ज्ञानोबामाऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी येथे जमलेल्या वारकरी बांधवांवर लाठीचार्ज झाल्याचं समजलं. यंदाची आषाढी वारी सुरु होण्यापूर्वीच वारीला गालबोट लागलं. स्वतःला 'हिंदुत्ववादी' म्हणवणाऱ्या सरकारच्या काळात सुद्धा हे असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे हे सरकार खरंच बाळासाहेबांच्या विचारांवर उभं आहे का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
#Maharashtra
आज शुक्रवार दिनांक ९/०६/२०२३ रोजी चौकाचा आंबा गोवळ येथे रिफायनरी विषयावर विशेष सभेत विरोधाचा ठराव करण्यात आला. त्यात विरोधक ३१६ आणि समर्थक ३ उपस्थित असल्याने रिफायनरी विरोधाचा ठराव बहुमताने बाजूने मंजूर करण्यात आला
@PMOIndia@CMOMaharashtra@HardeepSPuri@OfficeofUT@PawarSpeaks
आज मा.मुख्यमंत्री @mieknathshinde दिव्यातील रस्ते व पाणी विकास कामांचे लोकार्पण करायला येणार असे समजताच दिव्यातील रस्त्यालाही पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी, काम चालू आहे…..वर्षानुवर्ष !
बारसु येथे भू सर्वेक्षण करताना पोलीस आणि प्रशासन केलेला कचरा पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थीनि पर्यावरण दिनी साफ केला.आमच्या निसर्गरम्य कोकणात प्रदूषणकारी रिफायनरी नकोच ती सुद्दा अहिंसेच्या मार्गने साफ करणार.
@CMOMaharashtra@PawarSpeaks@Dev_Fadnavis@OfficeofUT@DGPMaharashtra
कोकणातली पोरगी मालवणी भाषेत कंन्टेट बनवते म्हणून आम्ही फॉलो करत होतो, ती स्वयंघोषीत कोकण कन्या मागच्या काही दिवसांपासून भाजप प्रो भूमिका घेत होती, रिफायनरी समर्थन, केरला स्टोरी प्रमोशन असो. ती कोकण कन्या नुकतीच भाजपच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन ऐकत होती. भाजपच्या पेरोलवर व्हिडीओ बनवायचे काम या कोकणकन्येने सुरु केले दिसते. व्यक्तिगत तिने काय करावे याबद्दल मला काहीच घेणे देणे नाही पण youtube किंवा इन्स्टावर कोकण संबंधित कंटेंट टाकून फॉलोअर मिळवायचे अन सेलिब्रेटी झाल्यावर भाजपच्या पेरॉलवर नाचायचे धंदे करू नयेत. भाजपची बाजू घ्यायची असेल तर भू-भू तोरसेकर, अशील कुलकर्णी सारखे सुरवातीपासून चॅनेल काढून भाजपची तळी उचलवावी, फॉलोअर वेगळ्या मार्गांने वाढवायचे अन नंतर त्यांना भाजपचे विचार पैशावर पाजायचे काम यांनी करू नयेत, त्या अंकिता वाळवलकर पर्यंत हे ट्विट पोहचवा...
महाराष्ट्र सरकारने "भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात" अल्पावधित मोठी प्रगती केली आहे.सत्ता आल्यानंतर अवघ्या 10 महिन्यात जगात पहिल्यांदा "फोल्डिंगचे रस्ते" बनवण्याच तंत्रज्ञान यांनी विकसित केलं आहे. हे असंच चालू राहिलं तर काही दिवसातच आपल्याला घडी घालून ठेवायचे रस्ते देखील पाहायला मिळतील,असा मला विश्वास आहे.
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.
#WrestlingProtest #WrestlersProtest @Phogat_Vinesh@BajrangPunia@SakshiMalik
पुण्यातील नोकऱ्या मराठी मुलांना भेटत नाहीत आणि शिंदे, फडणवीस आणि सामंत कोकणात रिफायनरी आणून कोकणी लोकांना रोजगार देण्याचं गाजर देतात....
हिम्मत असेल तर नोकरीत मराठी मुलांना ८०%आरक्षण द्या...
#SayNoToRefinery
महिलांची उपस्थिती जिथे लक्षणीय तिथे विजय हा निश्चित मानला जातो...
बारसू रिफायनरी रद्द होण्यासाठी आमच्या माता भगिनीने दिलेल्या ह्या लढ्याची इतिहास नक्कीच दखल घेईल...
आज ह्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होतोय...
सलाम ह्या सर्व माता भागिनींना... 🙏🏻❤
रिफायनरी च्या विरोधात केवळ बारसू पंचक्रोशी नाहीय, आख्खी कोकणची जनता एकवटलीय ती जे जिथे कुठे असतील तिथून राजकारण्यांनाही धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.
कोकणातील युट्यूबर इंल्फ्यूंसर नी केलेला एकजूटीचा एक व्हिडिओ नक्की बघा.
https://t.co/sY53oQybsl
नवलादेवी श्रद्धा मित्र मंडळ (शैक्षणिक, सामाजिक, कला-क्रिडा, ग्रामविकास) मु. खिणगिणी, कुणबी वाडी येथे जलपूजे निमित्ताने सर्व ग्रामस्थ आणि चाकरमानी यांनी कोकणात येवू घालणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी चा जाहीर निषेध नोंदवला.
@PMOIndia@CMOMaharashtra@HardeepSPuri@OfficeofUT@aviuv