कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.
तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.
मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.
ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे.
ही संधी दवडू नका.
आपला
राज ठाकरे
आज माझी #निर्वी दोन वर्षांची झाली...!
जगातील सर्वांत श्रीमंत कोणी असेल तर तो मुलीचा बाप हे सत्य परमेश्वराने माझ्या पदरी दिलं...!
पुढच्या तिच्या गोड स्वप्नांना आपला आशीर्वाद मोलाचा आहे...! #HBDNIRVI
माझी गाडी नवीन अजून त्यांनी भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे कारण पवन मुंडे 9130744444 यांचा व्यवसाय हा 2 नंबर असून त्यांनी माझी भरपाई दिली नाही .. @Pankajamunde ताई मी एक सैनिक आहे माझा पैसा हा पूर्ण मेहनतीचा आहे . आपले पण माहिती असेल एक सैनिक कसी आपली दुटी देऊन पैसे कमावतो.
नमस्कार मी नितीन अंदूरे रा. पारनेर तालुका पाटोदा जि.बीड @Pankajamunde ताई आपले माझी विनंती आहे. पवन मुंडे रा परळी वैजनाथ ये आपल्या संबंधातील आहेत त्यांची गाडी ने माझी गाडी दिनांक 16 मे 2022 रोजी नगर येथे अपघात केला . त्यांना खूप विनंती केली पण माझी काही नुकसान भरपाई केली नाही.
कर्तृत्व असलेल्या माणसाला पद महत्वाचं नसतं, तो माणूस मिळालेल्या पदातून विश्व उभं करतो याला महत्त्व असतं असे आदरणीय मनसे बीड जिल्हा अध्यक्ष @sumant_dhas यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🚂🚂🚂🚩🚩🚩......!🔥✌️
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील अनेक तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मनसे कुटुंबात सर्वांचे स्वागत!
राज… लवकर बरे व्हा!
आपणांस निरोगी आणि समृद्ध आरोग्य लाभो यासाठी माझ्याकडून सदिच्छा! आपण लवकरात लवकर बरे व्हा हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..!!
Get well Soon..!!
@RajThackeray
लोककल्याणकारी राजे, न्यायप्रिय शासनकर्ते आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यानां जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#ShahuMaharaj