PMC-JE परीक्षेत घोटाळ्याचा संशय; सत्य बाहेर आणा..
पुणे महानगरपालिकेच्या PMC-JE परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेले गंभीर आक्षेप अत्यंत चिंताजनक आहेत. परीक्षा सात शिफ्टमध्ये घेण्यात आली असताना Normalization प्रक्रिया कशी राबविण्यात आली, Raw Score आणि Normalized Score जाहीर का करण्यात आले नाहीत, तसेच IBPS पद्धतीप्रमाणे पारदर्शक निकाल का प्रसिद्ध करण्यात आला नाही..
परीक्षेच्या निकालात अनेक विसंगती असून सात शिफ्टमध्ये परीक्षा होऊनही गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. गुणवत्ता यादी, सेक्शननिहाय गुण, Raw Score आणि Normalized Score जाहीर केल्यास सत्य समोर येईल..
याशिवाय, परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची शक्यता दर्शविणारे काही पुरावे समाजमाध्यमांवर समोर आले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे..
यापूर्वी जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतही संशय निर्माण झाल्यानंतर CCTV फुटेज, उमेदवारांच्या हालचाली आणि गोपनीय अहवालाच्या आधारे चौकशी करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर PMC-JE प्रकरणातही मेरिटमधील अव्वल ३०० उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि गोपनीय अहवाल तपासून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी..
राज्य सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही विनंती..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दोन्ही अध्यक्षांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC-JE भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून व्यक्त होत असलेल्या शंका आणि आक्षेप गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली असताना Normalization प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात आली, Raw Score व Normalized Score सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, तसेच गुणवत्तायादी आणि गुणांकनाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे का जाहीर करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निकालातील कथित विसंगतींमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व गुण, सेक्शननिहाय माहिती आणि Normalization संदर्भातील तपशील जाहीर करणे आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर काही संशयास्पद बाबी देखील समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मेरिट यादीतील अव्वल उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि संबंधित अहवालांची पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे.
राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा. पात्र आणि मेहनती उमेदवारांना न्याय मिळणे हीच सर्वांची अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMCPune
🚨 पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती – विद्यार्थ्यांचे आंदोलन 🚨
📅 दिनांक: 29 जून 2026
🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ: पुणे महानगरपालिका परिसर
📢 विद्यार्थ्यांनो, आपल्या न्यायाच्या हक्कासाठी एकत्र या!
👉 भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समोर आलेल्या कथित पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
👉 चौकशीत गंभीर अनियमितता सिद्ध झाल्यास भरती प्रक्रिया रद्द करून सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल अशा पारदर्शक पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी.
💯 आमचा उद्देश कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करणे नाही; प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता मिळावी, हीच आमची भूमिका आहे.
✊ शांततामय, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडूया.
"अभी नहीं तो कभी नहीं!" 🎯🔥
#mpsc #pmc #pmcje #pune
काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिका भरतीतील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत आहे. ही केवळ एका भरतीची लढाई नाही, तर लाखो तरुणांच्या भविष्याची लढाई आहे.
पुणे महानगरपालिका भरती प्रक्रियेत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांची तातडीने उत्तरे दिली पाहिजेत.
१. दि. ९ तारखेचा निकाल IBPS Format मध्ये का प्रसिद्ध करण्यात आला नाही?
२. दि. ९ तारखेचा निकाल संपादित (Editable PDF) स्वरूपात का होता?
३. तो निकाल अधिकृत संकेतस्थळावरून संशयास्पद पद्धतीने का हटविण्यात आला?
४. दि. १५ तारखेचा निकाल देखील IBPS Format मध्ये का नव्हता?
५. निकाल जाहीर करण्यापूर्वी Normalisation प्रक्रिया करण्यात आली होती का? झाली असल्यास त्याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
६. TCS iON Digital Centre मध्ये इतकी कडक सुरक्षा असताना प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर कसा आला?
a. तो फोटो कोणी काढला?
b. बाहेरून उत्तरे पुरवणारे कोण होते?
c. या संपूर्ण प्रकारामागे कोण आहे?
७. "पेपर फुटला तर तो एका सत्रापुरता मर्यादित राहतो" हे स्पष्टीकरण अत्यंत धक्कादायक आहे.
