महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड विरोधाभास सुरु आहे. व्यक्तिद्वेषाने पछाडलेले, विकासाच्या प्रकल्पांना विरोध करणारे आणि जनतेला नेहमी संभ्रमित करणारे विरोधक एका बाजूला.... आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र एक करणारे सत्ताधारी एका बाजूला... असे महाराष्ट्राचे कमालीचे विसंगत चित्र आहे. उन्नतीसाठी महाराष्ट्राला ज्यांनी मार्गदर्शन करावे असे ज्येष्ठ नेते शिंग मोडून विरोधक वासरांच्या पोराटकीत सहभागी झालेत हे आणखी वाईट.
"एकतर तू राहशील, किंवा मी राहीन" अशा वैयक्तिक धमक्या देणारे नाक्यावरच्यांसारखे राजकारणी मिळणे हे महाराष्ट्राचे सर्वाधिक दुर्दैव. खोटेनाटे आरोप करणे, पायाभूत सुविधांवर संशय व्यक्त करणे, न्यायालये तसेच सैन्य अशा यंत्रणांच्या बाबतीत गैरसमज पसरवणे, समाजात फूट पडणाऱ्या शक्तींना ताकद, दहशतवादी शक्तींना उत्तेजन देणे अशा महाराष्ट्राला मध्ययुगात नेणाऱ्या कारवायांत विरोधक व्यस्त आहेत.
दुसरीकडे "माझी लाडकी बहीण", "अन्नपूर्णा", "लाडका भाऊ" अशा योजना सत्ताधार्यांनी आणल्या आहेत. ४४ लाख शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ताकद, आर्टी तसेच बार्टी अशा संस्था सक्षम करणे, लाखो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात खेचून आणणे, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधा निर्मिती, मुंबईचे सुशोभीकरण आणि अन्य सुविधा अशी असंख्य कामे महायुती सरकारने केली आहेत.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार देशाला प्रगतीच्या वाटेवर वेगाने नेत आहे. मा. मोदीजींच्या मार्गदर्शनात महायुतीच महाराष्ट्राला वेगाने पुढे नेणार आहे. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला याची जाणीव आहे. येत्या सहा महिन्यात याचे प्रत्यंतर येणार आहे. @BJP4Maharashtra
उद्धव ठाकरे यांच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एका महिला खासदाराचा अपमान फक्त ती मराठीत बोलली म्हणून केला?? हे अत्यंत अनादराचे आहे. मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही.. उद्धव यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर कारवाई केली पाहिजे...
#RajyaSabha
"When we are in society, we should always keep the legislature in mind, and when we are in the legislature, we should always keep the society in mind," said former UP Governor Shri Ram Naik ji.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल श्री राम नाईक जी नेहमी म्हणायचे, 'जेव्हा आपण समाजात असतो तेव्हा आपण नेहमी विधिमंडळाला लक्षात ठेवले पाहिजे आणि जेव्हा आपण विधिमंडळात असतो तेव्हा आपण नेहमी समाजाला लक्षात ठेवले पाहिजे..'
उत्तर प्रदेश के पूर्व राज्यपाल श्री राम नाईक जी हमेशा कहते, 'जब हम समाज में हो तो विधायिका को ध्यान में रखना चाहिये और जब विधायिका में हों तो समाज को हमेशा ध्यान में रखना चाहिये..'
(84 वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद | मुंबई | 28-01-2024)
#Maharashtra #Mumbai #AIPOC2024 #DemocraticDialogue #MumbaiConference
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला, मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोकमामांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण जाहीर होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मराठी चित्रपट आणि नाटकांचे विश्व त्यांनी गाजविले. सर्व प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा फडकवला.
त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
#AshokSaraf #अशोकसराफ