खूप धन्यवाद मंत्रीमहोदय श्री मंगलप्रभात लोढा साहेब..
आम्ही दिड वर्षापासून वाट बघत बसलो आहोत. आम्हा निवड झालेल्या सर्व 1457 ITI CRAFT INSTRUCTOR उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी हीच विनंती...🙏🙏
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद.
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@degree_holders@parthpunter@sohitmishra99
#1457craft_instructor_joining
1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा.
2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही,
3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
#1457craft_instructor_joining
ITI Craft Instructor 1457 पदभरती ची प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे.मेरिट लिस्ट येवून 2 महिने झाले, अजून सिलेक्शन लिस्ट,कागदपत्र पडताळणी बाकी आहे.आधीच वर्षाहून अधिक काळ गेला आहे परीक्षा प्रकियेत. तात्काळ लक्ष घालावे ही विनंती.