पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण सहजपणे पुण्यात गावठी कट्टे मिळत आहेत दिवसाढवळ्या गँगवार होतोय इतकी विदारक परिस्थिती कुणाच्या आशीर्वादाने
मिळत आहे.मागच्या आठवड्यात खेड शिवापूर जवळील रांजे गावात गोळीबार करुन एकाचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आला होते. ते आरोपी अद्याप पुणे ग्रामीण पोलिसांना सापडले नाहीत. काल पुन्हा शिरुर येथे भर वस्तीत एकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गृहखात्याने पुणे पोलिस खात्यात बदल घडवणे आवश्यक आहे...पोलिसांचा वचक तर अजिबात उरला नाही...पुण्यातल्या सगळ्या पोलिसांची बदली मोठी शहरे सोडून दुर्गम भागात, खेड्यात करावी...नी पुण्यात अनुभवी नी कर्तबगार पोलिसांची बदली करण्यात यावी.
@puneruralpolice@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@ThaneCityPolice
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या कोणगाव पोलीस ठाणे हद्दीत दुसऱ्याची मालमत्ता असलेली स्टील रॉडस ची चोरी ट्रेलर चालकांच्या आर्थिक संगनमताने माफिया मोनू यादव आणि त्याची संघटीत टोळी अनेक वर्षे करीत असून राजकीय पक्षाच्या नेते तसेच त्याचे कार्यकर्ते यांच्या कृपेने करीत आहे. काही दिवसांपूर्वी कोणगाव पोलीस ठाणे मध्ये स्टील रॉडस ची चोरी करीत असताना रंगेहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गठीत पोलीस पथकाने छापा टाकून स्टील माफिया मोनू यादव व त्याच्या संघटीत टोळी विरोधात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मा.न्यायालयात सुनावणी साठी हजर केल्यानंतर काही शर्ती नुसार त्याला जामीन मिळालेला आहे. माफिया जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याची स्टील रॉडस ची चोरी करणारी संघटीत टोळी रोज लाखों रुपयांच्या किंमतीच्या स्टील रॉडस टीएमटी बार ची लूट सात ते आठ ठिकाणी नियोजनबध्द पद्धतीने करीत आहे.त्यांच्या नेहमीचे ओळखीचे डायव्हर यांच्याशी मोबाईल वर पूर्वनियोजित संवाद साधून ठराविक कालावधीत प्रत्येक वेळी चोरी अड्ड्यांचे ठिकाण सातत्याने बदलत करीत आहे.कोणगाव पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भिवंडी परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त आणि त्यांचे नावाने अवैध धंदे चालकांकडून प्रोटेक्शन मनी स्वरुपात खंडणी वसुली करणारे पोपट बन यांच्या मदत,प्रोत्साहन,मार्गदर्शन आणि संरक्षणाखाली सुरू असल्याचे सर्वत्र चर्चा होतं आहे. शासकीय अधिकारी जर कायदा सुव्यवस्थेचे भक्षक बनले असतील तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळू शकतो असा सवाल उपस्थित होतं आहे.@DGPMaharashtra@MahaDGIPR@MahaChiefSec@maharashtra_hmo@iYogeshRKadam@DRPANKAJBHOYAR@SunetraA_Pawar@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ThaneCollector@CGSTThane@PMOIndia@AmitShah@nitin_gadkari@steel_indian@TataSteelLtd@JindalSteel_In@SAILsteel@SteelMinIndia@cbawankule@nsitharaman@IPS_Association@India_NHRC@barandbench@SCJudgments@jagograhakjago
भुरट्या पत्रकारां’चा मुद्दा पुढे करून निर्भीड पत्रकारितेला दाबण्याचा डाव?
अवैध धंद्यांवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न? पोलिसांच्या आवाहनातील प्रत्येक मुद्द्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
नवी मुंबई | प्रतिनिधी :
“पत्रकार असल्याचे सांगून आर्थिक मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावधान”, “सोशल मीडिया, रील, ट्विट किंवा पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करू नका”, “अशा व्यक्तींचे पुरावे पोलिसांकडे द्या”—अशा स्वरूपाचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
खंडणी, धमकी किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हायलाच हवी. मात्र या आवाहनाच्या नावाखाली अवैध धंदे उघड करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्न विचारणाऱ्या निर्भीड पत्रकारितेलाच बदनाम, दिशाभूल किंवा कलंकित करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचीही स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.
‘पत्रकार’ नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करा; पण पत्रकारितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका!
एखादी व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणवून घेत असेल आणि त्याने बातमीच्या नावाखाली पैशांची मागणी केली असेल, धमकी दिली असेल किंवा दबाव निर्माण केला असेल तर त्याविरुद्ध ठोस पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
परंतु “पत्रकाराने प्रश्न विचारला = आर्थिक मागणी केली” असा सरसकट निष्कर्ष काढता येणार नाही.
