मागील चार ते पाच महिन्यांपासून ही जाहिरातीची कमान किरकटवाडी फाट्यावर लावण्यात आलेली आहे. अगोदरच अरुंद रस्ता, अवजड वाहने आणि त्यात ही कमान असल्याने येजा करताना गैरसोय होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? @supriya_sule@PMCPune @MlaTapkir @KirkatwadiForum@NileshBorude15
अगोदरच अरुंद असलेला खडकवासला-किरकटवाडीचा शीव रस्ता आणि त्यात दोन्ही बाजूंना बसलेले भाजी विक्रेते आणि फेरीवाले यांच्यामुळे इतरांना दररोज अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पालिका काही करणार का फक्त 'कर' घेणार? @PMCPune@supriya_sule@KirkatwadiForum@ksdforum@SinhagadR
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील अरुंद पुलावर हे फेरीवाले थांबत असून याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? बातमी आल्यानंतर दिखाव्यापुरती कारवाई? कारवाईत सातत्य का नाही? @PMCPune@KirkatwadiForum@ksdforum#Traffic#Sinhagadroad#Pune
ऑक्टोबर 2018 मध्ये किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील अवजड वाहतूकीबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश जारी केलेला आहे. पोलीस प्रशासनाने कधीही सदर आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले नाही. ........ @ankitgoyal_ips@supriya_sule@puneruralpolice
किरकटवाडी, खडकवासला भागातील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद आहेत. सणासुदीचे दिवस आहेत. तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. @PMCPune@KirkatwadiForum@ksdforum
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला पण सर्वसामान्यांच्या व्यथा संपलेल्या नाहीत. जो टीव्हीवर आणि सोशल मिडियावर दाखवला जातो तो आपला भारत नाहीच आहे, खरा भारत अजूनही असाच आहे जो जाणीवपूर्वक दाखवला जात नाही. @PMOIndia@CMOMaharashtra@mieknathshinde#education
खडकवासला येथे हॉटेलमधील ओला कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या व्यक्तीला पालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने पाच हजार रुपये दंड केला त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे आभार. अशा कारवाया व्हाव्यात 👌👌 @PMCPune@ksdforum@KirkatwadiForum@ArHagawane