कुठे आहेत अमित साटम ?
कुठे आहेत आशिष शेलार, किरीट सोमय्या, चित्रा वाघ !
कल्याण मध्ये ट्रेन प्रवासात अर्णव खैरे नावाचा मुलगा काहीं वादातून आत्महत्या करतो. पोलिस तपास ६ महिने झाले तरी अजूनही सुरूच आहे त्याचा फॉलो अप मनसे कार्यकर्ते करत आहेत. मात्र त्यावेळी भाजपचे नेते थयथयाट करत होते. अजूनही अर्णव खैरे प्रकरणी कोणालाही अटक नाही, मात्र भाजपचे दिवटे भाषिक वाद पसरवला म्हणून रस्त्यांवर उतरले होते.
आज मुंबई लोकल मध्ये एका २२ वर्षीय मुलाचा खून होतो मात्र त्याबाबत भाजपचा एकही नेता बोलायला समोर येत नाही , ट्विट नाही काही नाही ! कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची?
केवळ राजकारण करण्यासाठी भाजप पुढे असते हे अधोरेखित होते. #Mumbailocal
राज साहेब ठाकरे बरोबर बोलतात की बाहेर राज्यातून येणारे लोंढे थांबवले पाहिजेत,
येतात आणि इथे येऊन माज करतात,
एक गोष्ट समजत नाही जेव्हा तो भडवा त्याला मारत होता, बाजूला असणारे नामर्द काय करत होते
नुसती गर्दी करून ठेवले मुंबई ठाण्यात
@MumbaiPolice@ThaneCityPolice@DGPMaharashtra
लोकलचे दार बंद करण्याच्या किरकोळ वादातून थेट चाकूने हल्ला करून २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मुंबई कधीच इतकी असुरक्षित नव्हती. महाराष्ट्रातील नागरिक हा पूर्ण हताश झाला आहे सरकार मात्र सत्तेच्या जीवावर निवडणुकांचे फड जिंकणे, लोकप्रतिनिधी फोडणे यांतच व्यस्त आहे.
#Mumbai
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या आशाताईंसारख्या दिग्गज व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना वापरलेली मराठी ऐकून, आज प्रत्यक्ष मराठी भाषादेखील ओशाळली असेल...!
महाराष्ट्रात इतकं काही घडलंय.
तर अजुन एक घडावं.
शिवसेना मनसे विलिनीकरण व्हावे.
विलिनीकरणानंतर राज ठाकरे प्रदेशाध्यक्ष व्हावे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, सुषमाताई यांनी पुढील निवडणुकीपर्यंत सतत न थकता महाराष्ट्रभर फिरावे.
मराठी माणूस नक्की जिंकेल.
अरे @OmRajenimbalkr माकडा किती मूर्ख बनवशील लोकांना ?
ज्यांच्या विरोधात तू लढत आला, ज्यांचं नाव घेऊन लोकांना मूर्ख बनवत आला, आता त्यांच्याच सोबत सत्तेची मलई खाणार ?
सत्तेसाठी बापाच्या मारेकऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसणारा निर्लज्ज पूत्र आहे तू.
खरतर @OmRajenimbalkr तुमच राजकारण 2014 लाच संपला असता धाराशिव विधानसभेत तुम्हाला राणा पाटीलने पराभूत केलेल तेव्हा,
ठाकरेंनी तुम्हाला 2019 ला परत लोकसभेला निवडून आणल
खरतर ते म्हणू शकले असते तुम्ही गेल्या विधानसभेला पडला तुम्हाला कशाला लोकसभा व सीटिंग MP रविंद्र गायकवाडांनाच परत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आणि हिताला प्राधान्य देत, माझ्या कार्यकाळात मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार आहे.
#Bhandup #WardNo114 #RajoolSanjayPatil #ShivSenaUBT #UddhavThackeray #AdityaThackeray #Mumbai
"एकनाथ शिंदे यांना आवर घाला नाहीतर ते दुसरे नारायण राणे होतील..."!!!
शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांचे भाकित खरे ठरले....!!
@uddhavthackeray@ShivSenaUBT_