पत्रकाराने बारमध्ये नियमांचे पालन होते का, गुटखा विक्री सुरू आहे का, अमली पदार्थांचा गैरव्यवहार होतो का, हुक्का पार्लरचे नियम पाळले जातात का, स्पा-मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीर प्रकार आहेत का, जुगार किंवा सोशल क्लबच्या आड जुगार चालतो का, लॉजिंगमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू आहेत का—असे प्रश्न विचारणे ही पत्रकारितेची जबाबदारी असू शकते.
या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यालाच ‘भुरटा पत्रकार’ ठरविणे हा गंभीर लोकशाहीविषयक प्रश्न आहे.
बार–हॉटेलच्या कथित गैरप्रकारांवर कारवाई कोण करणार?
नवी मुंबईतील विविध बार, हॉटेल, लॉजिंग, क्लब, स्पा आणि इतर आस्थापनांबाबत वेळोवेळी विविध प्रकारचे आरोप सार्वजनिक चर्चेत येतात.
त्यामध्ये—
• गुटखा व प्रतिबंधित पदार्थांची कथित विक्री,
• अमली पदार्थांच्या कथित व्यवहारांचे आरोप,
• नियमबाह्य हुक्का पार्लर,
• स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली कथित गैरप्रकार,
• भेसळयुक्त खाद्यपदार्थ अथवा इतर वस्तू,
• जुगार,
• सोशल क्लबच्या नावाखाली कथित जुगार अड्डे,
• लॉजिंगमध्ये नियमबाह्य व्यवसाय,
• ‘पिक पॉइंट’पासून कथित ‘चादर पलटी’पर्यंतच्या गैरप्रकारांचे आरोप,
अशा अनेक बाबींची चर्चा होत असेल तर त्याची जबाबदारी केवळ पत्रकारांची नाही; संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचीही आहे.
मग पत्रकारांनी प्रश्न विचारायचेच नाहीत का?
जर एखादा पत्रकार एखाद्या आस्थापनाबाबत पुराव्यासह प्रश्न उपस्थित करतो, तर संबंधित विभागाने—
“बातमी खोटी आहे का?”
याची चौकशी करावी.
आणि बातमीतील आरोप सत्य आढळले तर—
“गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई का झाली नाही?”
याची चौकशी करावी.
मात्र पत्रकाराला धमकावणे, त्याच्यावर दबाव आणणे, त्याची बदनामी करणे किंवा त्याला आर्थिक मागणी करणारा म्हणून रंगविणे—असे प्रकार होत असल्याचा आरोप असेल तर त्याचीही स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.
‘पोलीस–हस्तक–अवैध धंदे’ कनेक्शनच्या आरोपांचीही चौकशी करा!
अवैध धंदे करणाऱ्यांकडून काही पोलीस कर्मचारी अथवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव वापरून कथित वसुली करतात, असा आरोप कुठे केला जात असेल तर तो केवळ दुर्लक्षित करून चालणार नाही.
कोण पैसे मागतो?
कोणाच्या नावाने मागतो?
पैसे कोणाकडे जातात?
कोणत्या आस्थापनांकडून मागणी होते?
कोणत्या आस्थापनांवर कारवाई होते आणि कोणांकडे दुर्लक्ष होते?
कॉल रेकॉर्ड, संदेश, सीसीटीव्ही, आर्थिक व्यवहार आणि इतर उपलब्ध पुराव्यांमधून काय समोर येते?
या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी झाली तरच सत्य बाहेर येऊ शकते.
‘पितपत्रकारिता’च्या आरोपांचीही तपासणी व्हावी
पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणारे लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी.
पण त्याचवेळी अधिकृत यंत्रणांच्या जवळ राहून केवळ कौतुक करणारी, प्रश्न न विचारणारी किंवा अवैध धंद्यांबाबत मौन बाळगणारी पत्रकारिता आहे का? याबाबतही समाज प्रश्न विचारू शकतो.
कोणत्याही माध्यमाची भूमिका त्याच्या बातम्या, पुरावे आणि प्रत्यक्ष पत्रकारितेच्या कामावरून तपासली पाहिजे.
कोणाच्या जवळीकतेवरून पत्रकार प्रामाणिक किंवा अप्रामाणिक ठरविणे योग्य नाही.
निर्भीड पत्रकाराला लक्ष्य करण्याऐवजी संरक्षण द्या!
अवैध धंदे उघड करण्यासाठी पत्रकाराला अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते.
अवैध व्यवसायांचे छायाचित्रण, व्हिडिओ, दस्तऐवज, प्रत्यक्षदर्शींची माहिती,
-
+१).
However, it is alleged that Police Inspector Kumar Kadam provided false information and returned the confiscated goods to Zia Khan, without filing any legal case or registering an FIR.