेवटी गल्ली बोळीतील परीक्षा केंद्र दिलीत. #NET_CAFE . #SE_JE सारखे अत्यंत महत्त्वाचे पद आपण भरतो त्यांची परीक्षा केंद्र बघितली तर परीक्षा पारदर्शकपणे होईल याची साशंकता वाटते.? @degree_holders
अश्या सेंटर ला परीक्षा घेण्या पेक्षा घरीच परीक्षा घ्या,@mybmc 900-1000 रुपये भरून असे परीक्षा केंद्र भेटत असेल तर एक्साम घेताच कशाला..... डायरेक्ट भरती करा..सामान्य विद्यार्थ्यांची एकच तर मागणी आहे TCS ION सेंटर, ते ही आपण देऊ शकत नाही कसली आर्थिक राजधानी?
#BMC_At_TCS_Ion_Centre