"येत्या शतकात भारत एक आर्थिक महासत्ता बनेल, असा अंदाज एका अमेरिकन अर्थशास्रज्ञाने व्यक्त केला आहे. भारताने एक आर्थिक महसत्ता बनावे असे मला वाटत नाही. मला वाटते, भारताने एक सुखी देश बनावे."
-जे. आर. डी. टाटा, १९९२ साली 'भारतरत्न' पुरस्कार मिळाल्यानंतर सत्कारसभेत भाषण करताना
#india
ही मुलाखत तुम्हाला रडवेल …मंगेशकर रुग्णालय की पैसे काढायचं मशिन? | निस्वार्थ रुग्णसेवा केलेल्या पुरस्कार प्राप्त डॉक्टरचीच मंगेशकर रुग्णालयात हेळसांड, मृत्यू नंतरही चोवीस तास पाच लाखासाठी प्रेत दिले नाही. मयत डॅाक्टरांच्या पत्नीच्या पुस्तक दावा
आयुष्यातील उमेदीची सर्व वर्षे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवण्यातच गेली.
माझा आणि माझ्या कुटूंबाचा या रुग्णालयाशी असा काही संबंध आहे की त्याशिवाय आमचे जीवन पुर्ण होऊच शकत नाही.
मुळात आम्ही छत्रपती संभाजीनगर सोडून पुण्यात स्थलांतरीत झालो ते मुलाच्या या रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारासाठी. सुरूवातीला सहा महिन्यांचा कालावधी सांगीतला तेव्हा पेईंग गेस्ट म्हणून रूग्णालयाशेजारीच एका बंगल्यात राहीलो.
उपचारांनी चांगला गुण येत होता मात्र काळ लांबत चालला होता. नंतर दोन वर्षांचे टारगेट देण्यात आले. फरक पडतोय दृष्य स्वरूपात म्हणून आम्ही सहकुटूंब पुण्यालाच येऊन राहायचे ठरवले. आणि पुन्हा पुणेकर झालो. व्यवसाय हलवला. तिकडचे स्वतःचे घर, ॲाफिस विकून पुण्यात घर घेतले. ते देखील दिनानाथला रोज जाणे येणे सोयीचे होईल या हिशोबानेच. पंधरा मिनिटाच्या अंतरावर.
कालांतराने मुलगी झाली. ती देखील दिनानाथमध्येच. एक तपाचा काळ दिनानाथ हॅास्पीटलसोबत संबंध आला. दरम्यानच्या काळात अनेक कडू गोड आठवणी असल्यातरी वैद्यकीय व्यवसायाची लचकेतोड वगळता गुणवत्तेच्या बाबतीत आजही दिनानाथला पर्याय नाही.
अनेक्स बिल्डींग झाली तसा रूग्णालयाशी संबंध कमी येत गेला. मात्र त्यापुर्वी सर्वात मोठी कुचंबणा व्हायची ती रोजच्या पार्कींगची. पार्थला रोज फिजीओसाठी नेतांना कित्येकदा दुचाकी पोलीसांनी उचलून नेली. कित्येकदा चारचाकीला जॅमर लागले.
शेवटी कंटाळून प्रशासनातून माहीती काढली तेव्हा कळले की बेसमेंट पार्कींगच्या जागेत रुग्णालयाने सीटीस्कॅन सेंटर बसवलेय. शेवटी प्रशासनाने माझी अडचण ओळखून आणि त्यांची अडचण होऊ शकते हे ओळखून मला ॲंबुलन्सच्या मागे रोज गाडी लावायला परवानगी दिली.
"दुभत्या गायीच्या लाथा गोड" म्हणतात तसे पार्थचे आयुष्य दिनानाथ मुळे बदलले त्यापुढे इतर गैरसोयी आणि आर्थिक झळ क्षुल्लक वाटत गेली. आज जे जातीयवादी नजरेतून रुग्णालयाकडे पाहीले जातेय ते मात्र अतिशय निंदनीय आहे. आम्ही उपचार घेतांना हा दृष्टीकोन नव्हता ठेवला. असतील कदाचीत सर्व डॅाक्टर ब्राह्मण तर मग मात्र आपल्यालाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल की गुणवत्तेच्या बाबतीत इतर हॅास्पिटल्स मागे का आहेत.
KEM ला गेलो होतो तेव्हा त्यांनी पार्थचे काहीही होऊ शकत नाही म्हणून हात वर केले होते. त्या पार्थला दिनानाथने नविन आयुष्य दिले. कसा करू जातीयवाद त्यांच्यासोबत?
🖌️🖌️🖌️Rahul Premraaj Bhosale
माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहीलेले आहे. कॅापी पेस्ट करतांना कृपया माझे नाव टाकावे.
#deenanath
#Mangeshkar
#DMH
@PrakashGade13@The_NikhilB@Core_punekar@Priiyam@mevikasdesh
@revati_shinde21 नीरजाचं कोड वाढत चाललेलं असतं,तेव्हा नीरजा डाॅक्टरला म्हणते हे वाढतच चाललय माझं,तेव्हा अनया म्हणतो, हो हो ऑपरेशनमध्ये तुझे हात आता चांगले चाललेत, हा प्रसंग मला खूप भावला