।। न निश्चितार्थात् विरमन्ति धीराः।।
धैर्यशील माणूस त्याच्या नियोजित कार्यांपासून मागे हटत नाही...
अडथळे येत राहणार, त्याबद्दल खेद करू नका. आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाबद्दल विचार करा. त्या काळात तुम्हाला तुमच्या जीवनातील काही गंभीर ताणतणाव आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही त्यांच्यावर मात कराल आणि शेवटी एक चांगली व मजबूत व्यक्ती म्हणून उदयास याल. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची सवय लावा.
आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयावर लक्ष केंद्रित केले, तर कालांतराने ध्येय फार दूर दिसत नाही. तो निर्णय म्हणजे - नियमित राहण्याचा. कधीही मागे हटू नका. फक्त नियमित राहा व काम करत राहा. फळ निश्चितच मिळेल. कठोर परिश्रम करणारी व्यक्ती अपयशी होत नाही. कष्टाळू माणूस हळूहळू त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. परिश्रम करण्यापासून कधीही मागे हटू नये. अशा व्यक्तीला यश उशिरा मिळू शकतं, पण त्याला ते नक्कीच मिळतं...!!!
आज फास्टफूडच्या राजाचा दिवस म्हणजेच जागतिक वडापाव दिवस.
जगभरात छोटंसं दुकान ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत सर्वांना दखल घ्यायला लावणारा वडापाव कोणाला आवडत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच !
वडापावला वेळ नसते, पण वेळेला वडापाव असला की खाण्याची चिंता नसते.
चार दिवसांपूर्वी माझी आई हे जग सोडून गेली.... आणि काल माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सन्माननीय #राजसाहेब_ठाकरे माझ्या घरी पोहचले !
दोन महिन्यांची झुंज अपयशी ठरली.... दुःख खूप मोठं आहे.... पण आधार देणारी माणसं जवळ असली की दुःखाचा भार काहीसा हलका होतो !!
महाराष्ट्रात १२,००० पेक्षा अधिक सार्वजनिक लोकग्रंथालयं आहेत.. राज्यसरकारला विनंती की त्याची यादी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, एका App वर त्याचं लोकेशन द्यावं म्हणजे जिज्ञासूंना, वाचकांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशांना त्याचा उपयोग होईल.. #महाराष्ट्र #ग्रंथालयं @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RrrlfKolkata
Chief Minister @mieknathshinde is bravely navigating a treacherous trail to reach the landslide site in Irshalwadi. He visited the affected spot in order to boost the spirits of the affected people and provide assistance to the villagers who were stranded.
#IrshalgadLandslide
प्रिया बापट.. मुन्नाभाई एम बी बी एस, काकस्पर्श ते अशात सिटी ऑफ ड्रीम्स आणि रफ्फुचक्कर असा वर वर जाणारा छान प्रवास आहे! तीचं दिसणं, कॉन्फिडंस आणि अभिनय सगळंच कसं कायच्या काय भारी होत गेलंय!!!❤️❤️
आज कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा पार पडली. रत्नागिरीत राजसाहेबांनी कोकणवासीयांशी संवाद साधला. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
🔸आजच्या सभेला येताना एका शाखाध्यक्षाच्या गाडीला अपघात झाला, हे दुःखद आहे. सभेवरून घरी जाताना आणि एकूणच कुठेही जाताना गाड्या शांतपणे चालवत जा. माझी महाराष्ट्र सैनिकांना हात जोडून विनंती आहे की जाताना गाडी शांतपणे चालवा आणि सीटबेल्ट लावा. सीटबेल्ट लावणं हे आपल्या हिताचं आहे.
🔸मी कोकणात सभा घेईन असं मागच्या दौऱ्याच्या वेळेस बोललो होतो, त्याप्रमाणे आजची सभा घेतोय. एकूणच सगळं राजकीय वातावरण तुंबल्यासारखं झालं आहे. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थितीच कळतच नाही. काही आमदार तर समोर आलं की विचारावंस वाटतं ,काय, सध्या कुठे? इतकं इकडून तिकडे जण सुरु आहे. आणि दुसरीकडे राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता तो काल संपला.