याचा अर्थ एका सत्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तरी तो स्वीकारायचा का? सरकारी भरती प्रक्रियेत एका विद्यार्थ्यावरही अन्याय होणे मान्य नाही.
प्रमुख मागण्या :
a. चौकशी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी.
b. निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमण्यात यावी.
c. प्रश्नपत्रिका गळती किंवा संघटित गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी.
d. सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यभरातील विद्यार्थ्यांसोबत काँग्रेस पक्ष उभा आहे आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावरही लढू आणि आवश्यक असल्यास विधानसभेतही हा प्रश्न आक्रमकपणे मांडू. विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.
@prajytnair@navalMH@CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal@VijayWadettiwar@imshivrajmore@SalunkeSagarK@Maharashtransui@IYCMaha
#PMC #JusticeForStudents #PaperLeak #Congress #Maharashtra #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #NEET #neet2027 #TET
आता मात्र MPSC ने हद्द केली.. सचिव व अध्यक्ष महोदय MPSC TCS च्या घशात घालण्याचा हा घाट तर नाही ना?
विद्यार्थ्यांनो हा मनमानी कारभार तुम्हाला मान्य आहे का? सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपण मांडायला हवा अन्यथा MPSC ची पारदर्शकता राहणार नाही.
"आमची ३ वर्षे परत देणार का?
#WRD_JE भरती प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थी आज नैराश्यात आहेत.
वयाची अट ओलांडत चाललेल्या तरुणांच्या व्यथा आपल्याला कधी कळणार?
फक्त घोषणा नको,आता प्रत्यक्ष कृती हवी आहे. तातडीने जाहिरात प्रसिद्ध करा! @RVikhePatil@girishdmahajan#WRD_JE_Delay
(१) एखाद्या जाहिरात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती काळ थांबावे?
WRD_JE या पदभरतीकरीता 04/2023 रोजी मंजूरी मिळाली.
पण अजूनही साधी जाहिरात प्रसिद्ध केली गेली नाहि, म्हणजे शासनाने ठरविले आहे का विद्यार्थ्यांची पण पंचवार्षिक योजना राबवायच्या ?
@Dev_Fadnavis#WRD_JE#RR#Recruitment
26 Duplicate Candidates in PMC exam?
In the results of the Pune Municipal Corporation's Junior Engineer (Civil) recruitment, the names of as many as 26 candidates appear twice. The records show different roll numbers and different reservation categories for these duplicate entries.
Furthermore, while the entire first page of the result document is typed, only the date is handwritten. The signature is not digitally signed but appears to be an image. Additionally, the first page bears the notation "Page No. 31", raising suspicions that the original file may have been altered or tampered with.
Moreover, although the recruitment examination was conducted on three different days, the details of the normalization methodology used for score calculation have not been made public. The fact that the result PDF reportedly displays an editable DOCX file path also raises concerns regarding document management and integrity.
Given these issues, an independent Digital Forensic Audit, Recruitment Process Audit, and technical investigation should be conducted, and all findings should be made public.
@navalMH
#PuneMunicipalCorporation #JuniorEngineerRecruitment #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26DuplicateCandidates
Degrees in our hands, Tears in our eyes and an endless wait in our hearts.
This is the reality of a #WRD_JE aspirant in Maharashtra today.
An administrative delay in the #RR Gazette is costing us our youth. Please listen to our silent cries, CM Sir ! 🙏
@Dev_Fadnavis#Telegram
1. Ban social media to end misinformation.
2. Ban mobile phones to prevent online scams.
3. Ban the internet to eliminate cybercrime.
4. Ban roads to prevent road accidents.
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निकालामध्ये कथित डुप्लिकेट नोंदी, दस्तऐवजाच्या अखंडतेबाबत निर्माण झालेल्या शंका, नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक न केल्यामुळे हजारो अभियंता उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतंत्र Digital Forensic Audit, संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आणि सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणावरही आरोप करणे हा उद्देश नाही; मात्र भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने सत्य समोर येणे आणि जनविश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@navalMH@INCHarshsapkal
#PMCRecruitment #JERecruitment
#Transparency #StudentsFirst #Pune #EngineeringStudents #DhananjayShinde