आ अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही एकही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी पुढे आलेला नाही. यावरून सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत, तर आंदोलनाकडे दुर्लक्ष करून सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
ऑनलाईन परीक्षा पद्धतीतील त्रुटी आता सिद्ध झाल्या आहेत. खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रिया राबवली जात असल्याने पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. माहितीच्या अधिकारातूनही अनेक बाबी समोर येत नाहीत, मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी व्यवस्था तयार झाली असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा प्रक्रियेवर सरकारचा आग्रह का आहे, हा मोठा प्रश्न आहे.
#MPSC च्या #CBT परीक्षा पद्धतीबाबत राज्यभर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे विविध प्रकरणांतून समोर आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास उरलेला नाही.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित CBT परीक्षा पद्धती तात्काळ रद्द करून ऑफलाईन परीक्षा पद्धती लागू करावी, हीच महाराष्ट्र काँग्रेसची ठाम मागणी आहे.
#MPSC
मुख्य प्रवाहातील माध्यमांनी छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच लातूरमधील हजारो विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाकडेही दुर्लक्ष केले. पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबून प्रश्न संपत नाहीत.
आज अमरावती, यवतमाळ, नांदेड, वर्धा, संभाजीनगर, लातूर… आणि महाराष्ट्रभर विद्यार्थी न्याय्य, पारदर्शक व ऑफलाईन MPSC परीक्षांच्या मागणीसाठी उभे आहेत.
हा संघर्ष कोणत्याही पक्षाचा नाही, तर लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या भविष्याचा आहे. संविधानावर विश्वास ठेवून हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. ✊
@INCHarshsapkal
#MPSC #OfflineExams #JusticeForAspirants #Maharashtra
'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही, तर त्यांच्या विश्वासावर घाला घालणारा आहे!
CBT म्हणजे पारदर्शकता, असा दावा केला जातो. पण महाराष्ट्रातील भरती प्रक्रियांमधील पेपरफुटी, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवस्था आणि खासगी एजन्सींवरील गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अशा परिस्थितीत CBT लादण्याचा हट्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
आयोगाने विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध, हजारोंचे आंदोलन आणि सातत्याने मांडल्या जाणाऱ्या न्याय्य मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संवादाऐवजी निर्णय लादण्याची ही भूमिका निषेधार्ह आणि लोकशाहीविरोधी आहे.
आमची मागणी स्पष्ट आणि ठाम आहे — MPSC च्या सर्व १००% उमेदवारांच्या सर्व पूर्व परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही तांत्रिक त्रुटी, खासगी एजन्सी किंवा डिजिटल जोखमीच्या भरोशावर सोडता येणार नाही.
विद्यार्थ्यांच्या विश्वासाशिवाय कोणतीही परीक्षा प्रणाली यशस्वी होऊ शकत नाही. हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने होणारा संघर्ष अधिक तीव्र होईल.
“विद्यार्थ्यांचा आवाज दाबून निर्णय चालत नाहीत; न्याय देऊनच विश्वास मिळतो!”
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@mpsc_office
#MPSC #CBT #OfflineExams #OMR #JusticeForAspirants
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर : विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी!
MPSC परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे सलग तिसऱ्या दिवशी शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत.
तीन दिवस उलटूनही MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक संवाद साधलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भावना, शंका आणि भविष्यासंदर्भातील गंभीर चिंतांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे.
आज लातूरमध्येही हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला सक्रिय पाठिंबा देत असून, त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील.
आजच्या आंदोलनात MPSC प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्ते काळ्या फिती बांधून आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आंदोलन करणार आहेत.
दुर्दैवाने, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद साधण्याऐवजी आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नाही. सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करावी.
महाराष्ट्रातील सर्व MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमचे आवाहन आहे—
🖤 आज आपल्या WhatsApp Status वर काळा रंग (Black Status) ठेवा किंवा काळ्या पार्श्वभूमीवर “MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या”, #OfflineMPSC, #JusticeForMPSCAspirants हा संदेश पोस्ट करून या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवा.
हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही; हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पारदर्शकतेचा आणि परीक्षेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
चला, लोकशाही मार्गाने एकजुटीने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवूया.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यास काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील!
जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@satejp@VijayWadettiwar@DGPMaharashtra@bhimanwar@MahaChiefSec
#OfflineMPSC #JusticeForMPSCAspirants #MPSC #StudentsFirst #Maharashtra