सोशल वेलफेयर इंग्लिश, मराठी स्कूलला रेल्वे प्रशासनाने जागा रिकामी करण्याची नोटीस दिली व 2.5 कोटी भाडं भरण्याचे आदेश दिले. या गोष्टींची माहिती मिळताच त्याठिकाणी जाऊन शिक्षिकांची व पालकांची भेट घेतली. या शाळेला काही होणार नाही, आश्वासन देखील दिले. @DrSEShinde@mieknathshinde
मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खुन करण्याऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी मूलीला न्याय मिळवून देण्यासाठी सह्याची मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमातून मूलीला नक्की न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त करतो
कॅास्मोग्लोबल मानव अधिकार विचार संघम असोसिएशनच्या माध्यमातून आज दि.१० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याठिकाणी उपस्थित राहुन माझ्या शुभहस्ते द्विपप्रजवलंन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
क.डों.म.पा क्षेत्रातील मूलभूत सुविधा अंतर्गत निधीच्या माध्यमातून, पत्रकार चारूशिला पाटील व माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने कोळसेवाडी विभागातील रॅायल गार्डन समोरील रस्त्याचे डांबरीकरण व ४ पोल लाईट लावले तसेच त्या ठिकाणाची माझ्या शुभहस्ते उद्घाटन करून नागरिकांसाठी रस्ता खुला केला.
वारकरी संप्रदाय प्रासादिक व ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच ह.भ.प.निवृत्ती महाराज पाटील उसाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्तमंदिर, नाऱ्हेण याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. त्याठिकाणी उपस्थित राहुन कीर्तनाचा आनंद घेतला.
साई बाबा कॅालनी, अनमोल गार्डन कल्याण पूर्व याठिकाणी श्री साई बाबा मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. त्याठिकाणी उपस्थित राहुन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा माझ्या शुभहस्ते बक्षीस देऊन सन्मान केली. @DrSEShinde
कल्याण पूर्व काटेमानिवली येथे केरला समाजाने अय्यप्पा भगवानची पूजा आयोजित केलेली. मला त्या ठिकाणी आमंत्रित करून माझा मानसन्मान करण्यात आला.
सर्व संस्थेच्या सदस्य व पदाधिकारी नागरिकांना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले.
@DrSEShinde
मानेरा गांव येथे शेतकरी गरीब कुटुंबातील श्री.पंढरीनाथ जोशी, हेमंत पांडुरंग जोशी यांच्या घराला भीषण आग लागली. मातोश्री गुंजाई संस्थाच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली व शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून मदत करण्यात येईल असे महेश गायकवाड यांनी सांगितले.
@DrSEShinde
कल्याण पूर्वेतील विविध रहिवाशी संघटनांनी मला पाठिंबा दर्शवत माझ्या नेतृत्वासाठी अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या होत्या. ह्या सभांमध्ये मला सन्मानाने आमंत्रित केलं होतं.तेथे उपस्थित राहून माझ्या कुटुंबियांच्या समस्या समजून घेतल्या.
प्र. क्र. १०६ नांदिवली समर्थनगर येथील सद्गुरू कृपा सोसायटी शेजारील मोठ्या गटार बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा व ओंकारेश्वर मंदिर, आत्मारामनगर रस्त्याच्या लोकार्पण सोहळा दि.१३/१०/२०२४ रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! @DrSEShinde
धम्म पहाट 🙏🏽
कल्याण पूर्व अशोकनगर वालधूनी येथे पहाट भगवान गौतम बौद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या संगीतांने दुमदुमली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व अशोक विजयादशमी दसराच्या मनपूर्वक शुभेच्छा ! 🙏🏽
@DrSEShinde
महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा लढा यशस्वी झाला. या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलने व शासनाशी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी GR मंजूर केला व खासदार श्रीकांत शिंदेजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा यशस्वी झाला. @DrSEShinde@mieknathshinde
महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी काल माझ्या वाढदिवसाच्या निम्मित येऊन किर्तनाच्या माध्यमातून तरुणांना व जेष्ठांना मार्गदर्शन केले.
@DrSEShinde
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची मदत मातोश्री गुंजाई संस्थाने केली व त्यांच्या यशाचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच यशस्वी उमेदवारांना प्रोत्साहन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@DrSEShinde
शिवसेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने द नॅालेज अकॅडमीतील महाराष्ट्र शासनाअंतर्गत स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला.
@DrSEShinde
आज माझ्या वाढदिवसाचे पुर्व औचित्य साधून जेष्ठ नागरिक सेवा संस्था आणि मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा केला. ९ऑक्टोबर २०२४ या दिवशी माझ्या वाढदिवसानिमित्याने प्रिय जेष्ठ नागरिकांना आधारकाठी व पट्टा वितरित केले.
@DrSEShinde