🔸माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची नुसती घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल? उद्या मला पण उर्मटपणे बोलेल. म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला असणार.
🔸कोकणाकडे पाहताना मला नेहमी वाईट वाटतं. कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार? मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही होत ह्याचं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं, तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची?
🔸मागच्या वेळेला मुंबई-गोवा हायवेवरून प्रवास करताना रस्त्याची दुर्दशा पाहून मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला मग नितीन गडकरींना फोन केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे हे सांगितलं तर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. काँट्रॅक्टर्स पळून का जातात? मला सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का, की कॉन्ट्रॅक्टर का पळून गेला?
🔸समृद्धी महामार्ग ४ वर्षात झाला मग १५ वर्षांत मुंबई गोवा महामार्ग का नाही झाला? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींना कसा पडत नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतं.
🔸आज कोकणातील माणसाच्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही? डोळ्यादेखत शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत तरी कोकणी माणूस जागा का होत नाही? तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना माहीत असतं कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच त्यांच्या व्यापारी मित्रांच्या मार्फत जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात. आणि हे आज नाही गेले कित्येक वर्ष सर्रास सुरु आहे तरीही कोणी बोलत नाही, ह्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवत नाही.
🔸आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आक्रमक समुद्रमार्गाने येतील आणि इथल्या जमिनी घेतील म्हणून महाराजांनी आरमार उभारलं. महाराजांना किती पुढचं दिसत होतं. महाराजांनी इतक्या वर्षांपूर्वी आपल्याला जागं करायचा प्रयत्न केला पण तरीही आपण जागे झालो नाही. १९९२ च्या बॉम्बस्फोटांच आरडीएक्स समुद्रमार्गे आलं, २६/११ हल्ल्याचे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. इतकं घडलं, डोळ्यादेखत आक्रमण झाली तरी आपण त्यातून शिकायला तयार नाही. आपल्या जमिनी दुसऱ्याच्या घशात जाऊ देणार नाही हे म्हणायला तयार नाही.
🔸छत्रपती शिवाजी महाराजांवरून एक मुद्दा आठवला तो सांगतो. २०१४ च्या आधी तेंव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे कोण तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हजे कधीही, महाराजांचं नाव सुद्धा घेत नाही आणि अशा माणसाचा पक्ष मला बदनाम करणार.
🔸माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला.
🔸कुठलेतरी मुद्दे काढायचे, विपर्यास करायचं आणि महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचं हेच महाराष्ट्रात सुरु आहे. कोणालाही कोकणी माणसाविषयी आस्था नाही. इथे प्रकल्प आणायचे आणि जमिनींच्या व्यवहारात बाहेरच्यांनी पैसे कमवायचे हे वर्षानुवर्षे सुरु आहे. दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचं मला खूप वाईट वाटतं,राग येतो.
🔸कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झालं आहे? कोकणावर निसर्गाची मुक्त हस्ताने इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.
🔸आधी नाणारला प्रकल्प होणार असं सांगितलं, मग तो बारगळला, आता बारसू. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प करता येणार नाही, इतकंच काय युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही.
🔸आणि ह्या सगळ्यात शिवसेनेची भूमिका नक्की आहे आहे रिफायनरींबाबत? त्यांचे खासदार वेगळं बोलतात, आमदार वेगळं बोलतात, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे हे जनतेला सांगा तरी ?
🔸इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच .
@TUSHARKHARE14 भावा तू चेन्नई च्या फॅन आहेस ठीक आहे, मुंबई टीम तुला आवडत नसेल ते पण ठीक आहे, पण त्या खेळाचा, त्या खेळाडूंचा respect कर. हार जित होतच असते, त्या खेळाचा पण खेळ करू नका रे🙏
आम्ही लढतो आमच्या जागेसाठी,हक्कांसाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरी सारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असूनही हुकुमशाही पद्धतीने सर्वे करायला आलेल्या सरकारचा धिक्कार!
@abpmajhatv@TV9Marathi@saamTVnews@CMOMaharashtra#SayNoToRefinery