#नियोजित_विकास_आराखडा
येणाऱ्या काळात गावातील सर्व बाजूंनी विकासासाठी मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी रस्ते व वाहतुक समस्या यासाठी गावातील प्रास्ताविक रस्ते PMRDA चे विवेक खरवडकर साहेबांना सादर करण्यात आले.उपस्थितांमध्ये नगरसेवक सचिन दोडके,संदिप हगवणे,खुशाल करंजावणे,सागर हगवणे होते.
शेकडो कोट्यवधी रुपये खर्चून #चांदणीचौक तयार केला,नियोजनकराने रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नियोजन केल्याचे दिसत नाही. सार्वजनिक-खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व प्रवाशी भर रस्त्यात उभी राहून वाहतूक कोंडी करत आहेत.@NHAI_Official@supriya_sule@CPPuneCity
कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार रोकायचा कसा याला भाजपाने उत्तर शोधले. ते आपल्याला मत देत नाहीत,काही हरकत नाही. पण त्यांचं मत कॉंग्रेस किंवा इतरांना जाऊ द्यायचं नाही!
यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने MIM पक्षाला ताकद देण्यात आली आहे. जहरी टिका करणारे ओवैसी बंधु आणि पक्षातील इतरांवर भाजपाचे कोणीच तितक्या तीव्रतेने बोलत नाहीत यातच सर्व आहे!
'फोडा आणि राज्य करा ' Divide & Rule हे ब्रिटिश बाळकडू यात आहे. जातीपातीचं राजकारण करुन मतविभाजन करायचं आणि मग मनसोक्त राज्य करायचं!
MIM च्या कोणत्याच नेत्यावर ED,CBI , NIA वगैरे एजन्सी कारवाई करत नाहीत कारण? शोधलं तर कळेल की राजकारण आहे!
#politics
#mim
#bjp #Congress
@NileshBorude15#खाणउद्योग
लोक परिणामांवर निदर्शने करत आहेत मूळ कारणांवर पण तेवढ्याच तीव्रतेन लोक रस्त्यावर आले पाहिजेत. नाहीतर उन्हाळ्यात फुफुटा व पावसाळ्यात चिखल हा होतच राहील.
@ArHagawane@PMCPune@supriya_sule@collectorpune1 फक्त रोड ची दुरवस्था नाही . हे डंपर / खाण 24 तास चालू असतात. त्या 24 तास उडणाऱ्या धुळी मुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे डंपर वाले बेशिस्त पणे गाडी चालवतात कित्येक वेळी अपघात करतात.
हे गाव पुणे महानगर पालिका हद्दीत आहे का?
सणसनगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.उन्हाळ्यात धुळीचा फुफाटा पावसाळ्यात चिखलाचा राडा. या भागाला भ्रष्ट प्रदूषण नियंत्रण यंत्रणा दुर्लक्षित करत आहे.@PMCPune@supriya_sule@collectorpune1
🚨 THIS IS HOW BJP STOLE BANGALORE CENTRAL
And yes, the @ECISVEEP was in on it!
LoP @RahulGandhi breaks it down:
In just one Assembly segment, #Mahadevapura, #Karnataka —
1,00,250 FAKE VOTES were used to rig the result.
This isn’t election irregularity.
This is full-blown electoral fraud.
Here’s how they did it, Vote Chori in 5 steps:
1️⃣ 11,965 Duplicate Voters
2️⃣ 40,009 Fake or Invalid Addresses
3️⃣ 10,452 Voters Stuffed into One Address
4️⃣ 4,132 Invalid or Morphed Photos
5️⃣ 33,692 Votes Misused via Form 6
And all this in just ONE constituency!
Now imagine this template of theft used across the country.
⚠️ The numbers don’t lie. But the system clearly did!
Watch the full breakdown 👇
#RahulExposesVoteChori
#VoteChori
#IWCWithRahulGandhi
खडकवासला येथील कोल्हेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी इजा झाली नाही. पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? येथील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ही अतिशय संतापजनक आणि तितकीच चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्य जनता आज भीतीच्या छायेखाली जगत असून गुन्हेगारांना मात्र मोकळे रान मिळाले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे काम गृहखात्याने थांबविले आहे का असा संशय यावा इतपत ही गंभीर परिस्थिती आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी तातडीने ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@PuneCityPolice@puneruralpolice
@PMCPune येथील मागील वर्षी मे महिन्यामध्ये तक्रार करून देखील दखल घेतली नाही. झाड पडून एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत प्रशासन जागे होणार आहे की नाही? अनर्थ झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची असेल. Location: ज्ञानदा प्रशाला समोर किरकटवाडी.
