राज्यातील आरोग्य विभागात हजारो पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ढासळत आहे. रुग्णालयांत कर्मचारीअभावाची तीव्र तक्रार आहे, तर दुसरीकडे हजारो सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि आरोग्यमंत्री @abitkar_prakash यांनी तातडीने आरोग्य भरती प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या आरोग्य यंत्रणेला बळ द्यावे आणि बेरोजगारांना न्याय द्यावा, ही विनंती !
@INCHarshsapkal@INCMaharashtra
#आरोग्यभरती_लवकरात_लवकर
#ArogyaBharti
#महाराष्ट्रसरकार
#रोजगार
#आरोग्यसेवा
#Maharashtra
प्रति,
मा. सौरभ राव
आयुक्त,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे.
विषय: सरळसेवा भरती २०२५ मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र लागू करण्याबाबत.
महोदय,
ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व मल्टी पर्पज वर्कर (आरोग्य सेवक) या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटींमध्ये MSBSVT (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ) चे स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र मान्य करण्यात यावे, ही परीक्षार्थींची मागणी आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही भरती असल्याने महाराष्ट्र राज्य मंडळाचे प्रमाणपत्र वैध मानणे हे न्याय्य आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी MSBSVT कडून अधिकृतरीत्या स्वच्छता निरीक्षक प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या हक्काचे संधीसमान्यत्व अबाधित ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे, या भरती प्रक्रियेत MSBSVT च्या प्रमाणपत्राला शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यता देण्यात यावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@INCHarshsapkal@TMCaTweetAway@MPLodha
#स्वच्छता_निरीक्षक
#Sanitary_inspector
*नमुंमपा पदभरती परीक्षा सुव्यवस्थित होण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे काटेकोर लक्ष*
*कोल्हापूर जिल्हयातील पर्यवेक्षकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे*
‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ बाबत ऑनलाईन परीक्षेदरम्यान दि.16 जुलै 2025 रोजी, दुपारी 1 ते 3 वा. च्या परीक्षा सत्रात कोल्हापूर जिल्हयातील परीक्षा केंद्रावर उपस्थित पर्यवेक्षकामार्फत विद्यार्थ्यास परीक्षेच्या दरम्यान उत्तराचा पुरवठा केला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्यात आली असून पर्यवेक्षकामार्फत एका उमेदवारास 2 ते 3 प्रश्नांची उत्तरे उमेदवाराने न विचारता पर्यवेक्षक सांगत असल्याचे सिसिटिव्ही चित्रीकरण पाहणी केली असता निदर्शनास आलेले आहे.
त्या अनुषंगाने सदर पर्यवेक्षकास त्वरीत पर्यवेक्षक पदावरुन हटविण्यात आले असून कोल्हापूर जिल्हयात नियुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे परीक्षा समन्वय अधिकारी यांचेमार्फत परीक्षा घेणा-या टिसीएस संस्थेस सदर पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत संबधित पर्यवेक्षकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने होण्याकरिता अगदी सुरुवातीपासून संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली असून परीक्षापूर्व व परीक्षा कालावधीतही सर्व बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी परीक्षा प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची संदिग्धता बाळगू नये व अफवांना बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #navimumbaimahanagarpalika #nmmccommissioner #nmmcadministrationdepartment #nmmcbharti #nmmcrecruitment #recruitment
मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये MPSC आयोग सर्वांना नोकरी देऊ शकत नाही त्यामुळं आपण सर्व जण सरळसेवा परीक्षा देऊन लवकर नोकरी लागावी म्हणून प्रयत्न करतो. कारण सरळसेवा मध्ये जागा खूप जास्त असतात पण सरळसेवा भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहे. आपण ते बऱ्यापैकी उघडकीस आणले पण परत हे थांबण्या ऐवजी नव नवीन उद्योग करून घोटाळे हे करतच आहे. आता तर ते सेंटर च मॅनेज करत आहेत. TCS कंपनी किती ही म्हटली आमचा सेंटर मॅनेज होत नाही तर मग लातूर चे गुरू ऑनलाईन सेंटर घोटाळा उघडकीस आला की लगेच बंद केले. असे किती तरी गुन्हे नोंद झाले आहेत. TCS च्या कर्मचारी आणि सेंटर मालक वर पण गुन्हे नोंद झाले आहेत. आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे आहे. कालच फडणवीस यांनी घोषित केले की मेगा भरती करणार पण आम्हाला ही मेगा भरती फक्त आणि फक्त आयोगाकडूनच हवी आहे त्याशिवाय गोर गरिबांचे पोर नोकरीस लागणार नाहीत. त्यामुळे आपल्या या ट्विटर वॉर ला पाठिंबा द्या आणि सर्व जन सहभागी व्हा.
आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी ...
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
#विधानसभालक्षवेधी
राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, #अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
#मेगाभरती
#पावसाळीअधिवेशन२०२५
#MonsoonSession2025
महाराष्ट्रातील मोठा नोकरभरती #घोटाळा#फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठा नोकर भरती घोटाळा सुरू आहे. एक ही सरळसेवा परीक्षा घोटाळे झाल्या शिवाय पूर्ण झाली नाहीये. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळा होऊन गुन्हे पण दाखल होतात पण नंतर गृहमंत्रालय कुचकामी ठरते पोलीस तपासच करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात कबूल केले होते 48 FIR झाल्या आहेत पण पुढे त्याच्या तपासाचे काय? कसलाच तपास झाला नाहीये. तेच आरोपी परत परत पेपर फोडत आहे. त्यांना माहीत आहे राज्याचे सध्याचे गृहमंत्री खूपच निष्क्रिय आहेत त्यामुळे ते कितीही गुन्हे झाले तरी बिनधास्त पेपर फोडत आहेत.
उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही 3 मोठे घोटाळे बाहेर काढले होते पण त्यावेळी तपास मुळापर्यंत जाऊन शेवटपर्यंत आरोपी पकडले होते. तसा आता पाहण्यास येतच नाही का तर फक्त निष्क्रिय गृहमंत्री. तुमच्या या निष्क्रियेते मुळे हजारो प्रामाणिक मुलांच्या आयुष्याचे वाटोळे होत आहे. किमान परीक्षा तरी MPSC कडे द्या एवढे तरी उपकार करा आमच्यावर.
@Dev_Fadnavis@AUThackeray@Awhadspeaks@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@INCHarshsapkal@PatilKailasB@ShivSenaUBT_@Prksh_Ambedkar@rajushetti@RealBacchuKadu@supriya_sule@Awhadspeaks@satejp@degree_holders@AjitPawarSpeaks@rautsanjay61
जिल्हा परिषद अकोल्याचा भोंगळ कारभार,आरोग्य सेवक 50% भरतीमध्ये महाराष्ट्रभर सर्व जिल्हा परिषद नियुक्ती देत असून अकोला जिल्हा परिषद ने 9 महिन्यापासून उत्तीर्ण उमेदवारांना जॉइनिंग दिली नाही. राज्य सरकारने याकडे लक्ष द्या @CMOMaharashtra@ceozpakola@advakash