सोबत x:https://t.co/auVG35bbq2
हे दर वर्षीच दुखणं दाखवून अजून प्रशासन जाग झालं नाही. अधिकारी फक्त येऊन फोटो काढून जातात परत फोन उचलत नाहीत. लोकेशन: किरकटवाडी सिंहगड रस्ता मुख्य चौक.
@PMCPune
https://t.co/uoOsu5SBv1
पावसाळी गटारांचा अभाव.पावसाचे पाणी रस्त्याने वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पुणे मनपा चे निदर्शनास आणून दिले,त्यासंदर्भात पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री रायकर साहेब,अभियंता श्री निशिकांत छापेकर,श्री जावळकर साहेब आदींसह उपस्थित राहून उपाययोजने साठी पाहाणी केली.
आणि असा होतोय नालेसफाईत दरवर्षी करोडोंचा घोटाळा!
दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ओढे नाले साफ करण्याचे करोडो रुपयांचे टेंडर निघते. काम करणारे बहुतांश ठेकेदार ठरलेले असतात आणि काम करण्याची पद्धतही ठरलेली असते.
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे काही दिवसांपूर्वी तथाकथित नालेसफाई करण्यात आलेली असून 'काम उरकून' ठेकेदार निघून गेला आहे. मात्र खरंच ज्या ठिकाणी नालेसफाई करण्याची गरज आहे तेथे मात्र काहीच काम करण्यात आलेले नाही.
किरकटवाडी येथील शिवनगर भागातून जाणाऱ्या या ओढ्याला सप्टेंबर 2019 मध्ये मोठा पूर आला होता. या पूरात अनेक घरं पडली, गाड्या वाहून गेल्या, सोसायट्यांमध्ये तीन चार फूट चिखलाचा थर साचला होता.
त्याचे मुख्य कारण होते प्रवाहात अडथळा आल्याने पाणी आजूबाजूला शिरले होते. यापासून पालिकेने मात्र धडा घेतलेला नाही. ओढ्याच्या दोन्ही बाजूला सफाई केल्याचे दिसावे म्हणून काम करण्यात आले आहे मात्र मधला भाग जैसे थे ठेवण्यात आला आहे.
नालेसफाईचे हे एक मोठं रॅकेट आहे ज्यात ठेकेदार आणि अधिकारी सामील आहेत. पोकलेन मशिन ओढ्यात उतरुन जागच्या जागी घाणीची कालवाकालव करुन जातो. यालाच तथाकथित नालेसफाई म्हटले जातेय!
या भागाने मोठा पूर झेललेला आहे. त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता या अर्धवट नालेसफाई मुळे येत्या पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका आहे. पुणे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. @PMCPune@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mohol_murlidhar@supriya_sule@BhimraoTapkir@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@KirkatwadiForum@ksdforum@BJP4Maharashtra@ShivSenaUBT_@mnsadhikrut@NCPspeaks@MahavikasAghad3
पुणे शहर वाहतूक पोलीसांना नेमकं काय अपेक्षित आहे? तरुणांची पिळवणूक करुन काय मिळतंय?
काही वेळापूर्वी सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली स्वप्नील जाधव या दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवण्यात आलं. हेल्मेट, लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न सगळं चेक केलं क्लीअर होतं. प्रमोद कोकणे म्हणून वाहतूक पोलीस कर्मचारी होते.
सगळं क्लीअर होतं मग त्यांनी हवा कमी आहे असं कारण शोधलं. नंतर म्हटले सिग्नल जंप केला आहे. तरुण सांगतोय सर काही चूक नाही. मग ते प्रमोद कोकणे म्हटले 500 ची पावती कर नाही तर ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन.
त्यांनीच गाडी अडवली व नंतर म्हटले तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला म्हणून पावती टाकीन. स्वप्निल जाधव ने चूक नाही म्हटले परंतु प्रमोद कोकणे यांनी 1500 रुपये ऑनलाईन दंडाची पावती केली.
वाहतूक पोलीसांची अशी मनमानी थांबायला हवी. वारंवार असे प्रसंग घडत आहेत. ऑनलाईन 1500 ची पावती केली मग अगोदर 500 ची पावती मागणी कसली होती? पावतीला evidence image जोडावी लागते. ती बाजूला उभ्या असलेल्या गाडीची जोडली आहे. पोलीस आयुक्त दखल घेतील अशी अपेक्षा. @CPPuneCity@PuneCityTraffic@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@T_Investigator